एक्स्प्लोर

मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं आहे.

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीनेही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. तर, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आपणच सरकार स्थापन करणार आहोत, असे भाजप (BJP) नेत्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, आता भाजपच्यावतीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जून रोजी मोदी पंतप्रधानपदासाठी शपथ घेतील, अशी माहिती आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनही मोठं पॅकेज दिलं जाणार असल्याचे समजते.  

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे, जवळपास मोदींच्या शपथविधीचं निश्चित झालं आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या पक्षाचं समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. सर्वाचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरू भाजपाकडून सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपसमवेतच्या सर्वच घटकपक्षांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.  

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 9 जून रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी जाणार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज दिल्लीमध्ये एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली.

मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक

लोकसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे, त्यामुळे ते लगेचच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. दरम्यान, मोदींचा पंतप्रधान पदासाठीचा हा तिसरा शपथविधी सोहळा आहे. त्यामुळे, मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रीक होत आहे.  

4 खासदारांमागे 1 मंत्रीपद

एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचे संभाव्य जागावाटप ठरल्याची माहिती आहे. देशातील महत्त्वाचे 4 खाते भाजप स्वत:कडेच ठेवणार आहेत. तर, प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला भाजपने ठरवला आहे. त्यानुसार, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला तीन मंत्रीपद, राष्ट्रीय लोकजन शक्ती पक्ष राम विलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद, बिहारमधील जिंतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद, तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रीपद दिली जाणार आहेत. 

शिंदेंना 2 तर अजित पवारांना 1 मंत्रीपद

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. यांसह, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद, आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट, आणि जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षालाही 1 मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget