एक्स्प्लोर

BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...

गेली चार महिने सर्वच वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सामाजिक माध्यमं आणि राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ज्या आकड्यांचा आधार घेऊन जनतेसमोर कोरोना संदर्भातील माहिती सादर करीत असतात, अशी ही महत्त्वपूर्ण आकडेवारी बनविण्याचं काम आरोग्य विभागातील अधिकारी न थकता, न रजा घेता बनवत असतो, तो अधिकारी म्हणजे डॉ प्रदीप आवटे.

गेली चार महिने सर्वच वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सामाजिक माध्यमं आणि राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ज्या आकड्यांचा आधार घेऊन जनतेसमोर कोरोना संदर्भातील माहिती सादर करीत असतात, अशी ही महत्त्वपूर्ण आकडेवारी बनविण्याचं काम आरोग्य विभागातील अधिकारी न थकता, न रजा घेता बनवत असतात. त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे डॉ प्रदीप आवटे. राज्याच्या आरोग्य विभागात सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम करीत आहे. या अधिकाऱ्यांनी बनविलेल्या आकड्यांमुळेचे सर्वसामान्यांचे डोळे कधी वटारले जातात तर कधी सुटकेचा नि:श्वास सोडतात. त्यांची भूमिका ठरलेली असते राज्यभरातून आलेल्या आकड्यांची व्यवस्थित माहिती घेणे आणि तिचं अंतिम सादरीकरण, विभागाचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्धीमाध्यमांमार्फत जनतेपुढे सादर करणे. त्यांनी दिलेला आकडा हा 'फायनल' असतो आणि तो अधिकृतरित्या शासनाच्या सर्व स्तरावर हा आकडा ग्राह्य धरला जातो. या आकड्यांमध्ये सगळ्यांचाच जीव गुंतलेला असतो, असा आकडा सादर करणारा अवलिया अनेक लोकांना माहिती असण्याची गरज नाही. कारण अनेकांना आपल्याला काय आकडा मिळाला की काम संपत पण तो आकडा आपल्यापर्यंत पोहोचविताना त्यांची, सहकाऱ्यांची आणि विभागाची होणारी दमछाक फक्त त्यांनाच माहीत. कोरोनाच्या काळात प्रत्येकांचं लक्ष हे आकड्यांवर असतं, किती वाढले आणि किती कमी झाले, तर किती मृत्यू पावले . साथीच्या आजारात आकड्यांना फार महत्त्व असतं. यामध्ये फक्त आकडेच बघितले जातात, असं नाही तर त्यांचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून अहवाल सादर करावा लागतो. त्या अहवालाच्या आधारवर अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक धोरणं ठरत असतात. रुग्ण किती बरे झाले, किती नव्या रुग्णांचे निदान झाले, किती गंभीर आहेत, किती रुग्णांना सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत, किती रुग्ण गंभीर ते अति अतिगंभीर आहेत, किती रुग्ण लक्षणविरहित आहेत, किती लोकांना विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या वाढीचा दर काय आहे, रिकव्हरी रेट किती आहे, मृत्यू दर किती आहे. या आणि आणखी काही सर्व आकड्यांची रोज गोळा बेरीज, गुणाकार, भागाकार आणि विविध जनऔषध शास्त्रातील फॉर्म्युल्यांचा वापर करून दिवसभराची आकडेवारी सर्व जिल्ह्यातून घेऊन ती विस्तृतपणे नागरिकांना समजेल या भाषेत मांडण्याचा काम, हे एकात्मिक रोग सर्वेक्षण विभाग हा दररोज करत असतो. डॉ आवटे स्वतः जाहीरपणे सांगतात हे सर्व विभागाचं काम आहे, यामध्ये माझ्या सोबत अनेक सहकारी काम करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने कीटकशास्त्र तज्ञ, साथरोगशास्त्र तज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ, प्रशिक्षण सल्लागार आणि डेटा मॅनेजर त्यातच विभागाच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभत असतं. साथीच्या आजाराच्या आकड्याबसोबत काम करण्याचा डॉ आवटे यांना तसा प्रदीर्घ अनुभव आहे. 2009 ते 2011 या तीन वर्षाच्या काळात त्यांनी 'स्वाईन फ्लू' या साथीच्या आजाराचं काम सांभाळलं होतं. त्यांच्या मते तेव्हाही परिस्थिती अशीच गंभीर होती. रुग्णसंख्येचे आकडे आणि मृताचे आकडे तेव्हाही होते. त्यावेळी पुण्यातील काही भागात वातावरण इतके तंग होते की कुणी रिक्षावाला तेव्हा ससून हॉस्पिटलच्या जवळपास पण फिरकत नव्हता. तेव्हा या आजाराची लोकांच्या मनात चांगलीच भीती होती. तेव्हाही लोक तोंडाला मास्क लावून फिरत होते. त्यावेळी हा आजार मेक्सिको मधून आला होता. त्यावेळी मेक्सिकोसारखा बंदचा पॅटर्न येथे राबवायचा का यावर जोरदार चर्चा रंगली होती सुदैवाने हळू-हळू तो आजार कमी झाला. त्यावेळी रोज आकडे मांडले जायचे ज्या पद्धतीने आज मांडले जात आहे. पण स्वाईन फ्लू आणि कोरोनाची आजाराची तुलना केली तर कोरोना हा त्या मानाने खूप गंभीर आहे या आजाराचा प्रसार खूप वेगाने होते आणि रुग्णांची आकडेवारी तर ही अभूतपूर्व अशी आहे. आरोग्य विभागातील कुणीही दीड लाख रुग्ण संख्या या तीन चार महिन्यात पहिली नव्हती त्याशिवाय मृतांचा आकडा इतक्या वेगाने वाढताना कुणीही पाहिला नव्हता. डॉ आवटे आपल्या या आकड्याच्या कामाबाबत बोलतांना सांगतात की, "मी ज्या विभागात काम करतो त्याच्यामध्ये आकड्यांचं विश्लेषण करणे हा एक भाग आहे. यापेक्षा विभागात राज्यस्तरावर मोठं काम दैनंदिन पणे सुरु असते . या आकड्याच्या कामाबाबत बोलायचं झाले तर राज्यात 109 प्रयोगशाळा आहेत तेथे या आजाराचं निदान होत असते. केंद्र सरकारचं कोविड -19 हे वेबपोर्टल आहे त्यावर सर्व जिल्ह्यातून माहिती ही या वेबपोर्टलवर अपलोड होत असते. आमच्या टीम मध्ये या कामाचं वाटप झालेलं असतं, कुणी कोणते आकडे बघायचे, काही जण पॉझिटीव्ह रुग्ण किती आले ते बघतात. त्यासोबत त्या विविध लक्षणानुसार त्याची वर्गवारी करतात. काही सदस्य राज्यातील एकूण आणि जिल्हानिहाय मृत्यूची संख्या, त्यामध्ये वयोगट, त्यांच्या मृत्यूची सविस्तर कारणे, त्यांना अगोदर पासून काही आजार होते का ? तर काही सदस्य, किती लोकं उपचार घेऊन घरी गेले ही ढोबळमानाने माहिती घेत असतात. त्यानंतर दररोज राज्यातील सर्व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि त्यासंदर्भातील लोकांशी रोज व्हिडिओ कॉन्फरंसिंग, दिवसभरातील काही अडचणी, ज्या जिल्ह्यात जास्त रुग्ण संख्या वाढ झाली त्याठिकाणी काही वेगळी मदत कींवा काही समस्या भेडसावत असतील तर त्यावर उहापोह या चर्चेमध्ये होत असतो , त्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकाच्या प्रोटोकॉलमध्ये काही बदल असल्यास त्यावर सविस्तर चर्चा करणे. अशा पद्धतीचं दैनंदिन काम हे रोज सुरु असते, शक्यतो अशा काळात सुट्टी घेणे शक्य नसते. कारण रोज अपडेट येत असतात." या व्यतिरिक्त डॉ आवटे त्यांच्या विभागाबद्दल महिती देताना सांगतात कि, "आम्ही तीन 'R' वर काम करतो. रिपोर्टींग - पूर्ण माहिती विस्तृतपणे गोळा करणे, रेकग्निशन - त्या आजाराला योग्य रित्या ओळखणे आणि निदान करणे. रिस्पॉन्स - तुम्ही त्या आजाराला कशा पद्धतीने प्रतिसाद देताय किंवा उपचार देत आहात. तसेच जिल्हा पातळीवर या आजाराबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. वर्षभर या विभागाचे काम सुरु असते. पूर्वीच्या काळात 8 लोकांमध्ये चालणारा हा विभाग आता 30लोकांचं अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन सध्या काम करीत आहे. तसेच सध्या वॉटरबोर्न डिसीसवर काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणे, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे त्याला स्वच्छता सर्वेक्षण सर्वे असं म्हणतात. त्यानंतर डासापांसून पसरणारे आजार , डेंगू, मलेरिया, माकडताप या आजारांवर लक्ष ठेवून त्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरुच असते. उन्हाळ्यात उष्माघाताच्या केसेस येतात, मग त्यावर मार्गर्दर्शक सूचना बनविणे त्या सर्व जिल्ह्याना पाठविणे अशी आणि विविध प्रकारची कामे ही आमच्या विभागामार्फत वर्षभर सुरु असतात." BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा... अनेक वेळा असा आरोप होतो राज्य सरकार आकडे लपवताय किंवा मृत्यूचे आकडे खरे दाखवत नाही, असं आरोप झाल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते. त्यावर डॉ आवटे अशी माहिती देतात की, "खरं तर आम्ही या भानगडीत कधीच पडत नाही. आमच्यावर कधीच कुणाचा दबाव येत नाही किंवा तुम्ही हे आकडे असे दाखवा म्हणून सांगत नाही. जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड मागचा इतिहास बघितला तर सर्वच आजारात आपले आकडे हे भारतात इतर राज्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ आपल्या विभागाचं सर्वेक्षण व्यवस्थितपणे सुरु आहे. कारण आपल्याकडे टेस्टिंगचं प्रमाण जास्त त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्याचा आकडा वाढतोय हे आमच्या लक्षात येत असते. निश्चितच काही वेळा एवढे आकडे हाताळताना कधी तरी चूक होऊ शकते. मानवी चुका या होऊ शकतात, कधी तरी संगणकात फॉर्म्युला टाकताना काही चुका होतात. हे मान्य आहे मात्र लपवाछपवीचा प्रश्नच उद्भवत नाही. मृतांचा आकडा त्या-त्या जिल्ह्याने भरणे अपेक्षित असते, कधी रिपोर्ट आलेला नसतो मग तो मृतांचा आकडा मागे राहतो. मग एकदमच सर्व आकडे दिले जातात. त्यामध्येही ज्यावेळी जनतेसमोर ही माहिती मांडतो त्यावेळी आम्ही जाहीरपणे सांगतो हे मृत्यू आजचे आहेत किंवा कधीचे आहेत. आकडे मागे पुढे होतील पण जेवढे रिपोर्ट झाले आहेत हे जाहीर होणारच. प्रदीप आवटे यांचा पेशा डॉक्टरकीचा असला तरी साहित्य विश्वात त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. या कवी मनाच्या डॉक्टरला जेव्हा आकड्याविषयी वारंवार विचारलं जात तेव्हा त्याच उत्तर ही त्याचपद्धतीने असतं, ते म्हणतात, "आकडे हे आकडे नसतात, प्रत्येक आकड्यांमागे एक माणूस उभा असतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही म्हटलं 5218 रुग्णांना बाधा झाली, तेव्हा ती 5218 ही माणसे असतात. अमुक इतके मृत्यू झाले, तो मृत्यूचा आकडा नसतो तो प्रत्येक मृत्यू म्हणजे एक माणूस आहे, त्याचं आपलं एक कुटुंब आहे, त्याची एक सामाजिक संस्था आहे. त्या सगळ्या आकड्यांकडे तुम्हाला सहानुभूतीने आणि सहृदयतेने पाहता आले पाहिजे, हे का झालं, हे आपल्याला टाळता येईल का, यांच्यामध्ये आणखी काय करता येईल. आकड्यांकडे तुम्ही जेव्हा याअर्थाने पाहाल तेव्हा ते आकडे तुमच्याशी बोलू लागतात आणि आकडे तुम्हाला खूप काही आकड्यांच्या मागची कहाणी सांगू शकतात. तसेच आत्ताच्या आरोग्य विभागामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे जर तुम्हाला एखादी समस्या सोडवायची असेल तर ती नेमकी समस्या मोजा. त्या मोजमापातच 50 टक्के उत्तर आहे. त्यामुळे नीट समस्या मोजणं हे आमचं काम आहे. सर्वेक्षण विभाग हा कोणत्याही आरोग्यव्यवस्थेचा पाठीचा कणा असतो. यामुळे अनेक धोरणं ठरत एखाद्या कार्यक्रमाला त्याची गांभीर्यता बघून निधी ठरत असतो."
" "आकडे हे आकडे नसतात, प्रत्येक आकड्यांमागे एक माणूस उभा असतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही म्हटलं 5218 रुग्णांना बाधा झाली, तेव्हा ती 5218 ही माणसे असतात. अमुक इतके मृत्यू झाले, तो मृत्यूचा आकडा नसतो तो प्रत्येक मृत्यू म्हणजे एक माणूस आहे, त्याचं आपलं एक कुटुंब आहे, त्याची एक सामाजिक संस्था आहे. त्या सगळ्या आकड्यांकडे तुम्हाला सहानुभूतीने आणि सहृदयतेने पाहता आले पाहिजे, हे का झालं, हे आपल्याला टाळता येईल का, यांच्यामध्ये आणखी काय करता येईल. आकड्यांकडे तुम्ही जेव्हा याअर्थाने पाहाल तेव्हा ते आकडे तुमच्याशी बोलू लागतात आणि आकडे तुम्हाला खूप काही आकड्यांच्या मागची कहाणी सांगू शकतात. तसेच आत्ताच्या आरोग्य विभागामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे जर तुम्हाला एखादी समस्या सोडवायची असेल तर ती नेमकी समस्या मोजा. त्या मोजमापातच 50 टक्के उत्तर आहे. त्यामुळे नीट समस्या मोजणं हे आमचं काम आहे. सर्वेक्षण विभाग हा कोणत्याही आरोग्यव्यवस्थेचा पाठीचा कणा असतो. यामुळे अनेक धोरणं ठरत एखाद्या कार्यक्रमाला त्याची गांभीर्यता बघून निधी ठरत असतो." "
-डॉ. प्रदीप आवटे
डॉ प्रदीप आवटे हे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. आज असंख्य डॉक्टर त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात जोरदार काम करीत आहेत. तसेच आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, या दिनाच्या सर्वच डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा ! सध्याच्या कठीण काळात सेवा देत असणाऱ्या सर्व डॉक्टरांना मनाचा मुजरा !

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्लाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget