एक्स्प्लोर

BLOG : भाषा पैशाची : गुंतवणुकीची एबीसीडी आणि त्यापुढे.. 

BLOG : रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण गुरुवारी जाहीर झालं. रिझर्व बँकेने मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये व्याजाचे दर अनचेंज्ड म्हणजेच जैसे थे ठेवले. आता टमाच्यांचे दर कोसळत असले तरी, पतधोरण जाहीर झालं तेव्हा टमाट्यांचे दर 140 रुपये प्रति किलोच्या आसपास होते. मसाल्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. व्याजाचे दर जरी तसेच ठेवले तरी सुद्धा अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी 19 मे  ते 28 जुलै दरम्यान ज्या एफडी  झाल्या आहे त्यात जास्तीची 10 % सीआरआर ची तरतूद करून ठेवावी असे निर्देश करण्यात आले. एकूणच महागाईला आळा  घालणं आणि प्रगतीचं पाऊल टाकण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्याचे काम रिझर्व बँक या पॉलिसीच्या माध्यमातून करत असते. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान अमेरिकी फेडरल रिझर्व त्यांच्या व्याजाचे दर कमी करण्यास सुरुवात करु शकतं. भारतात ही दरकपात जून पर्यंत होईल असे जाणकार सांगतात. 

त्यात अमेरिकेत क्रेडिट कार्डाचे बॉरोईंग पहिल्यांदा उच्चांकांवर आहे. ते ही जवळपास एक ट्रिलियन डॉलरपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. तेव्हा भविष्यात 2008 चा धक्का बसेल की काय? अशी सुद्धा चर्चा बाजारात आहे, पण ते आपल्याला काळच दाखवेल. लघु अवधीसाठी कुणीही काहीही गॅरंटीने सांगू शकत नाही. मात्र आजवरचा अनुभव असा आहे की जे गुंतवणूकदार बाजारात आठेक वर्षे थांबतात, त्यांना नुकसान सोसावं लागत नाही. उदाहरण द्यायचं तर, 2008 साली रिसेशनचे ढग जेव्हा अधिक गडद होऊ लागले तेव्हा बाजार 21000 गाठून 8000 पर्यंत खाली आला होता. पण त्याआधी आठ वर्षे म्हणजे 2000 साली बाजार 5000-5300 च्या दरम्यान ट्रेंड करत होते. बाजाराने न्यूनतम पातळी गाठून सुद्धा मागील आठ वर्षांच्या तुलनेत वरच होते. तसेच 2020 मध्ये कोविडचा मारा झाला आणि मार्च 2020 साली लॉकडाऊन लागू झालं. 41000 चा सेन्सेक्स अगदी 29000 पर्यंत खाली आला पण त्या आधी आठ वर्षे म्हणजे ज्यांनी 2012 साली खरेदी केली असेल ती 17000 च्या स्तरावर झाली असली पाहिजे. म्हणजेच काय किमान आठ वर्षे बाजारात थांबणे गरजेचं आहे. कमी कालावधीमध्ये काहीही होवो दीर्घावधीमध्ये समृद्धी येते. त्यातही आपण नेमक्या कोणत्या कंपन्या गुंतवणुकीसाठी शोधायच्या हे ही महत्वाचे असते. 
मागील भागात आपण शेअर बाजारात गुंतवणुकीचे काही मूल मंत्र समजून घेतले होते. आता त्याच्या पुढील भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू. 

शेअर शोधण्याचे मुळात दोन प्रकार असतात, एक म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस आणि दुसरे म्हणजे फंडामेंटल अॅनालिसिस. टेक्निकलबद्धल पुढे समजावून घेऊ. सध्या बोलूया फंडामेंटल अॅनालिसिसबद्धल. त्यातही दोन भाग करता येतात. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस  आणि दुसरे म्हणजे क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिस.  क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस मध्ये काय काय असते हे मुद्देसूद जाणून घेऊया. 

समभागांच्या कंपनीच्या व्यवसायाची माहिती असणे. तो व्यवसाय समजणे. क्वालिटेटिव्ह अॅनालिसिसमध्ये सगळ्यात महत्वाचे असते की ज्या कंपनीचा समभाग आपण विकत घेतो त्या कंपनीबद्दल, त्या कंपनीच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती असायला हवी.  म्हणजे आपण गुंतवणूक करत असलेली कंपनी नेमका काय व्यवसाय करते,  काय विकते,  त्याच्या व्यवसायाच्या सायकल काय असतात. हे समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर बरेचदा पेनी स्टॉक्स किंवा सहज सुद्धा आपण अशा काही कंपनीचा समभाग विकत घेतो त्या कंपनी बद्धल आपल्याला काही माहिती नसते. ती कंपनी नेमके काय विकते, काय व्यवसाय करते या बद्धल काहीही माहिती नसते.

आपण उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करुया.. रिलायन्सचा शेअर घेत असताना कंपनी नेमके काय काम करते,  कच्च्या तेलाचे प्रोसेसिंग करण्याची प्रक्रिया काय? कच्च्या तेलाचे राजकारण काय आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काय सांगते,  वारे कसे वाहतात. अगदी एका बॅरेल मध्ये किती लिटर तेल येते?  याची सुद्धा माहिती नसते. आईल रिफायनरीशिवाय याच कंपनीचे मीडिया, टेक्स्टाईल किंवा इतर व्यवसाय जी कंपनी करते त्याबाबतही माहिती असणे आवश्यक आहे. ती जर का नसेल कंपनीचा समभाग घेताना म्हणजे त्या कंपनीचे मालक बनत असताना त्या कंपनीबद्धल समजायला हवे. आपण विकत घेत असलेल्या कंपनीचा व्यवसायच आपल्याला नेमका काळात नसेल तर आपण त्या व्यवसायाचे मालक कसे बनू शकू? तेव्हा सगळ्यात आधी त्या कंपनीचा व्यवसाय समाजायला हवा. अगदी मायक्रो लेव्हलचा नको. पण किमान बेसिक तरी कळायला हवा.

कंपनीचे प्रमोटर कोण?

त्या नंतर त्या कंपनीचे प्रमोटर कोण?  त्यांचा बॅकग्राउंड काय आहे?  म्हणजे एकूणच चारित्र्य,  इतिहास, कर्तृत्व याचाही अभ्यास करायला हवा. 

कंपनीचा इतिहास?

त्या नंतर संबंधित कंपनीला किती वर्षाचा इतिहास आहे?  कुठलीही कंपनी साधारण वीस वर्षात सगळे उतार चढाव बघून घेते. या वीस वर्षात जवळपास अर्थव्यवस्थेची सुद्धा एक सायकल झालेली असते. त्यामुळे आपण विकत घेत असलेल्या समभागाच्या कंपनीला किमान वीस वर्षांचा तरी इतिहास असावा. वीस वर्षात जर का ती कंपनी उभी राहिली तर तिने सर्व वादळे सहन केली असतील तर कंपनीच्या सुदृढतेविषयी खात्री पटते. आपण गुंतवणूक करत असताना दीर्घावधीसाठीच करतो. त्यामुळे असे भाकीत करायला किंवा अपेक्षा करायला हरकत नाही की भविष्य कसे राहील?

ब्रँड व्हॅल्यू कशी आहे?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण गुंतवणूक करत असलेल्या कंपनीचा ब्रँड कसा आहे? ब्रँड व्हॅल्यू ही खूप महत्वाची असते. ब्रँड चांगला असेल आणि जनमानसात ब्रँडची चर्चा असेल तर त्याला बाजाराची काळजी करायची गरज नाही. याचे उदाहरण म्हणजे, आपल्या घरात काही फर्निचर वगैरे करायचे असेल तर आपण सुताराला लागणाऱ्या सामानाची यादी मागतो. त्यात तो गोंद, चिक्की, एढेसिव्ह लिहीत नाही, तो फेविकॉल लिहितो. आपल्या बहुतांश घरात  फेव्हिस्टिक पासून तर डॉ फ़िक्सिटपर्यंत पिडीलाईट कंपनीचे प्रॉडक्ट वापरले जातात. (इथे पीडिलाइट कंपनीचा समभाग घ्या, असा कुठलाही सल्ला देण्याचा प्रयत्न नाही. केवळ उदाहरण म्हणून आपण या कंपनीची चर्चा करत आहोत). म्हणजेच या कंपनीचा ब्रँड सर्वदूर पोहोचलेला आहे. मग अशा कंपनीचा विचार करायला हरकत नाही. 

त्या कंपनीचा भौगोलिक विस्तार कसा कुठे? कंपनीचे हेड ऑफिस कुठे? अशा बाबींचीही माहिती संकलित करायला हवी. अशा काही गोष्टींची माहिती संकलित झाली आणि ती समाधानकारक असेल तर आणि तरच आपण गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा. पीटर लिंच असं सांगतात की कॉमनसेन्सने जी वस्तू तुम्ही वारंवार विकत घेता आणि जेवढा व्यवसाय तुम्हाला समजतो तो पुरेसा आहे पुढील अभ्यासाचे पाऊल उचलायला.  फंडामेंटल अॅनालिसिस करताना क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस प्रथमदर्शनी करायचे आणि मग क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिसकडे वळायचे. 

तूर्तास आपण इथे थांबूया. पुढील भागात क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिस कसे करायचे आणि नेमका शेअर किंवा समभाग निवडताना काय बघायचे हे बघणार आहोत. त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही टीपवर अवलंबून राहायची गरज नाही. हजारो रुपये खर्चून क्लासेस करायची गरज नाही. अभ्यास मात्र महत्वाचा.. चला तर चांगले समभाग शोधण्याची मोहीम सुरु करूया. बघा पटतंय का?

याच लेखिकेचे संबंधित ब्लॉग : 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget