एक्स्प्लोर

जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

मुंबईबद्दलच्या जुन्या कुठल्याही पुस्तकात अगदी सहज उल्लेख केलेली इराण्याची हॉटेलं कशी असतात याची उत्सुकता प्रत्येक खवय्याला असतेच, त्यातही मुंबईत बाहेरुन आलेल्यांना तर या खाद्यसंकृतीबद्दल मोठं अप्रुप असतं. कारण अगदी पुलं देशपांडेंच्या पुस्तकांपासून कितीतरी ठिकाणी मुंबईकर नसलेल्यांना या इराणी हॉटेल संस्कृतीचा उल्लेख आढळत असतो, खास मुंबय्या पदार्थांमध्येही वडापावच्या बरोबरीनी बन मस्काचा उल्लेखही होतोच, पण प्रत्यक्षात मुंबईत मात्र आता खरी इराण्याची हॉटेलं अशी जागोजागी दिसत नाहीत हे प्रकर्षानं लक्षात येतं. जी उरली आहेत ती थेट दक्षिण मुंबईत. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार मग ब्रिटानिया, जिमी बॉय, माटुंग्याचा कूलर कॅफे अशी काही मोजकी नावंच आता डोळ्यासमोर येतात. बरं काळाच्या ओघात जी हॉटेलं टिकून आहेत ती ही आता बंद होणार असल्याचा बातम्या अधून मधून येतात. ग्रांटरोडवरची प्रसिद्ध मेरवान बेकरी अशीच बंद झाली. त्यामुळेच की काय वडापाव जितक्या सहजपणे मुंबईच्या कानाकोपऱ्यात मिळतो, तितक्या सहज आता पारशी खाद्यपदार्थ मुंबईकरांना मिळू शकत नाहीत. एकेकाळची मुंबईची इराणी हॉटेलांची खाद्यसंस्कृती लोप पावत चाललीय, ही खंत प्रत्येक मुंबईकर खवय्यांच्या मनात आहे, ती कमी करण्याचा आणि इराणी हॉटेलला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न म्हणजे मुंबईत लोकप्रिय झालेली रेस्टॉरन्टसची चेन सोडाबॉटलओपनरवाला.. सुरुवातीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिलं सोडाबॉटलओपनरवाला नावाचं रेस्टॉरन्ट निघालं, आता मात्र मुंबई ठाण्यात मिळून चार पाच ब्रांचेस निघाल्यात या मॉडर्न पारशी रेस्टॉरन्टच्या. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार या सोडाबॉटलओपनरवाला नावाच्या कुठल्याही रेस्टॉरन्टमध्ये गेलं तरी आतली सजावट बऱ्यापैकी सारखी दिसते. ही सजावट थेट जुन्या इराणी हॉटेलांशी नातं सांगणारी. प्रत्येक टेबलवर अगदी टिपिकल इराणी हॉटेलांची ओळख असणारे लाल चौकटीचे टेबलक्लॉथ आणि मोठमोठे लाकडी टेबल. पण शिरताच लक्ष वेधून घेतो तो सूचनांचा एक भलामोठा फलक जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार मोठ्याने बोलू नये खुर्चीवर किंवा टेबलवर पाय ठेऊन बसू नये उगाच कॅशियरशी जाऊन गप्पा मारु नये ऑफिसचं काम घेऊन टेबल अडवू नये बाहेरचं जेवण इथे आणून खाऊ नये sanitizer अशा सूचना वाचून मगच आपल्या टेबलवर जाऊन बसावं अशी बहुतेक त्यांची अपेक्षा असावी. बरं टेबलवर बसल्यावरही हे थांबत नाहीत. आधी तर हात स्वच्छ करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर ठेवलेलं असतं, आणि त्याबरोबरच दिसतात टेबलला चिकटवलेले पारशी लोकांबद्दल, त्यांच्या रंजक अडनावाबद्दल माहितीचे कागद. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार कॉन्ट्रॅक्टर, दारुवाला, बाटलीवाला आणि या रेस्टॉरन्टचं नाव असलेला सोडाबॉटलओपनरवाला अशी अडनावं पारशी समुदायातल्या लोकांना कशी चिकटली याचा रंजक इतिहास आपण मागवलेल्या डिश येईपर्यंत वाचता येतो. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार या इतिहासाच्या माहितीबरोबर थेट टेबलावरच आणि काही सूचना असतात. खरा पारसी माणूस कशाबरोबर काय खातो याच्या त्या सूचना असतात. म्हणजे ज्याच्या नावावर हे रेस्टॉरन्ट आहे त्या सोडाबॉटलओपनरवालाची आई ही कायम बन मस्काच्या साथीनं सली मटनचा आस्वाद घ्यायची, तर दादरचे एक अंकल कांदा भजी आणि प्रॉन पॅटीस खायचे. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार अर्थात तुम्हाला कशाबरोबर काय खायचं हा तुमचा चॉईस असाही शेरा वर असतो. या सूचना आणि ही सगळी टापटीप पाहून पारशी लोक प्रचंड शिस्तीने वागणारे, नियमांचं पालन करणारे असतात आणि इतरांनीही तसंच करावं असा त्यांचा आग्रह असतो, ही ऐकीव माहिती किती खरीय याची कल्पना येते. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार रेस्टॉरन्टमधली इतरही सगळी सजावट अगदी इराणी हॉटेलशी साम्य असलेली, मग प्रत्येक टेबलच्यावर असलेला लाईट असो किंवा सुप्रसिद्ध मेरवान बेकरीचं मोठ्ठं कट आऊट असो. तसंच बेकरीचं काऊंटरही अगदी थेट इराण्याच्या हॉटेलातल्यासारखं आणि काऊंटरच्या मागे उभी असलेली व्यक्तीही पारशी पेहरावातली. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार आता पूर्णपणे पारशी संस्कृतीची आठवण करुन देणाऱ्या रेस्टॉरन्टमध्ये पारसी पदार्थांची रेलचेल असणार हे उघडच आहे, त्यामुळे बन मस्का, ब्रुन मस्का जॅम, खारी अशा खास इराणी हॉटेल स्पेशल पदार्थांनी जी सुरुवात होते ती एकेकाळी खास मुंबईची ओळख ठरलेल्या पदार्थांपर्यंत सगळं काही इथल्या मेन्यूकार्डात दिसतं. बेरी पुलाव, चिकन बैदा रोटी, चिकन कटलेट पाव असे ऐतिहासिक पदार्थ म्हणजे सोडाबॉटलओपनरवालाची खासियत. पण खरी गंमत आहे ती इथल्या काही पदार्थांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नावांची. एका स्टार्टरचं नाव आहे आलू आंटीज व्हेज कटलेस. यातला कटलेस हा इराणी हॉटेलांच्या सुवर्णकाळात उच्चारला जाणारा शब्द आणि तो पदार्थ जसाच्या तसा इथे खायला मिळतो. त्याचप्रमाणे अनेक हॉटेलांच्या मेन्यूकार्डात दिसणारा एग्ज केजरीवाल हा पदार्थ नक्की काय आहे याचाही उलगडा इथेच होतो. सध्या प्रसिद्ध असलेल्या दिल्लीच्या केजरीवालांचा इथे काहीही संबंध नाही. अनेक वर्षांपूर्वी मुंबईतल्या ताडदेव भागातल्या विलिंगडन क्लबमध्ये देवीप्रसाद केजरीवाल नावाचे एक गृहस्थ नियमितपणे यायचे म्हणे. त्यांची अंड खाण्याची एक वेगळीच पद्धत होती, टोस्ट केलेल्या ब्रेडवर अंड आणि त्यावर चिज असा तो पदार्थ असायचा. या विलिंगडन क्लबमध्ये असं अंड त्यांच्यामुळेच तयार होऊ लागलं आणि म्हणून त्या पदार्थालाच एग केजरीवाल असं म्हंटलं जाऊ लागलं. आहे की नाही केजरीवाल नावाच्या पदार्थाचा जबरदस्त इतिहास. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार याशिवाय ताडदेव एसी मार्केट मामाजी ग्रिल्ड सॅण्डविच असाही एक पदार्थ आहे, हे सॅण्डविच म्हणजे मुंबईची ओळख असलेलं मसाला चिज सॅण्डविच. भिंडी बजार का सिख पराठा अशा नावाचा पदार्थही दिसतो मेन्यूकार्डात, पण या पदार्थाचा पारशी खाद्यसंस्कृतीपेक्षा मुंबई शहराच्या खाद्यसंस्कृतीशी जास्त जवळचा संबंध दिसतो. कारण हा पदार्थ मागवल्यावर पारशी पदार्थापेक्षा खास मुंबईच्या गल्ल्यांमध्ये मिळणारा मटन कबाब आणि पराठा असा पदार्थ पुढे येतो. असे मुंबईची ओळख सांगणारे वडापाव, कांदाभजी असेही पदार्थ इथल्या मेन्यूकार्डातले महत्त्वाचे पदार्थ. अर्थात सगळ्या पदार्थांपैकी इराणी हॉटेलमध्ये गेल्यावर चाखलेच पाहीजेत असे पदार्थ म्हणजे व्हेज किंवा नॉनव्हेज बेरी पुलाव, धानसाक आणि खास इराणी पॅटीओ (साध्या भाषेत सांगायचं तर पॅटीस) तसंच इराणी बेकरीतलेही काही पदार्थ असे आहेत जे चाखलेच पाहिजेच. custard मग नानखटाई, जिंजर बिस्कीट, पारसी डेअरीची फेमस कुल्फी या गोड पदार्थांबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पारसी लग्नांमध्ये अत्यावश्यक असलेलं कस्टर्ड. लगन नु कस्टर्ड नावानंच इथे हा पदार्थ मिळतो. हे कस्टर्ड तर अगदी जिभेवर विरघळतं. जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार सोडाबॉटलओपनरवालामध्ये सगळं काही इराणी हॉटेलसारखं असलं तरी पदार्थ सर्व्ह करण्याची पद्धत मात्र युनिक आहे, इथलं कॉम्बो मिल मागवलं तर ते मिल सर्व्हिंग बाऊलमध्ये न येता थेट येतं ते तीन पुडाच्या मोठ्या स्टीलच्या टिफिन बॉक्समधून. वेटर हातात डबा घेऊन येतो आणि तो डबाच थेट आपल्यासमोर उघडला जातो. बन मस्कासारखे पदार्थ मात्र खास इराणी हॉटेलच्या स्टाईलने काचेच्या बशीतच सर्व्ह केले जातात. रिलॅक्स होत निवांत खाण्यासाठी एखाद्या जागेचा शोध घेणाऱ्यांसाठी इथे आणखी एक खुणावणारी गोष्ट असतो ती म्हणजे लाईव्ह डीजे. जुन्या इंग्रजी गाण्यांची पर्वणी देणारा लाईव्ह डीजे म्हणजे चवदार खाणं आणि सोबतच म्युझिकचा दुहेरी आनंद. लोप पावत चाललेल्या इराणी हॉटेलांच्या खाद्यसंस्कृतीला केवळ जिवंत ठेवणारी नाही तर नवीन प्रयोगांनी ती वाढवण्याचा प्रयत्न करणारी रेस्टॉरन्ट चेन म्हणजे सोडाबॉटलओपनरवाला. अर्थात इराण्याच्या हॉटेलांपेक्षा खिसा जरा जास्तच रिकामा होतो इथे कारण शेवटी पॉळ भागांमधलं थिम रेस्टॉरन्ट ठरतं ते. पण तरीही या प्रयोगासाठी आणि चवींसाठी मात्र इथे जायलाच पाहिजे.

जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

 

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget