एक्स्प्लोर

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

सगळ्यांशीच जिव्हाळ्याची नाती कशी जुळतील, काही नाती औपचारिकच राहतात आणि तरीही त्यांना एक आपुलकीचं उबदार अस्तर असतंच... तसं आमचं नातं होतं. ना पायांवर डोकं ठेवलं, ना हस्तांदोलन केलं... काळाच्या एका इवल्या तुकड्यात आम्ही थोडासा सोबत प्रवास केला; थोडा शब्दश: प्रवास आणि थोडा प्रतिकात्मक... शब्दांमधून! त्या आठवणी आणि त्यांची तमाम पुस्तकं पुढच्या काळात सोबत राहतीलच.

साधूंची पहिली आठवण मी शाळकरी असतानाची, नांदेडमधली आहे. ते नांदेडला ग्रंथालीच्या एका कार्यक्रमासाठी आलेले होते. मी छोटी डायरी पुढे करत त्यांना सही मागितली. त्यांची पत्नी त्याच घोळक्यात बसलेली होती, तिच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, “सही घ्यायचीच तर तिची घे. तिचं काम माझ्याहून जास्त मोठं आहे.” अखेर दोघांच्याही सह्या माझ्या डायरीत एका पानावर आल्या. याचा अर्थ इयत्ता नववीत कळणं अवघड होतं; तो खूप पुढे कळत गेला. मधली अनेक वर्षं मी त्यांची जुनी-नवी पुस्तकं वाचत राहिले. अगदी परवाच त्यांच्या ‘मुखवटे’ची आठवण निघाली, त्याआधी काहीतरी आठवलं म्हणून ‘झिपऱ्या’ आणून वाचलं होतं. त्यांच्या विज्ञानकथाही अधूनमधून एखाद्या निमित्ताने आठवत. 'मुंबई दिनांक'मधील अनेक प्रसंग तर मनात कधीही जागे होत असतात आजही. दिनू रणदिवेंना भेटले तेव्हा धडक विचारलेलं की, “सिंहासनमधला निळू फुलेंनी रंगवलेला पत्रकार साधूंनी खरंच तुमच्यावरून लिहिलेला आहे का?” रणदिवे शांत हसलेले नुसते. ‘पोरकटपणा कमी होऊ द्या जरा...’ असं म्हटले असणार ते मनातल्या मनात. चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं  हे असं स्फोटक भरलेलं लिहीत असून साधू तेंडुलकरांसारखे चर्चेत राहिले नाहीत कधी... याचं मुख्य  कारण म्हणजे स्वभावातली सौम्यता, मृदु-संकोची वृत्ती आणि मीडियासमोर बोलायचं झाल्यास सनसनाटीपणाचा लवलेश न ठेवता गांभीर्याने, अभ्यासू मतं मांडणं. या मतांची, प्रतिक्रियांची भाषा क्वचित जड झाली तरी चालेल; पण सैल होता कामा नये, अशी ठाम वृत्ती. लेखकानं आतून अस्वस्थ असणं पुरतं की, असंही कधी वाटे त्यांच्याकडे पाहून. मला कुतूहल वाटायचं की, एकीकडे वृत्तपत्रांमधलं वाचकांना सहज आकळेल असं सोपं लिहिणं, ताज्या विषयांवर हुकुमी लेख लिहिणं वा व्याख्यानं देणं आणि दुसरीकडे कथा-कादंबऱ्यांसह अभ्यासपूर्ण वैचारिक लेखन करणं ही कसरत त्यांना कशी जमत असेल? इकडच्या भाषेचा तिकडच्या भाषेवर परिणाम होत नाही का? नोकरी म्हणून शब्दकामाठी, आंतरिक गरज म्हणून सृजनशील लेखन करताना पुन्हा शब्द... सारखे शब्द वापरून ते कधी बर्नआउट होत नाहीत का? शब्द नकोसे झाले तर ते काय करतात? अनेक प्रश्न. ते वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख असताना दुसरी भेट झाली. राज्य मराठी विकास संस्थेने या विभागासोबत एक चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि पुण्यातल्या त्या कार्यक्रमाची व्यवस्था बघण्यासाठी गेले असताना मी त्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी सौम्यपणे दिलेले चांगले सल्ले आजही आठवतात. माणसांविषयी मनात निखळ आदर ठेवून, भावुकपणे ऐकायचा काळ होता तो. तिसरी भेट दीर्घ होती... दोन अख्खे दिवस आम्ही सोबत होतो. तेव्हा माझी पहिली कादंबरी चर्चेत होती आणि दुसरी येऊ घातली होती. ती चर्चेत येण्यास सुरुवात झाली तीच साधूंनी लोकसत्तेत लिहिलेल्या पानभर मोठ्या लेखाने. उत्स्फूर्तपणे आणि मन:पूर्वक लिहिलं होतं त्यांनी; मी खूप संकोचून गेले होते. दिलीप माजगावकरांकडून साधूंचा फोन नंबर घेतला. फोनवर चार-दोन वाक्यं बोलले आणि तेही ‘सगळं लिहिलं आहेच’ म्हणत तितकंच बोलले; चौथ्या मिनिटाला फोन संपला. मात्र नंतर नांदेडमध्ये माझा एक सत्कार साधूंच्या हस्ते करायचा ठरला, दुसरे दिवशी सेलूत एक पुरस्कार त्यांच्याच हस्ते दिला जाणार होता; या दोन निमित्ताने साधूंशी निवांत गप्पा झाल्या. नांदेडमध्ये माझ्या जुन्यानव्या परिचितांचा घोळका जमलेला पाहून त्यांनी मिश्कील टिपण्णी केली होती आणि असं ते सहसा बोलत नाहीत हे माहीत असल्यानं मजा वाटलेली. नांदेडचा कार्यक्रम आटोपून दुसऱ्या सकाळी आम्ही व्हाया परभणी सेलूला जाणार होतो. निघण्याआधी सकाळी नांदेडमध्येच शेषराव मोरे यांच्या घरी गेलो. साधूंनी जणू त्यांची मुलाखत घेत असावेत इतके प्रश्न विचारले. संदर्भ कसे जमवले, दुर्मिळ ग्रंथ कुठून मिळवले इथपासून बारीकसारीक गोष्टी ते अत्यंत उत्सुकतेने एखाद्या नवख्या लेखकाप्रमाणे जाणून घेत होते. त्यात स्वत:च्या मोठेपणाचा, लेखक असण्याचा भाव अदृश्यच झालेला होता. सोबत मी आणि राजहंसचा श्याम देशपांडे होतो. आम्ही मन लावून ती प्रश्नोत्तरं ऐकली. मग परभणीत पत्रकार संघात त्यांचं व्याख्यान ऐकलं. संध्याकाळी सेलूच्या कार्यक्रमाला पोहोचलो. त्यांची एक इवली ब्रीफकेस, त्यात दोन अधिकचे शर्ट. “शर्ट बदलूच का?” असा गहन प्रश्न. मग मी साडीबिडी नेसायला आत गेले, तर हेही विचार पालटून शर्ट बदलून तय्यार. “तुम्ही बायका इतका वेळ खर्चून इतक्या नेटक्या राहता, तर आपण दोन मिनिटांत शर्टही बदलण्याचा कंटाळा करतोय याने ओशाळं वाटलं.” असा घाईने खुलासाही केला. म्हटलं तर अशा घटना या व्यक्तिगत, साध्या, घरगुती टोनच्या आणि लहानशा असतात. पण मोठ्या माणसांच्या विस्तृत कर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांकडे हमखास दुर्लक्ष होतं, म्हणून मला त्या आवर्जून नोंदवाव्या वाटतात. माणूस किती जमिनीवर आहे, किती साधा आहे... हे त्यातून उलगडत जातं. लेखन-व्याख्यानातून विचार कळतात, पण अशा अनुभवांमधून माणसाची खरी वृत्ती कळते. नांदेडच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं होतं, “या मुलीकडून अधिक संख्येचं आणि गुणवत्तापूर्ण लेखन व्हावं अशी अपेक्षा असेल, तर आधी तिला पुरस्कार देणं थांबवा.” माहेरहून निघाल्याने माझ्याकडे त्यांच्या सामानाहून पन्नासपट सामान अधिक. कार्यक्रमांमध्ये मिळालेल्या शालींचं काय करायचं, हा आता त्यांच्यासमोरचा प्रश्न होता; त्यात श्रीफळंदेखील न्यावीच लागतात असा आयोजकांचा अंधआग्रह. माझ्याकडच्या सर्व शाली एड्स झालेल्या अनाथ मुलांसाठी जाणार आहेत हे समजताच त्यांनी ते बोचकं आनंदाने माझ्या हवाली केलं आणि “इतकं प्रचंड सामान घेऊन जाणारच आहेस, तर गाड्याला नळ्याचं काय ओझं,” म्हणाले. सेलूच्या कार्यक्रमात कोणत्या कविता वाचाव्यात असा पेच होता तर दुपारी सगळा संग्रह वाचून त्यांनी कविता निवडून दिल्या चक्क... म्हणाले, “एरवी मी कविता वाचत नाही फारशा, पण हा संग्रह सलग वाचून काढला चक्क!” प्रवासात मी अनेक प्रश्न विचारले, त्यांची त्यांनी शांतपणे उत्तरं दिली. सेलूच्या कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे येणार होता... मकरंद आणि साधू एका व्यासपीठावर हे कॉम्बिनेशन खतरा होतं. त्याच्या गाडीला वाटेत अपघात झाला आणि उशीर होत असल्याने प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरू झाली होती. आयोजकांनी साधूंना अनासपुरे येईपर्यंत भाषण करण्याची विनंती केली, ती शांतपणे स्वीकारून ते बोलायला उठले आणि पाऊणेक तासानंतर अनासपुरे पोहोचल्याचं समजताच त्यांनी अत्यंत अलगद समारोप करून भाषण सराईतपणे संपवलं. त्यांचा चांगुलपणा आणि त्यांची वक्तृत्वावरची मांड या दोन्हींनी आम्ही चकित झालो होतो. आयोजकांनी त्यांच्या विनम्र वृत्तीचा गैरफायदा घेतला असंही मला वाटत राहिलं, पण ते शांत होते. मुंबई माणसांमध्ये अंतरं राखणारं शहर आहे; त्यानं आमच्यात अंतर राखलं, तरी खास वैदर्भी-मराठवाडी आपुलकीही आम्हांला फोनवरून संपर्कात ठेवत गेली. “एकदा घरी ये, भेटूया,” असं म्हणणं फोनवरच राहिलं; प्रत्यक्षात आलं नाही. मध्यंतरी एक मोठा पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा दीर्घ फोन झाला, पण ‘अभिनंदन’ म्हणायचं राहूनच गेलं; कारण नवं लेखन, वाचलेली नवी पुस्तकं यांच्याच गप्पा इतक्या झाल्या की पुरस्कार वगैरे त्यांच्या दृष्टीने एक कॅज्युअल बाब आहे हे अधोरेखित झालं. सगळ्यांशीच जिव्हाळ्याची नाती कशी जुळतील, काही नाती औपचारिकच राहतात आणि तरीही त्यांना एक आपुलकीचं उबदार अस्तर असतंच... तसं आमचं नातं होतं. ना पायांवर डोकं ठेवलं, ना हस्तांदोलन केलं... काळाच्या एका इवल्या तुकड्यात आम्ही थोडासा सोबत प्रवास केला; थोडा शब्दश: प्रवास आणि थोडा प्रतिकात्मक... शब्दांमधून! त्या आठवणी आणि त्यांची तमाम पुस्तकं पुढच्या काळात सोबत राहतीलच. चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग – चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget