एक्स्प्लोर

BLOG: 'लाईफगुरु'चा खरा चेहरा कोणता?

आयुष्य कसे जगावे, जगण्याचा अर्थ काय आहे आणि मनःशांती कशी मिळवावी यावरचे ज्ञान देणारा नव्वदहून अधिक पुस्तके लिहिणारा लेखक जेव्हा जेफ्री एप्स्टीन या विकृत लिंगपिसाटाच्या संपर्कात येतो आणि 'लहान मुली क्युट असतात' असं 'त्या' अर्थाने म्हणतो; 'मुलींना घेऊन या, मजा येईल' असं सांगतो तेव्हा लाइफगुरुचा भ्रमाचा भोपळा फुटतो आणि समोर उरतो तो वासनेचा प्रश्नांकित चेहरा! 

दीपक चोप्रा यांच्याविषयी हे लिहिलं आहे, हे एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच! मन:शांती कशी मिळवावी हे जगाला सांगणाऱ्या इसमाला एका विकृताशी मैत्री करावी वाटते आणि त्याच्याकडील मुलींविषयी आसक्ती निर्माण होते तेव्हा त्याला काय म्हणावे हे तुम्हीच ठरवावे!              

दीपक चोप्रा हे भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक, वैकल्पिक चिकित्सा प्रचारक आणि आध्यात्मिक गुरू म्हणून जगप्रसिद्ध आहेत. 22 ऑक्टोबर 1946 रोजी दिल्लीत जन्मलेल्या चोप्रांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयएमएस) मधून वैद्यकीय पदवी घेतली आहे. 

1970 साली ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. सुरुवातीला एंडोक्रिनोलॉजीमध्ये काम करत असताना, त्यांनी आयुर्वेद आणि ध्यान यांचा अभ्यास सुरू केला. 1990  च्या दशकात त्यांनी 'द सेव्हन स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस' सारखी पुस्तके लिहून आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात लोकप्रियता मिळवली. 

'चोप्रा फाउंडेशन' आणि 'चोप्रा सेंटर फॉर वेलबिइंग'ची स्थापना केली, जिथे ते ध्यान, योग आणि वैकल्पिक उपचारांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या नव्वदहून अधिक पुस्तकांनी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित केले आहे, पण विज्ञानवादी समीक्षक त्यांच्या दाव्यांना छद्मविज्ञान म्हणतात. 

जेफ्री एप्स्टीन प्रकरणात त्यांचे नाव आल्याने, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे; लोक सर्वत्र त्यांची उघड निर्भत्सना करताना दिसताहेत. 2016 ते 2019  दरम्यान त्यांनी एप्स्टीनला पाठवलेले ईमेल आणि त्यांच्या परस्पर भेटीचे तपशील नुकतेच सार्वजनिक करण्यात आले आहेत. 

एप्स्टीन हा अमेरिकन दलाल, भांडवलदार आणि पतपुरवठा करणारा अधम होता हे आता सर्वांना ठाऊक झालेय. बाल लैंगिक गुन्ह्यात तो दोषी सिद्ध झाला होता. 2008 सालीही त्याच्यावर हेच आरोप झाले होते. 

2025 मध्ये अमेरिकन हाउस ओव्हरसाइट कमिटीने एप्स्टीनच्या वीस हजारहून अधिक पृष्ठांच्या फाइल्स उघड केल्या, ज्यात दीपक चोप्रा यांचे नाव तीन हजारहून अधिक वेळा आले आहे. 

हे ईमेल आणि यातील कॅलेंडर एंट्रीज 2008 च्या दोषारोपानंतरच्या आहेत, ज्यात चोप्रा आणि एप्स्टीन यांच्यात आर्थिक सल्ला मसलत, सामाजिक भेटी आणि वैयक्तिक चर्चा झाल्या आहेत. चोप्रा यांनी एप्स्टीनला डिनर, ध्यान सत्र आणि परिषदांसाठी आमंत्रित केले आहे, ज्यात वुडी अॅलन आणि नोम चॉम्स्की सारख्या व्यक्तींचा समावेश आहे. 

आपले नाव समोर आल्यावर दीपक चोप्रा यांनी या संबंधांना आपल्यातला सीमित संवाद होता असे म्हटले आहे आणि कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नाकारला आहे, तसेच अधिकृत तपास अधिकाऱ्यांसोबत माहिती शेअर करण्याची तयारी दाखवली आहे. 

मात्र, ईमेल्समधील काही उल्लेख विवादास्पद आहेत, ज्यात "क्यूट गर्ल्स" आणि "ब्रिंग युवर गर्ल्स" सारखे शब्द आहेत, जे एप्स्टीनच्या विकृत पार्श्वभूमीमुळे प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे दीपक चोप्रा यांना इतकी सहजपणे आपली मान यातून मोकळी करता येणार नाही.   

एप्स्टीन फाइल्समध्ये चोप्रा आणि एप्स्टीन यांच्यातील अनेक ईमेल्स आहेत. नोव्हेंबर 2016 च्या एका ईमेलमध्ये, एप्स्टीनने चोप्रांना डेली मेलच्या एका बातमीचा लिंक पाठवलीय, ज्यात ट्रम्प आणि एप्स्टीनवर आरोप करणाऱ्या केटी जॉन्सन नावाच्या महिलेच्या आरोपांचा उल्लेख आहे. 

त्यात चोप्रांनी विचारलेय, "डिड शी अल्सो ड्रॉप सिव्हिल केस अगेन्स्ट यू?" (तीने तुमच्याविरुद्धचा सिव्हिल केसही मागे घेतलीय का?) एप्स्टीनने उत्तर दिलेय, 'होय'. त्यावर चोप्रांनी प्रतिसाद दिला, 'गुड'. 

या दोघांमधली ही चर्चा काय दर्शवते?

जुलै 2016 च्या दुसऱ्या एका ईमेलमध्ये, चोप्रांनी एप्स्टीनला ट्रम्पच्या पूर्व पत्नी मारला मॅपल्सबद्दल विचारले आहे. एप्स्टीनने सांगितले की, मॅपल्स गर्भवती झाल्यावर, ट्रम्पबरोबरची दहा हजार डॉलर्सची पैज तो हरला होता आणि बदल्यात बेबी फूडच्या ट्रकने त्याची भरपाई करावी लागली. 

मार्च 2017 च्या अन्य एका ईमेलमध्ये, मनःशांती आणि जागरूकतेबद्दल चर्चा करताना, चोप्रा लिहितात की, "गॉड इज अ कन्स्ट्रक्ट. क्यूट गर्ल्स आर रिअल" (देव ही एक मानवी कल्पना आहे. क्यूट मुली हे वास्तव आहे). 

2017 च्या फेब्रुवारीमध्ये, चोप्रांनी एप्स्टीनला इस्रायलला आमंत्रित केलेलं: "कम टू इस्रायल विथ अस. रिलॅक्स अँड हॅव फन विथ इंटरेस्टिंग पीपल. इफ यू वॉन्ट यूज अ फेक नेम. ब्रिंग युवर गर्ल्स. इट विल बी फन टू हॅव यू" (आमच्यासोबत इस्रायलला या. आराम करा आणि आवडेल त्या लोकांसोबत मजा करा. जर तुम्हाला हवे तर बनावट नाव वापरा. तुमच्या मुली घेऊन या. तुम्हाला घेऊन मजा येईल). 

अन्य एका ईमेलमध्ये, एप्स्टीनने चोप्रांच्या कार्यक्रमासाठी दोन मुली पाठवण्याची ऑफर दिली आहे, ज्यावर चोप्रांनी नावे मागितली आहेत. हे कशाचे द्योतक आहे? दीपक चोप्रा यांना त्या मुली कशासाठी हव्या होत्या? 

एप्स्टीन फाइल्सचे संपूर्ण प्रकरण हा एक भयानक आणि जटिल घटनाक्रम आहे, ज्यात शक्तिशाली व्यक्तींच्या नेटवर्कमुळे पीडितांच्या न्यायाची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. 

दीपक चोप्रा यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नसले तरी ईमेल आणि भेटींमधून जे उल्लेख समोर येताहेत ते धक्कादायक आहेत हे कुणीही मान्य करेल.  एप्स्टीनच्या लैंगिक विकृतीची पार्श्वभूमी लक्षात घेता, हे संबंध नैतिकदृष्ट्या प्रश्नांकितच ठरतात. त्यामुळे चोप्रासारख्या लोकांची प्रतिमा भंग होऊन लोकांचा  भ्रमनिरास होणे स्वाभाविक आहे. 

चोप्रा यांच्या आध्यात्मिक शिकवणींमधून प्रेरणा घेणाऱ्यांनी, चोप्रा यांचे एप्स्टीनसोबतचे संबंध विज्ञान आणि चिकित्सक दृष्टीने तपासणे अपेक्षित आहे. चोप्रा असो की अन्य कुणीही असो ज्यांची नावे यात येताहेत त्यांच्या विरोधातील संताप पीडितांच्या समर्थनासाठीही वापरला जावा किंवा अशा नेटवर्क्सविरुद्ध जागरूकता वाढवण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. 

एप्स्टीन फाइल्सवरती व्यक्त होताना नेहमीच सत्याच्या शोधात धैर्याने पुढे जाणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक दोषी व्यक्तींना (मग ते कुणीही असले तरीही) त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले तरच आपल्यातील नैतिकता सचेत आहे आणि आपण दांभिक नैतिकतावादी नसून खऱ्या अर्थाने न्यायवादी आहोत असे म्हणता येईल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Embed widget