एक्स्प्लोर
Advertisement
हसीना पारकर... ‘आशिकी गर्ल’चा दबंग अंदाज
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरच्या पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला मुंबईतील माफियाराज आणि दाऊद इब्राहिमची दहशत दिसून येते. अनेक गुन्हे नावावर असूनही फक्त एकदाच न्यायालयसमोर येणाऱ्या हसीना पारकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरच्या पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला मुंबईतील माफियाराज आणि दाऊद इब्राहिमची दहशत दिसून येते. अनेक गुन्हे नावावर असूनही फक्त एकदाच न्यायालयसमोर येणाऱ्या हसीना पारकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.
जितका वायलंट हा ट्रेलर आहे, तितकाच इमोशनल टच देखील या ट्रेलरमध्ये प्रामुख्यानं दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शकांनी मारझोड आणि इमोशन्सचा समतोल या ट्रेलरमध्ये राखलाय, तसाच समतोल चित्रपटातही असावा हीच अपेक्षा...
नेहमीच रोमॅन्टिक भूमिकेत दिसणारी श्रद्धा कपूर या चित्रपटात पूर्णपणे नव्या रुपात दिसणार आहे. त्यासाठी तिने मेकओव्हरदेखील केला आहे.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीनाच्या भूमिकेत श्रद्धा कपूर आपल्याला दिसणार आहे. तर तिचा सख्खा भाऊ सिद्धार्थ कपूरने दाऊदची भूमिका साकारली आहे. त्यामुळे खऱ्या-खुऱ्या आयुष्यात बहीण-भाऊ असलेले श्रद्धा-सिद्धार्थ आता मोठ्या पडद्यावरही बहीण-भावाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
डॅडी... म्हणजेच अरुण गवळी यांच्या गॅंगने जेव्हा हसीना यांच्या पतीला मारलं, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘आपा’चा प्रवास सुरु होतो. त्यामुळे आपल्याला चित्रपटात महिला गँगस्टरचं नेतृत्वात गँगवॉर पाहायला मिळणार हे नक्की...
1993 साली मुंबईत झालेले बॉम्बस्फोट झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट आले. नेहमी भाई, डॉन या नावानं दाऊद इब्राहिम चित्रपटामधून आपल्याला पाहायाला मिळाला. पण आजपर्यंत नेहमीच आऊट ऑफ फ्रेम असणाऱ्या हसीना पारकरचं आयुष्य कोणालाच माहिती नव्हतं. पण हा ट्रेलर पाहता हसीना पारकर या नावाचं कोडं चित्रपटात सुटण्याची शक्यता बाळगायला हरकत नाही. शूट आऊट अॅट लोखंडवालाचे दिग्दर्शक अपूर्व लाखियांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.
फक्त दाऊद इब्राहीमची बहिण ही ओळख असणाऱ्या हसीना यांचा ‘आपा’ होईपर्यंतचा प्रवास आपल्याला या चित्रपटतात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘आशिकी 2’ची आरोही शिरकेचा दंबग अंदाज लोकांना किती पसंत पडणार का? याचं उत्तर 18 ऑगस्टलाच कळेल...
ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement