एक्स्प्लोर

'रॅकेट' रेडलाईट एरियाचे...   

एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही.

वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरुपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आजघडीला देशातील महानगरांना जोडणाऱ्या हायवेंवर याचा मोठा प्रसार आढळतो. ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, पत्र्याची शेड्स यात हे लोक आसरा घेतात. सर्व मोठ्या शहरांत एखाद्या गल्लीत, तालुक्यांच्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, पंचक्रोशीतल्या एखाद्या तालेवार गावात एखाद्या खोपटात हा व्यवसाय चालतो. ट्रक चालकासारख्या वाहत्या ग्राहकांसोबत फिरता व्यवसाय करण्याचा प्रवाहही आजकाल आढळून येतोय. पूर्वी एखाद्या वस्तीत मर्यादित असणाऱ्या या लोकांकडून छोट्यामोठ्या शहरात एखाद्या अपार्टमेंटमध्ये एक दोन सदनिका भाड्याने घेऊन त्यात कुंटणखाना चालवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गर्दीची सार्वजनिक ठिकाणे एसटी स्थानक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थियेटर्स, बागा, अद्ययावत हॉटेल्सचे पार्किंग स्लॉट्स अशा ठिकाणी हे मुक्त वा छुप्या पद्धतीने वावरत असतात. स्पा, मसाज सेंटर्सच्या नावाखालीही हा व्यवसाय करण्याचे प्रमाण जाणवण्याइतके वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने याला उधाण आलेले आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही. वेश्या व्यवसायात येणाऱ्या स्त्रियांची विभागणी प्रामुख्याने दोन गटात होते, एक म्हणजे स्वेछेने यात सामील होणाऱ्या स्त्रिया आणि दुसरे म्हणजे बळजबरीने ढकलल्या जाणाऱ्या स्त्रिया. एकूण संख्यासूत्रात जवळपास 95 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अनिच्छेने यात ओढल्या गेलेल्या महिला असतात, तर केवळ 5 टक्के महिला स्वेच्छेने यात आलेल्या असतात. स्वेच्छेने आलेल्या महिलांपैकी 90 टक्के महिला त्यांचे जगण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर हा मार्ग स्वीकारतात तर केवळ इझी मनी या हेतूने आलेल्या पाच टक्के प्रमाणात असतात. स्वेच्छेने आलेल्या महिलांपैकी साठ ते सत्तर टक्के महिलांना जेमेतेम पाचेक वर्षात या व्यवसायातून बाहेर पडावेसे वाटते, पण दुर्दैवाने त्यांचे बाहेर पडण्याचे दरवाजे त्यांनीच बंद केलेले असतात. त्यामुळे नंतर हतबलता म्हणून त्या या व्यवसायात राहतात. इझीमनी म्हणून यात आलेल्या महिलांचे तारुण्य ओसरल्यानंतरचे दिवस इतर वेश्यांच्या मानाने अतिशय हलाखीचे जातात असं अनुभव सांगतो. केवळ पैसा हे उद्दिष्ट ठेवल्याने त्यांच्या संकटसमयी इथली अन्य स्त्री त्यांना कधीच मदतीचा हात देत नाही. त्यांचे ग्राहक देखील त्यांच्या पैसाप्रेमी स्वभावाने बेजार होऊन जातात. ज्या स्त्रिया बळजोरीने आलेल्या असतात, त्या एकमेकींच्या आधाराने जगतात, एकमेकांसाठी त्या देवाचे रूप असतात. कुंटणखान्यातील भिंतीवरल्या देवांच्या तसबिरी त्यांना कधी आपल्याशा वाटत नाहीत मात्र आपल्या घासातला घास देणारी वेळप्रसंगी दवादारुला मदत करणारी सख्खी शेजारीणच त्यांची देवता असते. वेश्याव्यवसायात दाखल होण्याचेही काही ठराविक वय असते. चाळीशीनंतर कुणी बाई यात येत नाही आणि जरी कुणी आलीच तरी ती टिकत नाही, तिच्या अंगांचे पोपडे उडून गेले तरी तिच्या कातड्याचे बोचकारे सरत नाहीत, कारण इथल्या रितीभातीपासून ती अनभिज्ञ असते. मागील दोन दशकाआधी नुकत्याच वयात आलेल्या किंवा येऊ घातलेल्या मुली यात आणायच्या म्हणजे मोठी रिस्क समजली जायची. कारण बालअत्याचार प्रतिबंधक कायद्याची भीती असायची. त्यामानाने सोळा अठरा वर्षाच्या पुढील वयोगटातील मुली आणण्याकडे जास्ती कल असे. साधारण चौदा ते अठरा वर्षे, एकोणीस ते चोवीस वर्षे, पंचवीस ते तीस वर्षे आणि तीस ते छत्तीस वर्षे अशा चार वयोगटातील स्त्रिया असत. एकोणीस ते चोवीस या वयोगटासाठी डिमांड जास्त राही. त्या खालोखाल चौदा ते अठरा, आणि त्या नंतर पंचवीस ते तीस वयोगटाला भाव असे. वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ठिकाणांना प्रत्येक राज्यात वेगवेगळे शब्द आहेत, आपल्याकडे त्याला कुंटणखाना असे संबोधले जाते. हा कुंटणखाना बहुतांश करून एखादी स्त्रीच चालवत असते. तिचा एक रखेल पुरुष असतो जो धंद्यात लक्ष घालून असतो. कुंटणखान्यात सर्व वयोगटाच्या बायका मागणीनुसार अव्हेलेबल असाव्यात याकडे तिचे लक्ष असते. एका अड्ड्यातून दुसऱ्या अड्ड्यात बायकांची फिरवाफिरवी वा बदली करून देणारे दलाल या बायकांच्या संपर्कात असतात. एकच बाई एका कुंटणखान्यात वर्षानुवर्षे ठेवली जात नाही. तिची मागणी कमी झाली वा तिच्याकडे आकृष्ठ होण्याचे प्रमाण घटले की तिला तिथून उचलून दुसरीकडे नेले जाते. बऱ्याचदा हा मामला त्या शहरातच वा आसपासच्या परिसरात आटोपला जातो. तिथूनही काही काळानंतर शहर बदलून तर कधी कधी राज्य बदलून या बायका पोहोच केल्या जातात. हे काम योजनाबद्ध पद्धतीने चालते. बऱ्याचदा दहा किंवा त्याहून अधिक बायकांची अदलाबदली होते, खाजगी वाहनातून हे स्थलांतर पार पाडले जाते. जी बाई नेली आणली जाते त्या बाईकडून, तसेच जिथून तिला आणले जाते त्या कुंटणखान्याच्या मालकिणीकडून व जिथे तिला पोहोच केले जाते, तिथल्या कुंटणखान्याच्या मालकिणीकडूनही या दलालांना पैसे भेटतात. पण ही रक्कम फार मोठी नसते. सर्वसाधारणपणे प्रवासाचे अंतर, नेण्याआणण्याचा खर्च, जेवण याची सरासरी काढून त्या रकमेची विभागणी करून प्रत्येक बाईपोटी त्या दलालास हजारएक रुपये मिळतात. हे काम आजकाल बायकांमार्फतही केले जाते. धंद्यातील जुनी स्त्री यातल्या सर्व खाचाखोचा जाणून घेऊन हा उद्योग चालू ठेवते. या दलालांच्या वर्तुळाहून मोठे वर्तुळ असते ते मुली पुरवणाऱ्या दलालांचे. ग्रामीण आणि शहरी भागातून आणलेल्या मुलींची वर्गवारी वेगवेगळी असते. त्यासाठीचे कष्ट आणि अडचणीही वेगवेगळ्या असतात. ग्रामीण भागातल्या मुली आणणारी यंत्रणा तीन स्तरांवर काम करते. यातला पहिला स्तर असतो तो स्थानिक लोकांचा. या लोकांत वयाने ज्येष्ठ असणारे लोक जास्ती असतात कारण त्यांच्या बोलण्याला समोरचा माणूस वयाच्या वजनाने दबून जात भुलून जातो. गावातल्या यात्रा-जत्रांत, उरुसात, मोठाल्या लग्नसमारंभात, सणवारात, उत्सवात हे लोक ‘लक्ष्या’वर ध्यान ठेवून असतात. गावातील गरीब घरे, एकाच घरात अनेक अपत्ये असलेली कुटुंबे, उदरनिर्वाह नसल्यामुळे उपासमार होणारी कुटुंबे यांच्या रडारवर असतात. तारुण्यसुलभ भावनांच्या अनिवार्यतेमुळे पाऊल वाकडे पडल्याने बदनाम झालेल्या मुलींची घरे, लग्न न जमणाऱ्या मुलींची कुटुंबे, एखादी अत्यंत उफाडयाच्या अंगांची ठेवण असणारी मुलगी ज्यांच्या घरी आहे अशी घरे, पतीचे वा घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने रस्त्यावर आलेले कुटुंब, व्यसनाधीन कुटुंबातील कलहसमस्यांना त्रासलेली कुटुंबे यावर त्यांचे विशेष लक्ष असते. आर्थिक आमिष दाखवून, नोकरीचे वा लग्नाचे आमिष दाखवून अत्यंत नगण्य रकमेत या मुलींच्या घराच्या लोकांना पटवले जाते. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या लोकांना हे यमदूत चक्क देवदूत वाटतात! बऱ्याचदा नातलगही अशा लोकांच्या संपर्कात असतात. सावत्र आई, सावत्र वडील, सावत्र मामा किंवा सांभाळ करणारे दूरचे नातलग यांचा यात भरणा होतो. एकदा का बायका पक्क्या झाल्या की दुसऱ्या स्तरांतील दलालास त्याची माहिती दिली जाते. हे काम करणाऱ्यात दुर्दैवाने स्त्रिया पुरुषांच्या इतक्या समप्रमाणात आढळून येतात. वाईट चालीची बाई, स्वतः असा व्यवसाय करणारी स्त्री किंवा केवळ पैशाच्या लोभाने हे काम करणारी बाई यात गुंतलेल्या दिसतात. हे काम करणारे पुरुष मोस्टली मध्यमवयीन वा तरुण असतात. कोणकोणत्या गावातून किती सावज हाती लागतील याचे तेज आडाखे यांच्याकडे असतात, तसेच खालच्या स्थानिक दलालास किती हिस्सा द्यायचा याचे मार्मिक गणित यांना पक्के जमते. आपल्याला किती दलाली ठेवून मुली किती रकमेस पुढे सारायच्या याचे त्यांना नेमके ज्ञान असते. हे दलाल चलाखीने स्वतःची आपल्या खालच्या स्थानिक दलालांची सेफ्टी राखतात, एखाद्या रेडमध्ये सेक्सवर्कर्सचे रॅकेट पकडले गेले तरी या टप्प्यातले लोक सहसा हाती लागत नाहीत. आपण गोळा केलेल्या मुली कुठे पोहोच केल्या म्हणजे आपल्याला जोखीम येणार नाही आणि पैसाही मुबलक येईल याचा अंदाज बांधून ते सप्लायवाल्या मुख्य दलालांना संपर्क करतात. मुलींच्या रॅकेटमधला हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक. हे लोक एखाद्या चेनसारखे काम करतात. यांना डिमांड माहिती असते आणि सप्लाय कुठून येणार आणि कसा येणार याची नेमकी माहिती असते. एक प्रकारचे हे प्लेसमेंट सेंटर हे लोक चालवतात. ‘कोऱ्या माला’ची बोली ठरवण्यात यांचा हातखंडा कुणी धरत नाही. प्रौढत्वाकडे झुकलेल्या बाईला कुठे पैसे येऊ शकतात याच्या परफेक्ट टिप्स यांच्याकडे असतात. त्या त्या शहरातील स्थानिक राजकारणी आणि पोलिस यांच्याशी यांचे लागेबांधे असतातच. गावातून निघालेल्या मुली सहसा एकल वाहनातून कधीच आणल्या जात नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच जास्त सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते. या मुली आणताना त्यांच्यासोबत एक तरुण आणि किमान एक प्रौढ पुरुष हा असतोच. मागील काही वर्षात मात्र एस्कॉर्टचे काम करणाऱ्यात स्त्रियाही आढळत आहेत. वाटेत त्या मुलींवर देखरेख ठेवून त्यांना खाऊपिऊ घालून कपडालत्ता देऊन त्यांना इच्छित स्थळी आणले जाते. इथे आणल्यानंतर त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून व बिंग फुटू नये म्हणून काही खास लोक काम करत असतात. त्या नंतर त्या मुलींचा ठरलेला सौदा रोखीने पार पडतो. कोणतीही मुलगी पोहोच होण्याआधी निम्मी रक्कम पहिल्या दलालाला खालच्या दलालास द्यावी लागते. तिथून ती स्थानिक दलालाकडे जाते त्यातलाच काही हिस्सा मुलीच्या नातलगांना दिला जातो. मुली आणल्या की त्यांना कसे धंद्याला लावायचे याचे तिथल्या बायकांना चांगली समज असते. (क्रमशः) (या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची शारीरिक, मानसिक, सामाजिक परिस्थिती सर्वसामान्य माणसांना उमजावी व हा उपेक्षित घटक नेमका का व कसे जगतो याची त्रोटक माहिती लोकांना व्हावी हा या लेखमालेमागील हेतू आहे. समाजातील एक घटक एकीकडे यांचे शोषण करतो तर दुसरा मोठा घटक यांची उपेक्षा करत यांचा तिरस्कार करतो, यांची घृणा केली करतो याला अल्पसा तरी आळा बसावा हे लेखनप्रयोजन आहे.) समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग : नवरात्रीची साडी... रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनी
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Embed widget