एक्स्प्लोर

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...

Share Market FPI : विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील चार दिवसात त्यांनी रणनीती बदलली आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली.  सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्याचा विचार केला असता घसरणीसह बंद झाले. याचं एक कारण समोर आलं आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारंनी ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक कायम ठेवली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरु करण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारातील शेअरची विक्री करुन गुंतवणूकदारांनी चार दिवसात 12569 कोटी रुपये काढून घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोर संकेत आणि जोखमीपासून वाचण्याच्या उद्देशानं एफपीआयनं पैसे काढून घेतल्याचं म्हटलं जातंय.

FPI Sell Stake in Indian Market : विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र

ऑक्टोबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारंनी भारतीय बाजारात 14610 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एफपीआयनं जुलै मध्ये भारतीय शेअर बाजारातून 17700 कोटी रुपये काढून घेतले होते. ऑगस्ट महिन्यात 34990 कोटी रुपये तर सप्टेंबर महिन्यात 23885 कोटी रुपये काढून घेतले होते. 

 जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयकुमार यांच्या अनुसार एफपीआय भारतीय बाजारातील त्यांची भागीदारी विकत असून अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या बाजारात गुंतवणूक करत आहेत. 

 अँजलवन चे वरिष्ठ फंडामेंटल विश्लेषक वकार जावेद खान यांच्या मते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून टेक शेअरमध्ये जागतिक विक्री पाहता भारतीय शेअरची विक्री करत 12569 कोटी रुपये काढून घेतले. भारतीय कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. मिडकॅप सेक्टरनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, जागतिक आव्हानांमुळं एफपीआय जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाहीत. 

डेब्ट मार्केटमधून देखील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1758 कोटी रुपये काढून घेतले. त्याचवेळी व्हीआरआय मार्फत 1416 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.5 ट्रिलियन हून अधिक रक्कम काढून घेतली आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Embed widget