एक्स्प्लोर
घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!

लोककथांमध्ये अनेक लहान-मोठे पोटभेद / पाठभेद असलेल्या आवृत्त्या असतात. मौखिक साहित्यातली ती गंमत असतेच. बैगांच्या कथेत देखील असं घडलेलं आहेच. पवनदसेरीनं पृथ्वी सुकवल्यावर लोखंडाचे खांब रोवून ती ‘पक्की स्थिर’ केली, असं गेल्या लेखातल्या गोष्टीत सांगितलं होतं. दुसऱ्या गोष्टीत हे खांब गायब झालेत आणि पवनदसेरीनंतर भीमसेनाचं आगमन झालंय. हा भीमसेन कोण हे ठाऊक नाही, पण हा इतका महाकाय होता की, याचा एक पाय ईश्वरासमोर होता आणि दुसरा त्याच्या घरात. आता हे घर कुठं होतं? माहीत नाही. असे तर्क कथांमध्ये करायचे नसतात आणि अशा नसत्या शंका विचारून गोष्टीतली गंमत घालवायची नसते. तर भीमसेन ईश्वरासमोर आला खरा, पण त्याला इतकी भूक लागली होती की, काही म्हणजे काहीच सुचत नव्हतं. मग ईश्वराने त्याला खायला पंचवीस पोती तांदूळ आणि बारा पोती मसूरडाळ दिली. तरी त्याचं पोट भरलं नाही, म्हणून ईश्वरानं अजून बारा पोती मसूरडाळ दिली. ती खाऊन झाल्यावर भीमसेनानं विचारलं, “ईश्वरा, खरंच म्हातारा झालाहेस तू. खायला दिलंस हे ठीक, पण प्यायला द्यायचं विसरून गेलास की काय?”
ईश्वर कंटाळून म्हणाला, “आता काय प्यायचं हे तुझं तूच शोध बाबा.”
मग भीमसेन पृथ्वीकडे वळून शोध घेऊ लागला. त्याला एक विलक्षण झाड दिसलं. डेरेदार, पण पोकळ खोडाचं. त्या झाडावर अगणित पक्षी येत होते आणि वाकून पोकळ बुंध्यात भरलेला द्राव पीत होते. झाडावर चढून भीमसेनने देखील द्रवात हात बुडवला आणि काय आहे हे चाखून पाहिलं. ते मोहाचं झाड होतं आणि तो द्राव होता मोहडा, म्हणजे मोहाची दारू. ते पिऊन भीमसेन देखील पक्ष्यांप्रमाणे मान वेळावू लागला. त्याचं डोकं हलकं हलकं झालं. मग त्यानं झाडाच्या पानांचे बारा द्रोण बनवले आणि त्यात मोहडा भरून तो ईश्वराला अर्पण केला. पवनदसेरी आणि कावळीनेही मोहडा प्यायला. मग भीमसेन डुलत डुलत कामावर निघाला. त्याने कुठे पर्वत निर्माण केले, कुठं दऱ्या खोदल्या, कुठून नद्यांना वाटा काढून दिल्या, तर कुठं असंख्य झाडं लावून जंगलं निर्माण केली. पाच वर्षं तो हे काम करत होता. मग एके जागी भेगाळ जमीन होती, तिच्यातून नंगा बैगा आणि त्याची बायको असे दोघंही जन्मले. बैगाला हवं होतं वाद्य! त्यानं धरतीला विचारलं, तर ती म्हणाली, “तुझं वाद्य तूच तयार कर.”
मग बैगानं एक बांबू तोडून घेतला, एक भोपळा घेतला आणि आपल्या डोईचा एक केस तोडून त्याची तार बनवली. ते सगळं जोडलं. हे पृथ्वीवरचं पहिलं वाद्य होतं. वाद्यातून गुंजणारे सूर ईश्वराला ऐकू गेले आणि त्याला पृथ्वीवर मानव जन्मल्याचं समजलं. त्यानं कावळीला पाठवून बैगाला बोलावून घेतलं. धरतीमाता म्हणाली, “अजून पृथ्वी डगमगतेच आहे, तू जाऊ नकोस.”
पण बैगानं तिचं ऐकलं नाही. तो गेला. ईश्वर म्हणाला, “या डगमगत्या पृथ्वीला आधार द्यायचं काम तुझं आहे. तुझी नखं तीत रोवून ठेव.”
पण बैगाला चांगली नखंच नव्हती. त्यानं बोटं रोवून पाहिली, पण काहीएक उपयोग झाला नाही. मग नंगा बैगानं अग्नीदेवाला शोधलं. त्याची प्रार्थना केली. अग्निदेवानं लोहार जन्माला घातला. अग्नीपुत्र असल्याने लोहाराला कधीच अग्नीचं भय वाटत नव्हतं. त्यानं चांगले मजबूत असे बारा लोहखांब बनवले. आणि पृथ्वीवर चहूकडे पक्के रोवले. त्यामुळे पृथ्वीचं डगमगणं थांबलं. आता इथं शेती करता येऊ शकणार होती. ईश्वराने बैगाला आणि त्याच्या पत्नीला मुबलक बियाणं दिलं; ते पवनदसेरीच्या आणि पक्ष्यांच्या मदतीने त्यांनी सर्वदूर पेरलं. पिकं लवलवू लागली. माणसं समृद्ध बनू लागली.
गोंड ही बैगांच्या जवळची, म्हणजे त्याच परिसरातली आदिवासी जमात. त्यांची सृष्टीनिर्मितीची कथादेखील काहीशी अशीच आहे. ईश्वराला त्यांनी ‘बडादेव’ असं नाव दिलंय. एकदा त्याच्या मनात आलं की, विविध जीव निर्माण करावेत. त्यानं आजूबाजूला पाहिलं, तर सर्वत्र पाणीच पाणी होतं. मग त्यानं आपला डावा दंड चोळून मळ काढला आणि कावळा बनवला. त्याला पृथ्वी शोधायला पाठवलं.
कावळा खूप काळ उडत राहिला आणि मग थकून एका खेकड्याच्या पाठीवर बसला. खेकड्याचं नाव होतं काकडमल. खेकड्यानं कावळ्याला किचकमल नावाच्या गांडुळाकडे नेलं. गांडुळानं पृथ्वी देण्यास नकार दिला. मग खेकड्यानं त्याची मानगूट पकडून अशी काही पिरगाळली की, गांडुळाच्या तोंडातून पृथ्वी उलटून बाहेर पडली.
तोवर बडादेवानं मकडमल नावाच्या एका कोळ्याला भलंमोठं जाळं विणून ठेवायला सांगितलं होतं. कावळ्याने आणलेली पृथ्वी बडादेवानं त्या जाळ्यावर पसरवून ठेवली. त्यामुळे ती स्थिर राहीना, सारखी डगमगू लागली.

( सर्व चित्रांचे चित्रकार : सुरेश धुर्वे )
मग बडादेवानं आपल्या केसांपासून अगणित झाडं बनवून पृथ्वीवर लावली. या झाडांच्या मुळांनी माती घट्ट धरून ठेवली. त्यानंतर त्यानं आपल्याला हवे होते ते सर्व जीव घडवले आणि त्यांना पृथ्वीवर ठेवलं. ही गोष्ट ऐकताना मला मजा वाटली, कारण जगभरच्या गोष्टींमध्ये ‘कासव’ महत्त्वाची भूमिका बजावतं, पण इथं मात्र ती भूमिका खेकड्याने केलीये. कदाचित ‘मानगूट पकडून’ धमकावण्याचं काम असल्याने रचनाकर्त्याला कासवाच्या पायांहून वा दाढांहून खेकड्याच्या नांग्या अधिक सुयोग्य वाटल्या असतील. खेरीज पृथ्वीचं ओझं त्यानं खेकड्याच्या पाठीवर ठेवलंच नाही; त्यासाठी नाजूक जाळी विणणाऱ्या कोळ्याला काम दिलं. घरातली जळमटं काढताना आता सतत पृथ्वी अशाच काही नाजूक सुंदर धाग्यांवर तरंगतेय, याची आठवण होत राहणार. गोष्टी मनात घर करतात, त्या अशा.घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :
घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा
घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार
घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल
घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं
घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु
घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं
घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा
घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना
घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !
घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!
घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…
घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…
घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!
घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…
घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस
घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा
घुमक्कडी (27) भई जब लाखो उदला वायरो
घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय
घुमक्कडी (25): साकाचं बेट
घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ
घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय
घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!
घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो
घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू
घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!
घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं
घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ
घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे
घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे
घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!
घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे
घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट