एक्स्प्लोर

BLOG : बॉलिवूड आणि ड्रग्ज

मुंबईजवळच्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला बंगल्यावर काल पोलिसांनी धाड घातली आणि हाय प्रोफाईल पार्टी उधळून लावली. या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम बंगल्यावर दाखल झाली होती. पार्टीत ड्रग्ज, गांजा, दारुची उधळून सुरु होती आणि सगळे जण एका वेगळ्या नशेत होते. पोलिसांनी 10 पुरुष आणि 12 महिलांसह एकूण 22 जणांना अटक केली. यात सिनेसृष्टीत काम करणाऱ्या दोन अभिनेत्रीही आहेत. यातील एक मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेली तर दुसरी साऊथ इंडियन अभिनेत्री आहे. याशिवाय दोन महिला बॉलिवूडमधील कोरिओग्राफर आहेत. एकूणच बॉलिवूड आणि रेव्ह, ड्रग्ज पार्ट्यांच काही दशकांपूर्वी सुरु झालेलं नातं आजही कायम असल्याचं दिसून येत आहे.

दम मारो दम, मिट जाएं गम

बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम

म्हणत झीनत अमाननं देव आनंद द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित हरे रामा हरे कृष्णा सिनेमात हिप्पी संस्कृतीच्या ड्रग्ज पार्टीचं ७० च्या दशकात दर्शन घडवलं होतं. खरे तर त्यापूर्वीपासूनच देशात विशेषतः गोव्यात ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. गोव्यात केवळ नशा करण्यासाठी परदेशातून नागरिक येत असत. गोव्याच्या समुद्रकिनारी ड्रग्ज डीलर पार्ट्या आयोजित करून तरुणांना नशेची सवय लावत असत. गोव्यात होणाऱ्या या ड्रग्जच्या पार्ट्यांकडे कोणीही लक्ष देत नव्हते. निर्माता-दिग्दर्शक देव आनंदने आपल्या हरे रामा हरे कृष्णा चित्रपटात गोव्यातील ड्रग्ज पार्ट्यांचे दर्शन घडवले आणि देशातील प्रेक्षकांना ड्रग्जच्या पार्ट्यांची माहिती झाली. यानंतर देशभरात ड्रग्जच्या व्यवसायाने आपले बस्तान बसवले.

चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नव्हते. 70-80 च्या दशकात बॉलिवुडमधील काही कलाकार ड्रग्ज घेत असत असे सांगितले जाते. मात्र याचे प्रमाण फार कमी होते. सततच अपयश, अयशस्वी प्रेमप्रकरणामुळे हे कलाकार ड्रग्जच्या जाळ्यात अडकले होते. यात काही नायिकांचाही समावेश होता. मात्र तेव्हा पार्टी करून ड्रग्ज सेवन करण्यास तशी सुरुवात झाली नव्हती. काही ड्रग्ज डीलर या कलाकारांना खाजगी पद्धतीने ड्रग्ज पुरवत असत आणि चुपके चुपके हे कलाकार ड्रग्जचे सेवन करीत असत.

1980 च्या दशकात अंडरवर्ल्डने बॉलिवुडमध्ये प्रवेश केला तेव्हापासून बॉलिवुडमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पोलिसांच्या डोळ्याआड ड्रग्जचा पुरवठा सुरु करण्यात आला. यामुळे   कलाकारांमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले. चित्रपटातही कलाकार ड्रग्ज घेतानाची दृश्ये मोठ्या प्रमाणावर दाखवण्यास सुरुवात झाली. बॉलिवुडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कालावधीत बॉलिवुडच्या कलाकारांसाठी ड्रग्ज पार्ट्यांचं आयोजन करणे सुरु झाले. कलाकारांसोबतच त्यांच्या मुलांपर्यंतही ड्रग्ज पोहोचवण्याचे काम याच काळात सुरु झाले. त्यामुळे केवळ चित्रपट कलाकारच नव्हे तर त्यांची मुलेही नशेच्या जाळ्यात अडकली होती. गांजा, कोकेनपासून मारिजुआनापर्यंतच्या नशेच्या डोसचा पुरवठा केला जात होता. त्या काळात कोकेनला सगळ्यात जास्त मागणी होती.

याचे प्रमुख उदाहरण म्हणजे संजय दत्त. संजय दत्त पूर्ण नशेच्या आहारी गेला होता. त्याला नशामुक्ती केंद्रातही ठेवण्यात आले होते. संजय दत्तला 1982 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पाच महिन्यांची शिक्षाही झाली होती. रणबीर कपूरनेही एका मुलाखतीत अभिनय शिकत असताना मारिजुआना घेत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर मात्र त्यापासून दूर असल्याचे त्याने सांगतले. मात्र गेल्या वर्षी करण जोहरच्या पार्टीत रणबीर दिसला तेव्हा त्याने ड्रग्ज घेतल्याचे म्हटले गेले होते. परंतु करण जोहरने या सगळ्याचा इन्कार केला होता. संजय दत्तप्रमाणंच फिरोज खानचा मुलगा फरदीन खानलाही 2001 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. काही गायकही या अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं सांगितलं जातं.

बॉलिवूडमधील कलाकारांसाठी ड्रग्ज डीलर पार्ट्या आयोजित करीत असत. या पार्ट्यांमध्ये सुरुवातीला फ्रीमध्ये काही शॉट्स दिले जात. त्यांना चटक लागली की मग मोठ्या रकमेने ड्रग्ज विकले जात अशी माहिती बॉलिवूडमधील एकानं दिली होती. ड्रग्जच्या नशेमुळं अनेक कलाकारांनी आपलं आयुष्य बरबाद केलंय.

कुख्यात ड्रग डीलर विकी गोस्वामीशी ममता कुलकर्णीनं लग्न केलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होते. सध्या ममता आणि विकी गोस्वामी ड्रग रॅकेटचे सूत्रधार असल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

विनोद खन्नाचा मुलगा साक्षी खन्नाला 2011 मध्ये एका रेव्ह पार्टीत सहभागी झाल्यानं अटक करण्यात आली होती. 2012 मध्ये अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा अग्निहोत्रीला रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती. जुहू येथील ओकवुड हॉटेलमध्ये झालेल्या या पार्टीत 150 जणांना अटक करण्यात आली होती. अनेक देशी-विदेशी मॉडेल्स आयपीएलचे दोन खेळाडूही सामिल होते. गेल्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचे व्हिज्युअल समोर आले होते. यात रणवीर कपूरपासून विकी कौशलपर्यंत अनेक कलाकार दिसत होते. मात्र करण जोहरने या पार्टीत कोणीही ड्रग्ज घेतले नसल्याचा खुलासा केला होता.

2005 मध्ये अभिनेता विजय राजलाही दुबई पोलिसांनी ड्रग्ज नेत असताना अटक केली होती. राहुल महाजन, परवीन बाबी, मनिषा कोईराला, यो यो हनी सिंह ड्रग्ज अँडिक्ट असल्याचं बॉलिवूडमध्ये खुलेपणानं म्हटलं जात आहे. प्रख्यात मॉडेल गीतांजली नागपाल दिल्लीच्या रस्त्यांवर आणि बागांमध्ये नशेमध्ये धुत होऊन पडलेली अनेकदा आढळून आली होती. तशा बातम्याही आल्या होत्या. शाहरुखची पत्नी गौरी खानलाही बर्लिन विमानतळावर मारिजुआना नेत असताना अडवण्यात आलं होतं. त्याची मात्रा कमी असल्यानं आणि ते स्वतःच्या वापरासाठी असल्याचं तिनं सिद्ध केल्यानं तिला सोडण्यात आल्याचं सांगितलं जातं.

गेल्या वर्षी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोव्यामध्ये एका रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी अभिनेता कपिल झवेरीला पोलिसांनी अटक केली. या पार्टीत दहा लाख रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचं नातं संपुष्टात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. आजही या प्रकरणी पोलीस काही जणांना अटक करताना दिसत आहेत.

तर असे हे ड्रग्ज आणि बॉलिवुडचा अत्यंत जवळचे नाते आहे. इगतपुरीच्या प्रकरणानं पुन्हा एकदा या नात्याची उजळणी झाली आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget