एक्स्प्लोर

Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी

Pune News: आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधी संबंध आला नाही, ना आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं नाव तिकडे ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज केला, असे देखील राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

Pune News: राज्य निवडणूक आयोगावर (Maharashtra Election Commission) रोज नवनवे आरोप तर होतायतचं, पण आता निवडणूक आयोगानेचं आम्हाला बारामती (Baramati) आणि इंदापूरमध्ये (Indapur) घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदाराने निवडणूक आयोगाकडे केलीये. आयोगाला अडचणीत आणणारी ही मागणी करणारे पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) शरद पवारांच्या राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar Faction) युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख (Imran Shaikh) आणि त्याचे वडील युनूस शेख (Yunus Shaikh) हे आहेत. 

इम्रानचे वडील युनूस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेत तर आई रबिया शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्स्फर करण्यात आलंय. मुळात इम्रान याचं कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून भोसरी विधानसभेत वास्तव्यास आहेत. 2024 च्या विधानसभेला ही इम्रानचे वडील युनूस आणि आई रबिया यांनी भोसरीत मतदान केलंय. याचा पुरावा ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 

Pune News: निवडणूक आयोगाने बारामती अन इंदापुरात घर घेऊन द्यावं

आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधी संबंध आला नाही, ना आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं नाव तिकडे ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज केला. तरी ही निवडणूक आयोगाने हा स्वतःहून कारभार केलाय, मग आता बारामती आणि इंदापुरच्या त्या पत्त्यावर मला आणि माझ्या पत्नीला त्यांनी घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी करत युनूस शेख यांनी निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. 

Pune News: ...म्हणून हे षडयंत्र रचलं

तर दुसरीकडे मला आगामी पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढण्याची इच्छा आहे, मात्र मला तिकीट मिळणं कठीण दिसतंय. असं म्हणत इम्रान शेख यांनी मी माझ्या आई-वडिलांपैकी एकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत होतो. हे विरोधकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी हे षडयंत्र रचलं. आतापर्यंत आम्ही वोट चोरी पाहिली होती, आता उमेदवारांची अन मतदारांची पळवापळवी सुरु झाली, असा आरोप यानिमित्ताने इम्रान शेख यांनी केलाय. 

Pune News: नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली? नेत्यांचा निवडणूक आयोगाला सवाल

इतकंच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी सुद्धा यावरुन निवडणूक आयोगासह विरोधकांना लक्ष केलंय. आमच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या आई-वडिलांची नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली? असा प्रश्न या नेत्यांनी एक्स प्लँटफॉर्मवरून निवडणूक आयोगाला विचारलाय. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून काही उत्तर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Beed News: बीडमध्ये रात्री मोठा राडा, दीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन् पोलिसांचा लाठीचार्ज; स्ट्राँगरूम बाहेर नेमकं काय घडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Embed widget