एक्स्प्लोर

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

कासवाची भारतात तीन मंदिरं आहेत. त्यातलं पहिलं मंदिर  हे कूर्मावतारातल्या विष्णूचं ‘श्री कूर्मम्’ / कुर्मांधा मंदिर गारा नावाच्या गावात, श्रीकाकुलम तालुक्यात, आंध्रप्रदेशात आहे. इथली नवलाची गोष्ट म्हणजे अकराव्या शतकातल्या या मंदिरात मूर्तीची नव्हे, तर प्रत्यक्ष कुणा प्राचीन अवाढव्य कासवाच्या अवशेषाची पूजा केली जाते आणि दुसरी आकर्षक गोष्ट म्हणजे इथं दोनशेहून अधिक ‘स्टार’ कासवं पाळलेली आहेत. श्री रामानुजाचार्यांनी या मंदिराची निर्मिती केली. मागाहून आदी शंकराचार्यांनी तिथं एका शाळीग्रामाचीही स्थापना केलेली आहे. अर्थात मंदिरात इतरत्र मूर्ती आहेच, मात्र मुख्य पूजा अवशेषाची! इथल्या दोनशेहून अधिक खांबांवरील कोरीव शिल्पं आणि भित्तीचित्रं अगदी भरपूर वेळ काढून पहावीत, इतकी देखणी आणि अर्थातच अनेक कथा सांगणारी आहेत. घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार मुख्य कथा अर्थातच विष्णूच्या दशावतारांमधल्या कूर्मावताराची गोष्ट. समुद्रमंथन करण्यासाठी मंदार पर्वत कुठंतरी स्थिर ठेवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी कासवाचं रूप धारण करून विष्णूने तो आपल्या पाठीवर पेलला; अशी ती गोष्ट आहे. या कासवाच्या पाठीच्या आकाराचं मोजमाप ‘एक लाख योजने’ इतकं होतं म्हणे. Ghumakkadi 42 at 2-compressed कूर्मावतारावेळी विष्णूने इंद्रद्युम्न राजाला ज्ञान, भक्ती आणि मोक्ष याविषयी उपदेश केला. तो लोमहर्षण नावाच्या सूताने शौनक ऋषींसह अजून काही ऋषींना नैमिषारण्यात ऐकवला. त्याचं लेखी स्वरूप म्हणजेच कूर्मपुराण! कूर्मपुराणात देखील एक सृष्टीउत्पत्तीची कथा आहे. मेरू पर्वताला दोन मुली होत्या, एकीचं नाव आयति आणि दुसरीचं नाव नियति. त्यांचा विवाह विधात्याशी झाला आणि त्यांची मुलं मानववंशाचा विस्तार करू लागली. लिंगपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी पृथ्वी रसातळाला जात असताना विष्णूने कासवाचं रूप धारण करून तिला वाचवलं आणि पाठीवर तोलून धरलं अशी कथा आहे. एकादशी व्रत या कूर्मावतारानंतर सुरू झालं, अशीही एक मान्यता आहे. घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विष्णूने कूर्मावतार धारण केला, म्हणून हा दिवस भारतातल्या काही मंदिरांमध्ये कूर्मजयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वास्तूपूजन, भूमिपूजन केलं जातं. योगमाया बगलामुखी देवीच्या मंदिरात ही कथा अजून थोडी वेगळी छटा धारण करून येते. विष्णूने मंदारपर्वत धारण करण्यासाठीची शक्ती स्तम्भनकारिणी बगलामुखी देवीकडून घेतली, असं सांगून देवीचा महिमा गायला जातो. दुसरं मंदिर कर्नाटकात चित्रदुर्गमधील होसदुर्ग तालुक्यात गवी रंगापुरा या लहानशा गावात आहे. गवी रंगनाथस्वामी या नावाने ते ओळखलं जातं. मूळ गुहेत असलेलं हे मंदिर आता व्यवस्थित विकसित केलेलं आधुनिक धाटणीचं दिसतं. इथंदेखील मूर्तीऐवजी कासवाच्या अवशेषांची पूजा केली जाते.  तिसरं मंदिर चित्तूरला कूर्माई गावात आहे. ते ‘कूर्म वधीराजा स्वामी मंदिर’ म्हणून ओळखलं जातं. दक्षिण भारतातलं सर्वांत मोठं शिवलिंग असलेलं मंदिरही याच गावात असल्याने हे विष्णूमंदिर काहीसं दुर्लक्षित राहिलेलं आहे. Ghumakkadi 42 at 4-compressed पाणी, चंद्र, पृथ्वी, काळ, अमरत्व आणि उत्पत्ती या सहाही गोष्टींशी कासवाचा काही ना काही संबंध जोडला जातो. स्थैर्य, कणखरपणा हे गुण त्याच्याकडून मिळतात असं लोकांना वाटतं. मंदिरांमध्ये कासव असतं ते त्यानं विष्णूची प्रार्थना केल्याने, अशी एक गोष्ट आहे. मुळात हा जीव सत्त्वगुणी मानला जातो. मंदिरात प्रवेश करण्याआधी कासवाचं दर्शन घेणं म्हणजे, कासव जसं स्वसंरक्षणार्थ आपले अवयव पाठीच्या ढालीखाली आत खेचून घेतं तसं माणसानं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या सहा रिपुंना दडपून ठेवून मोकळ्या मनाने देवदर्शनाला जाणं; त्यातूनच माणूस आध्यात्मिक उन्नती साधू शकतो, असा विचार यामागे आहे. आत्मज्ञानाचं ते प्रतीकच आहे. कासवाच्या पाठीवर हत्ती वा लोखंडी खांब यांच्याद्वारे पृथ्वी तोलून धरली गेल्याच्या कथा आहेत. इथं कासव हे स्त्रीरुपाचं आणि हत्ती वा खांब हे पुरुषरूपाचं प्रतीक आहेत, असाही अर्थ काही अभ्यासक काढतात. चीनी देवता नुवाने एओ या विराट कासवाचे पाय तोडले आणि स्वर्ग खाली कोसळू नये म्हणून या पायांचा टेकू दिला, अशीही एक कथा आहे. पृथ्वी सपाट होती, अशी कल्पना जिथं जिथं होती, तिथं कासवाच्या पाठीवरील नक्षीमुळे ते पृथ्वीचं प्रतीक मानलं जाणं स्वाभाविक होतं, असंही अभ्यासक म्हणतात. घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार कासवाबाबत जितक्या उत्पत्तीकथा, पुराकथा, लोककथा जगभर आढळतात; त्याहून कैक पटींनी जास्त अंधश्रद्धा या दुनियेत आहे. अगदी कासवांचा जीव जाण्याची वेळही कधी त्यामुळे उद्भवते. उदा. २१ नखं असलेल्या कासवाचा बळी दिल्याने पाऊस पडतो अशी एक अंधश्रद्धा आहे. माती, दगड इथपासून ते सोनंचांदीसारख्या धातूंपर्यंतची कासवं अनेक देशांमध्ये पूजनीय वा शुभ वस्तू म्हणून अनेक देशांमधल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतात. पण कासवांचे खरे सोहळे पाहायचे असतील, तर  फेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्‍नागिरीमध्ये ‘समुद्री कासव महोत्सव’ साजरा केला जातो; तेव्हा अगदी पोराबाळांसह तिथं अवश्य जावं. ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांची पिल्लं अंड्यांमधून कशी बाहेर येतात आणि अशी शेकडो कासवं हळूहळू चालत समुद्रात कशी शिरतात, हे पाहणं हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असतो. अधिक वेळ असेल, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या  वायंगणी गावात ऑलिव्ह रिडले याच सागरी कासवांचं प्रजनन व संवर्धन केंद्र आहे; तिथं जाऊनही अधिक माहिती मिळवता येऊ शकते. Ghumakkadi 42 at 6-compressed आपल्याकडे एक कूर्मपुराण आहे; मात्र जगभरच्या कासवकथा अगणित आहेत. त्यामागच्या माणसांच्या कल्पनांचा विचार करू गेलं, तर थक्क व्हायला होतं. रात्री संपतील, पण गोष्टी संपणार नाहीत... असं वाटावं इतक्या अमाप कहाण्या आहेत या सगळ्या. (सर्व फोटो आणि चित्र: कविता महाजन)

घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :

 

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget