एक्स्प्लोर
एक प्रश्न साने गुरुजींना....!

महाराष्ट्राचं संस्कारपीठ म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या पांडुरंग सदाशीव साने अर्थात विद्यार्थ्यांच्या लाडक्या साने गुरुजींची आज पुण्यातिथी. हे निमित्त साधत अमहदनगर जिल्ह्यातील शेवगावचे शिक्षक उमेश घेवरीकर यांची ही कविता....
एक प्रश्न साने गुरुजींना....! गुरुजी ...... जन्मदात्रीचा गळा चिरून रक्ताने स्माईली काढत फासावर लटकवा म्हणणाऱ्या मुलाचे भावविश्व.... कर्जबाजारी शेतकरी बापाला आपल्या लग्नाचा भार नको म्हणून स्वताला संपवणाऱ्या लेकीचं शहाणपण ... मौजमजा आणि चैनीखातर जिवलग मित्राचे अपहरण निर्घृन खून करणाऱ्या सोबत्यांची संवेदनशीलता... गुणवत्ता यादीत झळकूनही सारे आदर्श गुंडाळून ठेवत गुन्हेगार बनलेल्या गुणवंतांचे मानसशास्त्र ... समजून घेणारे , या धडपडणाऱ्या मुलांना सावरणारे, घडवणारे तुमच्या विचारांचे मातृहृदयी, सेवाभावी , हाडाचे शिक्षक कितव्या वेतन आयोगानंतर आजच्या लेकरांना लाभणार आहेत ? सांगा ना गुरुजी ...? - उमेश घेवरीकर, शिक्षक शेवगाव, जी. अहमदनगर
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
पुणे
























