एक्स्प्लोर

BLOG : सर्व काही सिनेमाच आहे.....

Everything is Cinema Movie review : कोरोना लॉकडाऊन दरम्यान दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. कधी नव्हे ते लोक चार भिंतीत राहिले. एकमेकांशी समोरासमोर बसून बोलू लागले. एक दोन दिवसांसाठी या सर्व गोष्टींचं अप्रुप वाटलं. हरवलेला संवाद पुन्हा सुरु झाला. नाती रिफ्रेश होणं, करणं वगैरेच्या नावाखाली हे सर्व खपवलं गेलं. पण लॉकडाऊन वाढला. आता खरी गोची झाली. सतत घरात राहून लोक अस्वस्थ व्हायला लागले. ही अस्वस्थता वाढतंच गेली. मोठं कुटुंब एकत्र असेल तर बात वेगळी आहे. एकमेकांचे किस्से ऐकण्यात वेळ जातो, हसणं, गप्पा मारणं सुरु राहतं. आपसात टेर खेचली जाते. पण नवरा बायको दोघेच एका घरात लॉकडाऊनमध्ये अडकले असतील तर. ते ही नवरा स्ट्रगलर फिल्म डायरेक्टर आणि बायको मोठी नव्हे पण बऱ्यापैकी काम मिळत असलेली यशस्वी अभिनेत्री असतील तर. या दोघांमध्ये नक्की काय बातचीत होईल, कसे रिअॅक्ट करतील याबद्दल एक सिनेमा बनलाय. एव्हरिथिंग इज सिनेमा (2021). कोलकाता महानगरात हा सिनेमा घडतोय. 

हा लेख देखील वाचा- BLOG : 'ॲनेट (2021)' - एका अनायकाचा सिनेमा...'

दिग्दर्शक डॉन पलथरा याचा हा डॉक्यु-फिक्शन आहे. जागतिक पातळीवर डॉक्यु-फिक्शनची स्टाईल जुनी आहे. अगदी जिन ल्युक गोदार्दपासून इराणच्या मोहसीन मखमलबाफ, अब्बास कियोरोस्तमी सारख्या दिग्गजांनी डॉक्यु-फिक्शन प्रकारात महत्त्वाचं काम केलंय. भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही. पण केरळातल्या डॉन पलथरा आणि सनलकुमार ससीधरन सारख्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी हा नवीन ट्रेंड आणलाय. याद्वारे जागतिक पातळीवर भारतातल्या सिनेमासंदर्भातल्या प्रयोगांची दखल घेतली जातेय. प्रतिष्ठेच्या रॉटर्डम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2021 मध्ये एव्हरीथिंग इज सिनेमा (2021) दाखवण्यात आला. सिनेमा रिगेन या कॅटेगरीमध्ये त्याचं स्क्रिनिंग झालं. तेव्हा स्वत: गोदार्द  व्हर्च्युअल स्क्रिनिंगला उपस्थित होते. 

BLOG | फेसबुक डाऊननं माणूसपण सावरलं

नवीन सिनेमासाठी कोलकातामध्ये आलेला दिग्दर्शक आणि त्याची अभिनेत्री बायको यांची ही गोष्ट आहे. अगदी बेमालूमपणे या डॉक्युमेंट्री स्टाईल फिल्ममेकिंगमध्ये कथानकाची आखणी केली गेलीय. याआधी कोलकाता (1969) या फ्रेंच डायरेक्टर लुईस मॅल या डॉक्युमेंट्रीची फार चर्चा झाली. ब्रिटीशांच्या काळात सर्वात मोठं महानगर म्हणून कोलकाता  विकसित झालं. अस्ताव्यस्त पसरलं. खानाबदोश कामगारांचं हे शहर. तिथलं रोजचं जगणं या डॉक्युमेंट्रीत आलं होतं. डॉन पलाथराचा हा डॉक्युफिक्शन लॉकडाऊन दरम्यान कोलकात्यात काय घडलं हे दाखवतोच, पण तो त्यानंतर या शहरातल्या एका अपार्टमेन्टमध्ये अडकलेल्या सिनेमा क्षेत्राशी संबंधित या दाम्पत्यावर फोकस होतो. हा सर्व सिनेमा दिग्दर्शक नवऱ्याच्या दृष्टीकोनातून घडतोय. संपूर्ण सिनेमात इंग्रजी साहित्यापासून, स्त्री-पुरुष संबंध, फेमिनिजम, बाईची लैंगिकता, तिचं हस्तमैथुन, किर्लोस्की, तार्कोस्की सारख्या दिग्दर्शकांची फिल्ममेकिंग स्टाईल ते भारतात सिनेमा क्षेत्रात अभिनेत्रींकडे पाहण्याचा उपभोगवादी दृष्टीकोन असं भन्नाट संभाषण या दोन कॅरेक्टरमध्ये होतंय. 

अमॅच्योर शूटिंग टाईप असलेल्या या सिनेमात भन्नाट स्टेटमेन्टस आहेत. अफोर्डेबल सिनेमापासून ते देशातल्या राजकीय परिस्थितीवरही काही कॉमेंट करण्यात आल्यात. लॉकडाऊन आहे, अश्यावेळी दोन पात्रांची बंद घरातली आणि बाहेरच्या भवतालची घुसमट प्रभावीपणे दाखवण्यात आली. 

बदलत्या काळातून मेनस्ट्रीम सिनेमानं नक्की काय घेतलंय माहित नाही. पण एव्हरीथिंग इन सिनेमा(2021) सारख्या प्रयोगशील सिनेमानं या क्षेत्रातली नवं काही तरी घडण्याची आणि घडवण्याची आशा कायम ठेवलीय. मुबी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येऊ शकतो.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report :  गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget