एक्स्प्लोर
Advertisement
सलमानचा ‘लिटल बॉय’ हीट होणार?
आपल्या कारकीर्दीतले सर्वात मोठे सिनेमे सलमान खानने 2015 आणि 2016 या दोन वर्षात केले. यात सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’चा समावेश आहे. पण या दोन्ही यशस्वी सिनेमांसोबत त्यानं अजून केलेले दोन सिमेने हे दुसऱ्या भाषेतील सिनेमांचे रिमेक आहेत. 2015च्या दिवाळीत सलमान आणि राजश्री प्रोडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’नं बॉक्स ऑफिसवर कमाई केली. पण प्रेक्षकांना मात्र तो पसंत पडल्याचं पाहायला मिळाले नाही. दक्षिण कोरियाच्या ‘मस्करेड’ या सिनेमाचा रिमेक होता प्रेम रतन धन पायो...
दुसरा सिनेमा आहे ‘ट्यूबलाईट’...आता देशात बाहुबलीनंतर सगळ्यात जास्त चर्चा असलेला ट्यूबलाईट... काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. लिटल बॉय आणि ट्यूबलाईटमध्ये अनेक गोष्टी सारख्या असल्याचे जाणवले.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव होतं ‘लिटल बॉय’... त्यालाच धरुन मॅक्सिकन दिग्दर्शक अलेजेन्ड्रो गोमेज मान्टेवर्ड यांनी एक लहान मुलगा आणि युद्धावरुन न परतेल्या वडिलांची गोष्ट यामध्ये दाखवलीय....जापनीज आणि अमेरिकन्स यांच्यातील त्याकाळचे संबंध...उंची न वाढणाऱ्या मुलाला केद्रास्थानी ठेवून रचलेलं कथानक दोन तास आपल्याला खिळवून ठेवते. आता सलमान खान त्या सिनेमातील लिटल बॉय साकारणार आहे. जरी कथानक पूर्णपणे सारखं नसलं तरी मात्र सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये नेमकं काय घडणार आहे ते कळून आलं.
लिटल बॉय सिनेमात युद्धावर गेलेल्या वडिलांना परत आणण्यासाठी उंची न वाढण्याचा आजार असलेला मुलगा प्रयत्न करत असतो. लहानपणापासून उंची न वाढल्यानं कोणीही मित्र नसलेला लिटल बॉय आणि त्याच्या वडिलांमध्ये असलेलं मैत्रीचं नातं आणि लिटल बॉयला असलेला जादूवरचा विश्वास, हे सारं चित्रपटाच्या सुरुवातील दाखण्यात आलं आहे.
खरी कथा सुरु होते ती जेव्हा त्याचे वडील युद्धावर जातात आणि ते युद्धकैदी झाल्याची बातमी येते तेव्हा. वडिलांसोबत आवडत्या जादूगाराचा खेळ पाहण्यासाठी आसुलेला लिटल बॉय आपल्या भावासोबत जातो...
तिथं तो जादूगार लिटल बॉयला स्टेजवर बोलवून जादू करतो. बस्स.. इथंच त्याचा जादूवरचा आणि स्वत:वरचा विश्वास वाढतो. त्याला वाटते की, तो काहीही करु शकतो...त्याच दरम्यान, लिटल बॉय एकदा चर्चमध्ये प्रार्थना करत असताना फादर्स सांगतात की, हे युद्ध थांबवण्यासाठी डोंगराला हलवण्याची जादू करणारा कुणीतरी हवा. मग लिटल बॉय फादरकडे जातो. फादरसमोर मात्र त्याला जादू करायला जमत नाही. लाहग्याला काय नाराज करायचं म्हणून ते त्याला काही गोष्टी करायला सांगतात. त्या गोष्टी केल्यानंतर तुला जादू जमेल आणि मग तू तुझ्या वडीलांना परत आणशील...
याच काळात त्यांच्या शहरात एक जापनीज पण राहायला येतो...त्याला स्थानिक जनता त्रास देते. पण लिटल बॉय त्याला आपला मित्र बनवतो. कारण फादरने सांगितलेल्या गोष्टी लिटल बॉयला आठवतात. या गोष्टींमधील सगळी कामं लिटल बॉय त्या जापनीजच्या मदतीनं पूर्ण करतो. हे सुरु असताना त्याच्या मोठ्या भावाला त्यांची आणि जापनीज माणसाची मैत्री खटकत असते.
एका सीनमध्ये मोठा भाऊ सगळ्या शहरासमोर त्याला ओरडतो आणि जादू करयला सागंतो. त्यावेळी लिटल बॉयच्या शहरातून दिसणाऱ्या डोंगराला हलवायचं असतं त्याला. योगायोगाने भूकंप येतो. सगळ्यांना वाटतं की हे लिटल बॉयच्या शक्तीमुळे झालंय.
फक्त जापनीज माणूस त्याला पटवून देतो की, असं काही नसतं आणि त्याचवेळी वडिलांच्या मृत्यूची बातमी येते. तेव्हा लिटल बॉय समुद्रावर जाऊन परत एकदा दोन-तीन तास त्या जादूचे प्रयोग करतो आणि सकाळी बातमी येते की अमेरिकेनं जपानवर अणू बॉम्ब टाकलाय. त्याच नाव होतं...‘लिटल बॉय’
युद्धामध्ये लिटल बॉयचे वडील बचावलेले असतात. तो प्रवासही अत्यंत रंजकपणे या सिनेमात मांडण्यात आला आहे. थोडक्यात काय तर लिटल बॉय शहरात ‘टॉल’ होतो. त्यात त्यानी दुसरं महायुद्ध दाखवलंय. यात सलमान भारत-चीन युद्धच्या धर्तीवर जादूचे प्रयोग करणार आहे. आता पाहायचं इतकंच की सलमान आपल्या भावाला युद्धभुमीतून घरी कसा परत आणतो...
सलमानच्या ट्युबलाईटच्या ट्रेलरमध्ये एक ओळ ऐकायला मिळते...जी पूर्णपणे लिटल बॉयची आठवण करुन देते. ती म्हणजे ‘क्या तुम्हे यकीन है?’. किंबहुना, काही सीन देखील सारखेच आहेत.
‘बजरंगी भाईजान’मधील बजरंगी सारखाचा साधाभोळा सलमान आपल्याला ‘ट्यूबलाईट’मध्येही पाहायाला मिळणार हे नक्की...
ट्युबलाईट म्हणजे आपल्या भाईजानची पाकिस्तानातील रिटर्न जर्नी व्हाया चीन म्हणायला हरकत नाही....!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement