एक्स्प्लोर

Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान

Nitesh Rane Vs Uday Samant : भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मान देऊन जर युती होत असेल तर आम्ही तयार आहोत, नाहीतर स्वबळावर लढण्यासाठी सक्षम आहोत असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद काही थांबण्याची चिन्हं नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरुन वाद सुरू आहे. त्यातच आता नितेश राणे (Nitesh Rane) विरुद्ध उदय सामंत (Uday Samant) वाद रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान त्यांनी उदय सामंत यांचं नाव न घेतला दिलं.

कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलं. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं नितेश राणे म्हणाले.

Uday Samant On Yuti : नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत?

महाराष्ट्रात एवढं कुणी बोलत नसेल तेवढं तुमच्या तालुक्यात बोलत आहेत. आम्ही स्वबळावर लढू, आमच्याकडे इतक्या संस्था आहेत, आमच्याकडे इतके कार्यकर्ते आहेत अशी भाषा केली जाते. आपल्याला महायुतीतूनच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला जर खुमखुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतोय हे दाखवण्याची तयारीही आमची आहे. शिवसेनेला डिवचण्याचं काम जर कुणी करत असेल तर शिवसेना काय आहे हे सांगण्याचं काम आमचं आहे.

Nitesh Rane On BJP Shivsena Yuti : भाजप कार्यकत्याला सन्मान मिळावा

कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळते का नाही हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले. भाजपाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो, पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू असं ते म्हणाले.

Nitesh Rane Ratnagiri Speech : आम्हाला हलक्यात घेऊ नका

भारतीय जनता पक्षाची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळं निर्माण झालं आहे. आमचं मतदान, आमची ताकद वाढली आहे. रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे असं नितेश राणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले. त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये. कुणी आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये. कुणाला खुमखुमी काढायची असेल, मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं नितेश राणे म्हणाले.

विरोधकांकडून मतदार यादीतील घोळावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "मोहम्मद अली रोड, बहराम पाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार, चौबार मतदार आहे ते दाखवतो. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिंमत असेल तर मोहल्ल्यामध्ये जा. बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला असतात का? मोहल्लामध्ये जाऊन त्यांना बडवण्याची भाषा करा."

अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही. त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करणार. हिंदु राष्ट्रासाठी मी बोलत राहणार. त्यांनी नोटीस पाठवत राहावं असंही नितेश राणे म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 
उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 
Husain Dalwai : टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध काय? त्याचा फोटो लावणं चुकीचं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मोठी प्रतिक्रिया
टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध काय? त्याचा फोटो लावणं चुकीचं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मोठी प्रतिक्रिया
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाची चर्चा,  कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक, आधी चिपळूण-कराड रेल्वे मार्ग सुरु करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाची चर्चा,  कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक, आधी चिपळूण-कराड रेल्वे मार्ग सुरु करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
Embed widget