एक्स्प्लोर

मोडी दफ्तरखाने (भाग – 1)

इतिहासकार राजवाडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचे महत्व सांगताना म्हटले आहे की, ‘‘एक अस्सल ऐतिहासिक कागदाचा चिटोरा दहा बखरीपेक्षा लाख मोलाचा असतो. अस्सल ऐतिहासिक माहिती अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकू शकते, त्यामुळे अशा सर्व ऐतिहासिक कागदांना अतिशय महत्व आहे.’’ इतिहासातील एखाद्या प्रसंगावरील आधारीत असलेल्या चुकीच्या कल्पनांना अस्सल कागदातील माहितीच्या आधारे स्पष्ट केले जाऊ शकते.

कागदाचा शोध चिनी लोकांनी लावला, तेव्हापासून कागदाचा वापर लिहिण्यासाठी केला जात आहे. त्यापूर्वी लेखनासाठी शिळा, भूर्जपत्रे, कापड, बांबू पट्ट्या इ. साधनांचा वापर केला जात असे. कागदांचा शोध लागल्यापासून कागदावर लेखन करण्याची पद्धत रुढ झाली, कागदावर लिहिण्याचे फायदे आहेत. जतन करण्यास सोपे वगैरे कारणांमुळे कागदाला महत्व प्राप्त झाले. कागद जतन करुन ठेवण्याच्या संचयालाच दफ्तरे असे म्हणतात. मोडी दफ्तरखाने (भाग – 1) भारतात शासकीय दफ्तरांची सुरुवात इंग्रजांनी केली, असली तरी त्या अगोदर कितीतरी शतके भारतात साहित्य जतन केले जात होते. प्राचीन भारतात लिखाणाची कला अवगत नसताना पूर्वजांनी आपले विचार एका पिढीकडून पुढील पिढीकडे पाठांतर करुन सुपूर्द केले. पुढे लेखन कलेचा प्रसार होईपर्यंत ही परंपरा चालू होती. लेखन कला अवगत झाल्यानंतर चिन्ह, चित्रकला, चित्र, कोरीव शिल्पे, लाकडांवर, दगडांवर, गुहेतील शिलालेखांवर, पशुपक्षांच्या कातड्यावर लेखन केले जाऊ लागले. लेखन साहित्यामध्ये सुधारणा होत गेल्यानंतर पिढ्यांना लेखन कायमस्वरुपी उपलब्ध व्हावे. या उद्देशाने कागदांचा संचय करुन जतन करण्याच्या संकल्पनेमधून दफ्तरखाने उदयास आले. मोडी दफ्तरखाने (भाग – 1) आज मितीला महाराष्ट्रात शासकीय दफ्तरखाने मुंबई, पुणे, कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा इ. विभागांत आहेत. तसेच काही भारत इतिहास संशोधक मंडळासारखी खाजगी दफ्तरे, व अनेक वैयक्तीक दफ्तरे आहेत. आज या सर्व दफ्तरांमध्ये असंख्य मोडी कागदपत्रे उपलब्ध असून त्यांचे वाचन होणे बाकी आहे. सरकारी यंत्रणा, खाजगी संस्था व अभ्यासक या सर्व कागदांचे जतन करत यथाशक्ती वाचन करतात. मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. सदरच्या कार्याला इतिहासप्रेमी लोकांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळतो, पण या सगळ्या कार्यातूनही अजून लाखो कागदपत्रांचे वाचन बाकी आहे.  पुराभिलेखागार संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये मोडी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. खाजगी संस्था व अभ्यासक मोडी प्रशिक्षण वर्ग घेण्याचे उपक्रम करतात. विद्यार्थी, इतिहासप्रेमी लोक यात सहभागी होतात, पण हे प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. मुख्यत: शासकीय पातळीवर काही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महारांजानी स्वराज्यांची स्थापना केली. त्यांचा इतिहास लिहिण्याच्या प्रयत्नात असलेले इंग्रज अधिकारी ग्रँट डफ यांनी मराठी भाषेबरोबर मोडी लिपी सातारा येथे नियुक्त असताना शिकली होती. ग्रँट डफने मराठी राजवटीचा अभ्यास करुन १८२६ मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहून तो प्रकाशीत केला होता. म्हणजेच जर आपला खरा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर मोडी लिपी शिकलीच पाहिजे. असे मला वाटते. Shivaji-Maharaj आजही महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करताना असे दिसते की इतिहासात प्रत्यक्ष न घडलेल्या गोष्टी अधिक ठाण मांडून बसल्या आहेत. या सर्व गोष्टी लोकमनात श्रद्धास्थाने झाल्याने त्याविषयी स्पष्ट बोलण्याने, लोकांच्या भावना दुखावल्या जातात. लोकांना भावनिक आवाहन करण्याच्या हेतूने इतिहासात घडलेल्या गोष्टींना रंजक व काल्पनिक पद्धतीने अतिशयोक्ती करुन हाच खरा इतिहास असे सांगीतले जाते. इतिहासातील काही गोष्टी जनमानसात इतक्या आत रुजल्या आहेत की जर एखादा अभ्यासक मूळ संदर्भ साधनांच्या आधारावर आपले संशोधन मांडत असेल तर त्या संशोधनाला विरोध होतो. त्या संशोधकाच्या जातीधर्माची पार्श्वभूमी तपासली जाते, व त्याप्रमाणे त्याला विरोध करणारे गट तयार होतात. संशोधनबाह्य घटकांपेक्षा अभ्यासकांच्या संशोधनाची साधने पाहणे वा त्याविषयावरील इतर काही पुरावे असतील तर त्यावर विचारमंथन व्हावे असे अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात मात्र होते उलटे. इतिहास हा कल्पनेवरुन लिहिता येत नाही, त्यामध्ये ललितासारख्या रंजक किवा तर्कावर आधारीत गोष्टी लिहून चालत नाही, कल्पनेवर वा तर्कावर लिहिलेल्या इतिहासाचे संशोधकीय दृष्ट्या काहीच मूल्य नाही. खरा इतिहास लिहिण्यासाठी अस्सल साधनांचा संदर्भ महत्वाचा असतो, अशी प्रमुख अस्सल कागदपत्रे बहुतांशी मोडी लिपीत आज उपलब्ध आहेत, गरज आहे ती फक्त शोधण्याची अन्‍ अभ्यास करण्याची, खरा इतिहास समजण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा मोडी लिपी कागदपत्रांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दफ्तरखन्यांत दडलेला आहे. त्याला बाहेर काढून त्याचे वाचन होणे गरजेचे आहे. इतिहासकार राजवाडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचे महत्व सांगताना म्हटले आहे की, ‘‘एक अस्सल ऐतिहासिक कागदाचा चिटोरा दहा बखरीपेक्षा लाख मोलाचा असतो. अस्सल ऐतिहासिक माहिती अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकू शकते, त्यामुळे अशा सर्व ऐतिहासिक कागदांना अतिशय महत्व आहे.’’  इतिहासातील एखाद्या प्रसंगावरील आधारीत असलेल्या चुकीच्या कल्पनांना अस्सल कागदातील माहितीच्या आधारे स्पष्ट केले जाऊ शकते. आपल्या इतिहासामधील आपल्याला माहिती असलेले कितीतरी प्रसंग आज आपणाला खरे वाटतात, पण ह्याच प्रसंगाचा अस्सल कागदपत्रांच्या आधारे अभ्यास केल्यास फरक दिसतो. अजून कोट्यवधी मोडी कागदपत्रांचे वाचन होणे बाकी आहे. सदरचे वाचन पूर्ण होईपर्यंत हे मोडी दस्तऐवज टिकावेत एवढी अपेक्षा आहे. मी मोडी लिपीचा अभ्यासक आहे. माझे कार्य मोडी लिपी पुरते मर्यादित आहे, इतिहास संशोधनासाठी मोठा व्यासंग व अभ्यास महत्वाचा असतो, याची पूर्ण माहिती मला आहे. मी माझ्या कामानिमित्त अनेक इतिहास संशोधकांना भेटलो आहे, जेष्ठ इतिहास संशोधकांना मोडी लिपी लिहिता वाचता येते, पण काही नवोदित इतिहास संशोधकांना मोडीचा गंधही नाही, याचे मूळ कारण असे की इतिहासाच्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमात मोडीला कुठेही स्थान नाही. इतिहासावर संशोधन करुन आपला PhD चा प्रबंध सादर करणारा अभ्यासक मोडी लिपी जाणणारा असेलच असं नाही. मग त्याने केलेल्या संशोधनला किती संशोधकीय महत्व द्यायचे हा प्रश्न मला नेहमी पडतो. मोडी लिपी प्रशिक्षणाची गरज फक्त इतिहास वा साहित्य क्षेत्रातील अभ्यासकांनाचा आहे असे नाही, आपल्या समृद्ध इतिहास काळात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींची बरीच हस्तलिखीते मोडी लिपीत आहेत. आज पत्रकारिता, वास्तुकला, स्थापत्यकला, रचनाकला (डिझाइन), लष्करी अभियांत्रिकी शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, तसेच कायद्याचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी संशोधकांसाठी संबंधीत विषयातील मोडी लिपीतील लाखो अस्सल कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. गरज आहे ती शोधण्याची. इ.स. १९६० पर्यंतची अस्सल कागदपत्रे बहुतांश मोडी लिपीतील आहेत. आपल्या देशावर राज्य करणारे इंग्रज आपला इतिहास त्यांना समजवा म्हणून मोडी लिपी शिकत होते. मग आपण आपला इतिहास समजून पुढील पिढीला याचा अनमोल वारसा देण्यासाठी मोडी का शिकू नये? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. मोडी लिपी प्रशिक्षण घेऊन किती अर्थाजन होईल याचा विचार करण्यापेक्षा मोडी लिपी प्रशिक्षण घेऊन मी किती ऐतिहासिक कागदपत्रांना उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करीन हे महत्वाचे आहे. मोडी लिपीतील आपला ऐतिहासिक वारसा जतन करुन पुढच्या पिढीला देणे हा आपला प्रयत्न असला पाहिजे, असे मला वाटते. प्रत्येक गोष्ट फायदासाठीच करण्यापेक्षा मोडी लिपीचा सांस्कृतीक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. तरच हा वारसा आपण आपल्या पुढील पिढीला देवू शकू, नसेल तर येणारी पिढी आपल्याला काय म्हणेल? याचा विचार अंतर्मुख होउन करणे गरजेचे आहे. मी स्वत: मोडी लिपी प्रशिक्षण घेऊन, माझ्या संबंधीत एकाला मी मोडी लिपी शिकवेन असा विचार प्रत्येकाने आज केला तरच आपण पुढच्या पिढीला हा अनमोल वैभवशाली वारसा देऊ शकू असे मला वाटते. मोडी लिपीची, मराठी भाषेतील, मराठा राजवटीची, मध्ययुगीन महाराष्ट्राचा वैभवशाली व ज्वलंत इतिहास सांगणारी सहस्त्रावदी ऐतिहासिक कागदपत्रे निरनिराळ्या दफ्तरखान्यामध्ये इतिहास संशोधकांची, अभ्यासकांची गेली कित्येक वर्ष आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. आपल्या जवळील मोडी दफ्तरखाने शोधावे, त्यांना भेट द्यावी, निदान त्यांची माहिती घ्यावी. ही सुरवात आपली वैभवशाली मोडी लिपी जतन करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरु शकते. कारण हजारो मैलांचा प्रवास सुरु करण्यासाठी पहिली दोन पावले टाकणे महत्वाचे असते. (पुढील ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख दफ्तरखान्यामध्ये उपलब्ध असलेल्या मोडी लिपी कागदपत्रांची माहिती मोडी दफ्तरखाने2 मध्ये देण्यात येईल.) संबंधित ब्लॉग : मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास वैभवशाली मोडी लिपी
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget