BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं?
BCCI Central Contract Players List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केंद्रीय कराराची यादी जाहीर केली आहे. नव्या यादी ईशान किशनला स्थान मिळालेलं नाही.

BCCI Central Contract List मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पुढील सत्रासाठी केंद्रीय कराराची घोषणा केली आहे. कसोटी आणि वनडेचा कर्णधार शुभमन गिलचं प्रमोशन झालं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं डिमोशन झालं आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह अ ग्रेडमध्ये कायम आहेत. बीसीसीआयनं केंद्रीय कराराच्या यादीतून मोहम्मद शमीचं नाव वगळलं आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळालेला ईशान किशन केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेरचं आहे.
मोहम्मद शमी आणि ईशान किशन बाहेर
बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीतून मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. मोहम्मद शमीनं रणजीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेलं नाही. आता त्याला केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये संघात स्थान मिळवणाऱ्या ईशान किशनला देखील केंद्रीय करारात स्थान देण्यात आलं नाही. ईशान किशनला गेल्या यादीतून देखील वगळण्यात आलं होतं. बीसीसीआयनं ईशान किशन प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळत नसल्यानं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय करारातून वगळलं आहे.
याशिवाय सरफराज खान, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला देखील केंद्रीय करारातून वगळण्यात आलं आहे.
पाच नावं वगळली - मोहम्मद शमी, ईशान किशन, रजत पाटीदार, सरफराज खान, मुकेश कुमार
BCCI ची नवी केंद्रीय करार यादी
ग्रेड A- शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा
ग्रेड B- रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर
ग्रेड C- अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नीतीश कुमार, रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई, ऋतुराज गायकवाड
🚨 News 🚨
— BCCI (@BCCI) February 9, 2026
BCCI announces Annual Player Retainership for Team India Senior Men and Senior Women for the 2025-26 season#TeamIndia | Details 🔽https://t.co/Rd3pUCPRr9 pic.twitter.com/UNYRThs1kW





















