एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नियोजन आणि मंत्रिमंडळाच्या प्रगती पुस्तकाचा आढावा हे दोन विषय शहा यांच्या अजेंड्यावर होते. मंत्रिमंडळातला मित्रपक्ष आणि रस्त्यावरचा शत्रूपक्ष शिवसेनेच्या कारवाया, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण हे कळीचे मुद्दे आणि महाराष्ट्र विधानसभेची मध्यावधी निवडणूक झालीच तर संभाव्यस्थिती काय असेल याचा अंदाज शहा यांनी घेतला. शहा यांच्या दौऱ्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी दोन बातम्या आल्या. पहिली होती, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून शेतकरी आंदोलन हाताळताना अपयशी ठरले असा ठपका शहा यांनी महाजन यांच्यावर ठेवला. याला जोडून शहा यांचा इशाराही आला. शहा यांनी मंत्र्यांना सुनावले की, काम जमत नसेल तर पक्षाकडे पर्याय आहे. ही बातमी महाजन यांची अप्रतिष्ठा करणारी होती. काही माध्यमांनी ती मुद्दाम पेरली असे महाजन यांचे निकटवर्तीय म्हणतात. खरे तर शहा यांच्यासमोर पक्ष संघटनात्मक चर्चा होती. याशिवाय मंत्र्यांनी केलेल्या संघटनात्मक व थेट जनहिताच्या कामगिरीविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून माहिती देण्यात आली. शहा यांनी सन 2017 हे वर्ष संघटन वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. त्या अंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार योजनेत संघटनात्मक आढावा घेतला गेला. महाजन यांनी थेट जनहिताचे कार्य या अंतर्गत आरोग्य अभियानाची माहिती दिली. शेतकरी आंदोलनाशी संबंधित विषयांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. असे असतानाही शहा यांनी महाजन यांना खडसावल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असे महाजन समर्थक म्हणतात. शहा यांच्या दौऱ्यानंतर दुसरी बातमीही आली. ती म्हणजे, शहा यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांच्याशी काही काळ गुफ्तगू केली. वर्षभरापूर्वी विविध प्रकारच्या कथित आरोपांच्यानंतर खडसे यांनी स्वतःच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र खडसे यांच्यावर झालेले आरोप सिध्द होऊ शकलेले नाही. पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा मोबाईलवरून खडसेंच्या संपर्कात आहे असा आरोप भामटा मनिष भंगाळे याने केला होता. तो आरोपही बनावट पुराव्यांचे कारस्थान करुन रचल्याचे सिध्द होत आहे. अशा स्थितीत शहा यांनी खडसेंशी काय गुफ्तगू केली ? याची उत्सुकता आहे. खडसे यांच्यासारखा अनुभवी आणि विधी मंडळात विरोधकांना नामोहरम करणारा नेता सरकारमध्ये असावा असे बहुधा शहा यांना जाणवले असावे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल आणि खडसेंची वापसी हे दोन अंदाज सध्या बांधले जात आहेत. एक मुद्दा येथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे, मंत्रिपद सोडल्यानंतर खडसे यांनी नेहमी फडणवीस सरकारवर टीका केली. पण फडणवीस यांनी 34 हजार रुपयांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर खडसेंनी या निर्णयाची जाहीर भलावण करीत फडणवीस सरकारचा निर्णय ऐतिहासिक व धाडसी असल्याचे म्हटले. खडसेंच्या या कृतीमुळे भविष्यात त्यांच्यासाठी मंत्रिमंडळाचा दरवाजा उघडेल अशी आशा निर्माण झाली आहे. खडसेंनी मात्र शहा यांच्याशी काय बोलणे झाले ? हे अद्याप कोणाला सांगितलेले नाही. महाजन व खडसे यांच्या विषयी मुंबईतील बातम्यांसोबत धुळ्यातून आमदार अनिल गोटे यांच्याविषयी तिसरी बातमी आहे. धुळे शहरात पांझरा काठावर गेले 7/8 वर्षे चौपटी म्हणून दुकानदारांचे अतिक्रमण आमदार गोटेंच्या संरक्षणात उभे राहिले होते. हे अतिक्रमण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेत असताना विस्तारले व सध्याच्या सत्तेत स्थिरावले असे वाटत होते. मात्र हायकोर्टने अतिक्रमण काढायचा आदेश दिला आणि प्रशासन कार्यवाही करुन मोकळे झाले. त्यामुळे पांझरा मोकळी झाली आणि आमदार गोटेंच्या मस्तवालपणाला लगाम बसला. सर्वच महानगरांमध्ये गोटेंसारख्या लोकप्रतिनिधींसारखी प्रवृत्ती काम करीत असते. सरकारी जागांवर नागरिकांचे अतिक्रमण कसे सुरक्षित करता येईल याचाच विचार अनेक जण करतात. अशा विषयांवर आमदारांचे व महापौरांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे असतात. जळगाव शहरात सेंट्रल फुले मार्केटमधील पाथवे आणि पार्किंगच्या जागेत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण म्हणजे मुठभर मंडळींची दंडेलशाही आहे. अशा विषयावर आमदार सुरेश भोळे व महापौर नितीन लढ्ढा सतत बोटचेपी भूमिका घेतात. गोटे प्रवृत्ती ही अशा प्रकारे सार्वत्रिक असल्याचा अनुभव येतो.

खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget