एक्स्प्लोर
खादाडखाऊ : मावळचा रिफ्रेशिंग टर्निंग पॉईंट

मे महिन्याच्या अखेरचे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस तसे बेक्कारच. उन्हाळा मी म्हणत असतो, मान्सूनचं निशाण रावणाच्या लंकेतच फडकत असतं. या निराशा दाखवणाऱ्या दिवसात एखाद दिवस काळेशार ढग दाटून येतात. फक्त येताना पाऊस न आणता ‘बाय डीफॉल्ट’ दमटपणा घेऊन येतात. इच्छा असो वा नसो, पण बायकोनी रुमाल डोळ्यांना लावल्यावर नवीन लग्न झालेल्या बिचाऱ्या नवऱ्याला जसं शांत व्हायचं नाटक करावंच लागतं. तसं आकाशात नारायणरावही आपले वटारलेले डोळे जरावेळ मिटून घेतात. हवा अचानक छान वाटायला लागते.
अशा वेळी स्वतःला ‘लाँग ड्राईव्हचा’बोनस घ्यायचा. ट्रॅफीक, पार्किंग, कामाची टार्गेट्स आणि टेन्शन्स या तुच्छ समस्या जनतेवर सोडून बिनधास्त बाहेर पडतो.
सकाळच्या वेळी इतर लोकं कामाला जात असताना बरोब्बर उलट दिशेला निर्हेतूक प्रवास करण्यातले सुख भाग्यवानांनाच अनुभवायला मिळतं. मग इतर कोणी बरोबर नसेल तरी की फरक पैन्दा काकें? किंचित अंधारलेल्या ढगांची सोबत अशा वेळी बास असते. गाडी असेल तर सीडी प्लेयरवर, दुचाकी असेल तर मोबाईलचे हेडफोन लावून त्यावर आरडीच्या ढिंच्याक गाण्याचा अल्बम सुरु करायचा. शक्यतो शहरापासून शक्य तेवढ्या लांब जायचं टार्गेट ठेवून जवळची दिशा धरतो. पुण्यापासून काहीवेळ लांब जायला सध्या मला पौड रस्त्याचा ऑप्शन सगळ्यात जवळ.
मावळाची काय गंमत आहे, माहिती नाही. ऋतू कुठलाही असो बारा मावळात कुठेही फिरा. आता वृक्षतोडीनी कितीही उजाड झालं असलं तरी,मावळातल्या हवेत आपलं मन अजूनही प्रसन्नच होतं. चांदणी चौकात डोकं वर काढलेली गाडी बावधन, भुगाव पार करेपर्यंत बुंगाट सुटते. भूकुमला पोचेपर्यंत पल्याडच्या पिरंगुटच्या घाटातून गार हवेचा झोत अंगावर येतो. आरडी, किशोर डोक्यात पूर्ण पोचलेले असतात. “चला जाता हुं किसीकी धून में” म्हणत रमतगमत पिरंगुटचा छोटा घाट उतरल्यावर लवळे फाट्याच्या हॉटेल श्रीपादच्या भिंतीवरचे वारली पेंटिंग आणि दरवाज्यावर अंथरलेले गवत लांबूनच आपले लक्ष वेधते. आणि आपण मावळात पोचल्याची खात्री पटते.
पुण्यातल्या आमच्या दोन्ही मिसळ महोत्सवात हिट झालेली श्रीपादची चटकदार मिसळ, माझी स्वतःचीही एक आवडती मिसळ. त्यामुळे इथे खायला नाश्त्यापासून संपूर्ण जेवण्याचे ढीगभर ऑप्शन असूनही माझी पहिली ऑर्डर मिसळ. नुसता रस्सा पाहिलात तर कोल्हापुरी स्टाईल तांबडाबुंद दिसेल. पण त्यावरचे शेव-फरसाण आणि किंचित मक्याचा गोडसर चिवडा रस्याची चव वाढवते. मलातर अशी मिसळ नुसतीच खायलाही मजा येते. पाव फक्त हात पुसायला घ्यायचा.
मिसळ नुसतीच खाणं हा खरंतर वडे, भज्यांचा अपमान आहे. म्हणून जोडीला यातले मूड असेल ते मागवायचं. मिसळीबरोबर मी सहसा कांदाभजी घेतो, हात पुसायला म्हणून एखादा पाव घेतो आणि सुरु होतो. कांदाभजी सहसा नुसतीच देतात पण श्रीपादमधे त्यावर शेव पसरलेली असते. मग मिसळ, भजी आणि साथीला मिठात आलेली मिरची अशी आमच्या चौघांची मैफल रंगते. वर एक कडक कॉफीचा कप घ्यायचा. बसल्यावर श्रीपादचा मालक ओजस पाटीलबरोबरच्या गप्पांमध्ये वेळ कसा जातो समजतही नाही. नेहमीच्या प्रत्येक ग्राहकांबरोबर रोज हसून बोलत, त्यांची चौकशी करत या माणसाचं तोंड संध्याकाळी दुखत कसं नाही? हे मला अनेक वर्ष न सुटलेलं कोडं आहे. ते सोडवायच्या फंदात न पडता पौड रस्त्याला पुढे गेलो की घोटावडे फाट्याला पोचतो. मुठा गावाकडे (लवासा रस्त्याला) डावीकडे वळतो. फारतर दहा-पंधरा मिनिटातच आपण जवळपास घाटमाथ्यावर पोचतो.आपल्याला ना काही काम ना धाम .त्यामुळे एखादा ब्रेक पाहिजे असेल तर निवांत बसायला इथे ‘टर्निंग पॉईंट’ नावाच्या ‘हाटेलाची’ सोय आहे.
इथे आल्यावर मला बाल्कनीत सगळ्यात पुढची जागा मिळाल्यासारखी वाटते, गर्दी सहसा नसतेच. इथेही कोल्हापुरी नावाची मिसळ मिळते, पण मला काही ती कोल्हापुरी वाटली नाही. फक्त फुकट बसण्यापेक्षा धरण बघत कॉफी किंवा टिपिकल ‘उकळ्या’ चहा प्यायचा आणि पुढे निघायचं. जेमतेम पाच-दहा मिनिटात आपण मुठा गावचा घाट उतरतो. घाट उतरल्यावर पैसे खर्च करायला लवासाकडे न जाता,डावीकडे वळालो की आपण पानशेतच्या बाजूला येतो.
रस्त्याचं काम जागोजागी सुरु दिसतं, त्यामुळे जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता अर्धवट डांबरी आहे. गायरान चांगलं यावं म्हणून आधीचे तण काढायला काही ठिकाणी जमीन जाळलेली दिसली तरी वाटेत अनेक ठिकाणी हिरवीगार शेतं आपल्याला थांबायला भाग पाडतात. मग शेताच्या बांधावरचं एखादं आंब्याचं झाड बघून बिनधास्त ठिय्या मांडा. वादक असाल तर पोतडीतून बाजा, बासरी बाहेर काढा. कलाकार असाल तर इथला जिवंत देखावा रंगवा. यापैकी कोणीच नसाल तर माझ्यासारखे तो नजारा डोळ्यात साठवत निवांत बसा. वाटेत कुठेतरी तुतीची झाडं दिसतात. चिंचेचं झाड दिसलं तर वय विसरून दगड मारून गाभूळलेल्या चिंचा पाडायच्या. या आनंदाच्या बदल्यात आपल्याकडे पैसे मागायलाही येणार नाही कोणी इथे. उलट बांधाला एकटेच बसलेले दिसलात तर एखादे काका आपुलकीनी चौकशी करतील. कोणीतरी अनामिक मावशी प्रेमानी बोरं,आवळे हातावर टिकवून आपली वाट धरतील. शहराची आठवण,कामाचा रगाडा हे सगळे तात्पुरते विसरायला लावणाऱ्या अश्या अनेक जागा मावळात गवसतील.फक्त बघायला आपली नजर तयार पाहिजे.
इथून पुढे गेल्यावर बहुली,सांगरूण गावातली जमीन म्हणजे पानशेतचे धरण ज्यावेळी फुटले त्यावेळी त्यातला गाळ वाहून आलेली जमीन,अतिशय सुपीक. इथे पिकणाऱ्या अगदी साध्या भाज्यांची चवही उत्कृष्ट. वाटेत दोन-तीन ठिकाणी त्या भाज्या घेऊन शेतकरी दिसतात. सिझनला कधी मक्याची कणसं दिसतात, कधी विकायला पेरू,आंबे असतात. शेतकऱ्यांकडून पाहिजे तो माल खरेदी करून एनडीएचे मागचे गेट पार करून खडकवासल्याच्या पिकॉक-बे ला पोचतो. तिथून पुढे कोंढवेधावडे, उत्तमनगर-वारजे म्हणजे आलंच पुणं.
साधारण ६०-७० किलोमीटर आणि ३-४ तासांच्या बदल्यात महिनाभर फ्रेश ठेवणारी एनर्जी मिळते. चापलेली मिसळ,वाटेत खाल्लेला रानमेवा,भेटलेले शेतकरी,त्यांच्याशी झालेला संवाद;शहर-ग्रामीण भाग ह्यात मनातनं आलेलं अंतर जरा कमी करतो.
शहरात यायला मन मानत नसतं पण रोज काम बाजूला ठेवूनही चालणार नसतं. नाईलाजाने अर्ध्या दिवसाची निवांत खाद्यभ्रमंती समाप्त होते.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:
खादाडखाऊ : वाडेश्वर भुवन
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
View More