एक्स्प्लोर

ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

ZP Eelction results आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 172 जागा जिंकल्या असून पुणे जिल्ह्यात जवळपास 44 जागांवर विजय मिळवला आहे.

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषद (ZP election) आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ खुललं आहे. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सर्वाधिक जागा जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र, कायमच ग्रामीण महाराष्ट्रातील त्यातचही पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वरचष्मा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही कमालीचं कमबॅक केलं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकत दिवंगत अजित पवारांची ग्रामीण भागातील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत ही निवडणूक लढवण्यात आली. त्यामध्ये, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठं यश राष्ट्रवादीला (NCP) मिळालं आहे. राष्ट्रवादीच्या या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नेतेमंडळी अजित पवारांची आठवण काढत भावुक होत आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकल्या असून आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 172 जागा जिंकल्या असून पुणे जिल्ह्यात जवळपास 44 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोसह जल्लोष केला. तर, काहींचा दादांच्या आठवणीने कंठ दाटल्याचंही पाहायला मिळालं. पुणे जिल्हा परिषदेच्या 74 जागांसाठी ही निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 40 पेक्षा जागा जिंकत पक्षाचं वर्चस्व सिद्ध केलंय. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसला करावा लागला होता. त्यामुळे, जिल्हा परिषद निवडणुकीत येथील जनता राष्ट्रवादीला किती स्वीकारेल हाही प्रश्न होता. मात्र, राष्ट्रवादीचं कमबॅक राष्ट्रवादीच अस्तित्व सिद्ध करणारं आहे. मात्र, राष्ट्रवादीचं हे यश पाहायला पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नाहीत याचं दु:ख सर्वांनाच आहे. या निकालावर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देत हा निकाल अजित दादांच्या विचारांवरील अढळ श्रद्धा असल्याचं त्यांनी म्हटलं.    

''आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर तळागाळातील माणसासाठी झटत विकासाला गती दिली. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे. या माध्यमातून दादांचा वारसा जपत अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे,'' अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

हेही वाचा

ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget