Maharashtra Live Blog Updates: शितल तेजवानीच्या जामीनाला सरकारी पक्षाच्या वकिलांकडून विरोध; आमचीही फसवणूक केल्याचा महार वतनदारांच्या वकिलांचा दावा
Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालीय. त्यामुळे नगर परिषदेसमोर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्रॉंग रुमची पाहणी करण्यासाठी गेले असता नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले. यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Pune News; पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेत बदल; जाणून घ्या किती केली वेगमर्यादा?
कात्रज बायपास महामार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेटवर पर्यंतच्या संपूर्ण मार्गावर आता ताशी 40 किमी वेगमर्यादा केली आहे. यापूर्वी ताशी ३० वेगमर्यादा करण्यात आली होती मात्र आता वाहतूक शाखेने यात बदल करुन ताशी 40 वेगमर्यादा केली आहे. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर उपाययोजना म्हणून वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेगमर्यादा क्रॉस केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतून शाखेनं सांगितलं आहे. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीड गनच्या साहाय्याने कारवाई केली जाणार आहे.वाहनांची गर्दी, जड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यांची सुधारणा सुरू असतानाही अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यात वेगमर्यादा निश्चित करणे हा महत्वाचा उपाय मानला जात आहे.
Nanded Crime News: सक्षम ताटेच्या हत्येपूर्वी रेकी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; आतापर्यंत सहा जणांना अटक
नांदेड: नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या सक्षम ताटेच्या हत्येच्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, हत्येच्या दिवशी दोन आरोपींनी सक्षमच्या घराची रेकी केल्याचे उघड झाले आहे. सक्षमचे लोकेशन घेण्यासाठी आरोपीने त्याच्या घरासमोर पाळत ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी हे सीसी सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. 27 नोव्हेंबर रोजी सांयकाळी सक्षमची आंतरजातीय प्रेम संबंधातून हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. या हत्येनंतर हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने रेकी करून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
























