एक्स्प्लोर

कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन

पारनेर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली.

अहमदनगर: राज्यात लोकसभा निवडणुका सुरुळीत आणि काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडल्या. मात्र, लोकसभा निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांमध्ये असलेला तणाव अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके विजयी झाली आहे. त्यानंतर, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेरमध्ये खासदार निलेश लंके (MP Nilesh lanke) यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना घडली. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. पारनेर शहरातच आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश लंकेंनी आपला नियोजित दौरा सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली. 

पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडून टाकली. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेनंतर आता खासदार निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला आहे.

पारनेर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. दरम्यान, श्रीगोंदा येथे असलेल्या खासदार लंके यांनी आपला भेटीचा दौरा अर्ध्यावर सोडत राहुल झावरे यांना भेटण्यासाठी नगर गाठलं आणि रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली. झावरे यांच्या मणक्याला आणि पोटाला मार लागला आहे. पारनेर येथीलच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ही मारहाण झाली आहे, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं खासदार लंके यांनी यावेळी म्हटलं. आता, निवडणूक संपली आहे, तुमचा विजय झाला तरी पचवता आला पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवता आला पाहिजे, असं म्हणत लंके यांनी सुजय विखेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 

दरम्यान, या घटनेतील जे गुन्हेगार आहेत त्यांची निवडणूक काळातील भाषणं पाहिली तर ते अशा आविर्भावात होते की, आम्हाला कोणी काही करू शकत नाही. पण, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी सर्व कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं आहे, असं देखीलही लंके यांनी म्हटले.

राजेंद्र फाळकेंचा आरोप

सुजय विखे पाटील यांचे समर्थक विजय औटी यांच्याकडून राहुल झावरे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. विखे पाटलांमध्ये पराजय पचवण्याची ताकद नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच ही मारहाण झाल्याचे फाळके म्हणाले. याबाबत गृहमंत्र्यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून करावाई करण्याची मागणीही त्यांनी केलीय. तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा फाळकेंनी दिलाय. 

पारनेरमध्ये परिस्थिती नियंत्रणात - पोलीस अधीक्षक राकेश ओला

पारनेर येथील आंबेडकर चौकात आज सकाळी दोन गटात आप-आपसात भांडण झाले होते. त्यामध्ये राहुल झावरे यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती आम्हांला मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणून झावरे यांना शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. सध्या, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जखमी झावरे यांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जबाबानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, पारनेरमध्ये शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

अटीतटीच्या लढतीत लंकेची बाजी

अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची झाली. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होती. राज्याचे महसूल आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृ.ण् विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी दुसऱ्यांदा भाजपचे तिकीटावर निवडणूल लढवली. त्यांच्याविरोधाक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे लोकसभेच्या मैदानात होते. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेनी विजय मिळवला आहे. त्यांनी सुजय विखे पाटलांचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके जवळपास 29317 मतांनी विजयी झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget