एक्स्प्लोर

RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया

RSS Chief Mohan Bhagwat : संघ नेहमी देशहिताच्या नीतीचे समर्थन करतो, त्यामुळे संघात कोणत्याही जातीचा आणि धर्माचा प्रश्नच येत नाही असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

बंगळुरू: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या भूमिकेबाबत आणि सदस्यत्वाबाबत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. बंगळुरूमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की संघ कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नसून फक्त नीती (Policy) आणि राष्ट्रीय हित (National Interest) यांना पाठिंबा देतो. तसेच RSS मध्ये प्रवेशासाठी धर्मावर आधारित मुस्लिम किंवा ख्रिश्चनांसाठी कोणतीही अडथळा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘संघ राजकारण करत नाही’ (RSS On Electoral Politics)

मोहन भागवत म्हणाले की, "RSS निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होत नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने उभा राहत नाही. संघ नेहमी त्या नीतीचे समर्थन करतो ज्या देशहिताच्या दिशेने जातात. राम मंदिराच्या समर्थनात ज्या पक्षांनी भूमिका घेतली, स्वयंसेवक त्यांच्याकडे गेले. जर काँग्रेसनेही तशी भूमिका घेतली असती, तर स्वयंसेवक काँग्रेसलाही मत दिले असते.”

मुस्लिमख्रिश्चनही संघात येऊ शकतात (Minority Participation In RSS)

मुस्लिमांचे संघात स्वागत आहे का या प्रश्नावर भागवत यांनी स्पष्ट उत्तर दिले. त्यांनी सांगितले की संघात जातधर्माचा प्रश्नच नाही. जो कोणी संघात येतो, त्याने भारत माता हाच आपला धर्म मानावा. शाखेत मुस्लिम आणि ख्रिश्चन दोघेही येतात, पण आम्ही कुणाचा धर्म विचारत नाही.

संघाचे रजिस्ट्रेशन नसण्याचे कारण (Why RSS Is Not Registered)

काँग्रेसकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, संघाचा रजिस्ट्रेशन नसणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे नाही.1925 मध्ये ब्रिटिशांच्या काळात संघाचे रजिस्ट्रेशन करणे शक्य नव्हते आणि आजही कायद्यानुसार रजिस्ट्रेशन बंधनकारक नाही. सरकारने तीन वेळा बंदी घातली, याचा अर्थ ती संघाला मान्यताप्राप्त संस्था मानते, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसवर पलटवार (Response To Congress Criticism)

मल्लिकार्जुन खरगे यांच्या 'RSS वर बंदी हवी' या वक्तव्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले की, विरोध वाढला की संघ अधिक सक्षम होतो. अलीकडे काँग्रेस नेत्यांनी केलेल्या हल्ल्यांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

तिरंगा आणि भगवा ध्वज वाद (Tricolor And RSS Flag Issue)

काँग्रेसच्या आरोपांवर बोलताना भागवत म्हणाले की, RSS नेहमी तिरंग्याचा सन्मान करतो. आमचा भगवा ध्वज 1925 मध्ये स्वीकारला. राष्ट्रीय ध्वज 1933 मध्ये ठरला. त्या वेळी ध्वज समितीनेही भगव्या रंगाचा विचार केला होता. देशाचा तिरंगा सर्वात श्रेष्ठ असून त्याचा आम्ही नेहमीच सन्मान केला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
Crude Oil : कच्च्या तेलाने गाठला दोन आठवड्यांतील उच्चांक; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार का?
कच्च्या तेलाने गाठला दोन आठवड्यांतील उच्चांक; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
Embed widget