मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
धाराशिव लोकसभा म तदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश निबाळकर यांनी महायुतीच्या अर्चना पाटील यांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे
मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघात मोठा लीड घेऊन शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. निवडणूक प्रचारात तानाजी सावंत यांनी ओमराजेंविरुद्ध प्रचार करत त्यांच्यावर जबरी टीकाही केली होती. तर, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 5 आमदार महायुतीचे असतानाही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना मिळालं आहे. त्यामुळे, साहजिक राज्यभर त्यांच्या विजयाची चर्चा होत आहे. मात्र, शिंदे सरकारमधील नेते आणि मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातही निंबाळकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे.
धाराशिव लोकसभा म तदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश निबाळकर यांनी महायुतीच्या अर्चना पाटील यांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्यातील सर्वोच्च मताधिक्याचा हा विजय असून त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्या वेळेस खासदार झाले आहेत. धाराशिव मतदारसंघात एकतर्फी लढतीमध्ये निंबाळकर यांना 7,48,752 इतकी तर अर्चना पाटील यांना 4,17,906 मते मिळाली आहेत. निंबाळकरांनी पाटील पती-पत्नींचा पराभव केला आहे. त्यांनी 2019 साली तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख तेवीस हजार मतांनी पराभव केला होता. यापूवी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचा 2014 साली पराभव झाला होता. दरम्यान, धाराशिव मतदारसंघातील उमरगा, धाराशिव, भूम, परंडा, तुळजापूर, औसा, बार्शी या सर्वच विधानसभा मतदारसंघात ओमराजे यांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्यापैकी, तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून ओमराजे यांना सर्वाधिक 81 हजारांचा लीड आहे. त्यामुळे, तानाजी सावंत यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीत धोक्याची घंटा असल्याचे दिसून येते. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकाचा लीड कळंब-धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 60 हजार 423 मतांचे मताधिक्य ओमराजेंना आहे.
मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात 81 हजारांचा लीड
ओमराजे यांना 1 लाख 33 हजार 848 मते
अर्चना पाटील यांना 52 हजार 671 मते तर
ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी 81 हजार 177 मतांची आघाडी मिळाली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्यासाठी छातीचा कोट करणार असा मेसेज देऊनही तानाजी सावंत यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. याउलट तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य ही ओमराजे निंबाळकर यांच्या पथ्यावर पडल्याचंच निवडणूक निकालानंतर दिसून आलं
धाराशिवमधील 6 विधानसभा मतदारसंघातील मतदान
धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघात
ओमराजे यांना विक्रमी 1 लाख 37 हजार 158 मते
अर्चना पाटील यांना 76 हजार 735 मते.
ओमराजे निंबाळकर यांना 60 हजार 423 मतांची आघाडी.
वैशिष्ट्ये....
आमदार कैलास पाटील यांची मेहनत आणि ओमराजे निंबाळकर यांचे संपर्क यामुळे धाराशिव मधून चांगलं मताधिक्य.
धाराशिव मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होऊन अर्चना पाटील यांना फायदा झाला नाही
बार्शी विधानसभा मतदार संघात
ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 24 हजार 883 मते.
अर्चना पाटील यांना 70 हजार 671 मते.
ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी
वैशिष्ट्ये:-आमदार राजा राऊत यांनी अर्चना पाटील यांना बहीण म्हणून प्रचार केला परंतु राजा राऊत चा करिष्मा कमी पडला. अर्चना पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडवणीस यांची सभा झाली तरीही.. महायुतीला कमी मते. याउलट ओमराजे निंबाळकर बार्शी मतदार संघातील गावोगावी जाऊन सर्वांचा धडाका लावल्याने ओमराजांना या मतदारसंघात चांगली मते घेतली.
औसा विधानसभा मतदार संघात
ओमराजे यांना 1 लाख 2 हजार 248 मते .
अर्चना पाटील 67 हजार 282 मते
ओमराजे निंबाळकर यांना 34 हजार 966 मतांची विक्रमी आघाडी .
वैशिष्ट्य औषधे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार मतदारसंघ पिंजून काढला. बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेऊनही फायदा झाला नाही
उमरगा विधानसभा मतदार संघात.
ओमराजे यांना 1 लाख 6 हजार 669 मते
अर्चना पाटील यांना 62 हजार 725 मते
ओमराजे 43 हजार 944 मतांची आघाडी मिळाली आहे
वैशिष्ट्ये
ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवि गायकवाड यांनी आपलं सर्वस्व कोणाला लावूनही महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना लीड मिळू शकली नाही. उमरगांमधून जुन्या शिवसैनिकांनी आणि जनसामान्य लोकांनी हो मला ज्यांना भरभरून साथ दिल्याने ओमराजे निंबाळकर हे उमरगा विधानसभा मतदारसंघात जास्तीची मते मिळवण्यात यशस्वी ठरले
तुळजापूर विधानसभा मतदार संघात
ओमराजे निंबाळकर सर्वाधिक 1 लाख 38 हजार 791 मते
अर्चना पाटील यांना 86 हजार 615 मते तर
ओमराजे निंबाळकर यांना 52 हजार 176 मतांची आघाडी
वैशिष्ट्ये:-
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मुलाला भाजपमध्ये प्रवेश देऊ नये फायदा झाला नाही.
आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांचा तुळजापूर बालेकिल्ला असूनही राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मतांचा जोगवा कमी प्रमाणात दिला
डिपॉझिट जप्त झाले
दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात होते. यापैकी प्रमुख दोन उमेदवार वगळता इतर 29 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. निवडणुकीत झालेल्या एकूण वैध मतांच्या एक शाष्ठमोरा (26.6 टक्के) मते या उमेदवारांना मिळवता न आल्याने त्यांच्या डिपॉझिट रकमा जप्त होणार आहेत