Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नव्या खासदारांची बैठक घेत खासदारांचे अभिनंदन केले. तसेच इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election Result) शिवसेना शिंदे गटाने 15 पैकी सात जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेत शिवसेना गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांनी एकमत केलं आहे. उद्या (7 जून) खासदारांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांची बैठक होणार आहे.
इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना
दरम्यान, आज (6 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नव्या खासदारांची बैठक घेत खासदारांचे अभिनंदन केले. तसेच इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीमध्येच खासदारांना सूचना देण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला परवाना होणार आहेत. तत्पूर्वी, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी खासदारांचं अभिनंदन केले.
मित्र पक्षांना काय मिळणार?
या स्नेह भोजनासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह नरेश मस्के, प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, धैर्यशील माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार शीर्ष संजय शिरसाठ शिवसेना संजीव संजय मोरे उपस्थित होते. दरम्यान, एनडीए सरकार स्थापनेसाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरू असतानाच मित्र पक्षांना काय मिळणार? याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एनडीएमध्ये एकनाथ शिंदे यांचे सात खासदार सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला दोन राज्यमंत्री एक केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शकते.
मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव यांचे नाव सुद्धा आघाडीवर असून धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक घेण्यात श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. ते दोन लाख 9144 मतांनी विजयी झालेय. औरंगाबादचे संदिपान भुमरे हे एक लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले.
इतर महत्वाच्या बातम्या