एक्स्प्लोर

Blog : भावनिक बुद्धिमत्तेचं बीज लहानपणातच पेरूया!

"माणूस एक सामाजिक प्राणी आहे," हे ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलचं वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. पण खरं विचार केला तर हे वाक्य आजच्या काळात अधिक समर्पक वाटतं. कारण माणसाचं खरं अस्तित्व हे समाजातच रुजलेलं असतं. आपलं वागणं, बोलणं, विचार करणं – हे सगळं काही आपण समाजातून शिकतो. आणि या शिकण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता.

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence – EQ) म्हणजे आपल्या भावना ओळखणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं, त्यावर नियंत्रण ठेवणं, इतरांच्या भावना समजून घेणं (सहानुभूती) आणि सामाजिक संबंधांमध्ये संयम व समजूत दाखवणं.

आज तणाव, असुरक्षितता, एकटेपणा, व्यसनाधीनता आणि आत्महत्येचे प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळी भावनिक संयम आणि भावनिक शिक्षण ही केवळ कौशल्यं नाहीत, तर ते जीवन वाचवण्याची शक्ती बनतात.

संशोधन स्पष्टपणे दाखवून देतं की IQ पेक्षा EQ – म्हणजे भावनिक समज – आपल्याला आयुष्यात अधिक यशस्वी, समाधानी आणि सुसंवादक्षम बनवतं. आणि हे बीज लहानपणीच पेरणं सर्वात प्रभावी ठरतं.

EQ लहानपणातच का शिकवावं?

बालपण म्हणजे मातीसारखं असतं – जसं घडवलं, तसं वळतं. लहान वयातच जर मुलांना त्यांच्या भावना ओळखायला, त्यांना व्यक्त करायला आणि त्यावर संयम ठेवायला शिकवलं, तर ते मोठं होऊन जीवनातील संकटांसमोर कोसळणार नाहीत. ते भावनांचा अनियंत्रित उद्रेक करणार नाहीत, किंवा पूर्ण गप्पही बसणार नाहीत.
आपण जर ही संवेदनशीलता लहानपणीच रुजवली, तर आपल्याला संवादक्षम, समजूतदार, जबाबदारी स्वीकारणारी आणि आत्मभान असलेली पुढची पिढी मिळेल. ही खरी सामाजिक क्रांती ठरेल — गुन्हेगारी, हिंसा, आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल.

मुलांमध्ये EQ कसं विकसित कराल?

1. भावना ओळखायला शिकवणं

मुलांना त्यांच्या भावना ओळखायला मदत करा.
"तुला राग आला का?" "तुलं दुख: झालं का?" अशा प्रश्नांमधून संवाद सुरू करा.
मी शाळेत समुपदेशक म्हणून "भावनांचा अभिनय" हा खेळ वापरत असे. एक मूल एखादी भावना चेहऱ्यावर दाखवतं आणि बाकी मुले ती ओळखतात. खेळातून शिकणं अधिक प्रभावी ठरतं.

2. भावना योग्य रीतीने व्यक्त करणं

राग येणं नैसर्गिक आहे, पण त्याचा उद्रेक चुकीचा असतो. "मला खूप राग आलाय, मला थोडं शांत बसायचं आहे" असं बोलणं शिकवणं आवश्यक आहे.

3. मोठ्यांचं वर्तन म्हणजे मुलांचं शिक्षण

मुलं आपण जे करतो ते पाहून शिकतात. जर आपण माफी मागतो, समजून घेतो, शांत संवाद करतो, तर तीही तेच शिकतात. हेच 'Observational Learning' आहे.

4. EQ शिकवण्यासाठी उपयुक्त साधनं

  • भावनांची गोष्ट, चित्र, नाटक यांचा वापर
  • “माझी आजची भावना” अशा शीर्षकाखाली लिहिण्याचा सराव
  • श्वासोच्छ्वासाचे सराव (breathing exercises)
  • सहभोजन, गप्पा, समूह खेळ

एक अनुभव – एक शिकवण

दुसरीतील एक मुलगी अचानक शांत झाली. नेहमी हसणारी, खेळणारी ती मुलगी संवाद टाळू लागली. मी तिला माझा अनुभव सांगितला – “माझं आणि माझ्या भावाचं एकदा भांडण झालं होतं, आणि मीही बोलणं बंद केलं होतं.”
ती विचारू लागली, “मग तू तुझ्या भावाशी पुन्हा बोललीस का?”
हळूहळू ती मोकळी झाली . तिला तिचे वर्गमित्र नाकारत होते आणि त्यामुळे तिने स्वतःला वेगळं केलं होतं. पण त्या संवादातून तिला जाणवलं की – ती एकटी नाही आणि भावना शब्दांत मांडता येतात.

हीच तर खरी भावनिक समज – स्वतःला समजून घेणं आणि इतरांशी मनापासून संवाद साधणं!
भावनिक संयम हे केवळ एक सौम्य कौशल्य नाही, तर ते अत्यावश्यक जीवनकौशल्य आहे. आपण जर ही शिकवण बालपणात रुजवली, तर मुलं उद्या मानसिकदृष्ट्या सक्षम, सुसंवेदनशील, आणि समाजाभिमुख नागरिक बनतील.

शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी जर भावनिक समजुतीचं बाळकडू दिलं गेलं, तर आपण केवळ बुद्धिमान नव्हे, तर समजूतदार माणूस घडवतोय — आणि त्याहून मोठं योगदान समाजाला कोणतं असू शकतं?

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
ABP Premium

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
Embed widget