एक्स्प्लोर

दुष्काळयात्रा : नावापुरतंच पाणी असलेली जलाची वाडी

एकीकडे साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराजांनी जलनियोजनाचं महत्व बजावून सांगितलेलं असतानाही...दुसरीकडे याच किल्ले रायगडापासून काही अंतरावर आहे...जलाची वाडी नावाचं गाव. या डोंगरांच्या रांगात दरीशेजारी वसलेल्या या गावातील पाणीटंचाईचा वेध घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहचली...

>> तुळशीदास भोईटे, एबीपी माझा

दुष्काळ म्हटलं, पाणी टंचाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मराठवाडा आणि विदर्भच...पण आपल्याच महाराष्ट्रात जेथे पाण्याची मुबलकता मानली जाते त्या कोकण पट्ट्यातही हिवाळ्यानंतरच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणारी अनेक गावं आहेत. एकीकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी वणवण...महाराष्ट्रातल्या पाणीसमस्येचा वेध घेणारी एबीपी माझाची शोधयात्रा... पाण्यासाठी. सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांना ग्रासणाऱ्या पाणीटंचाईचा वेध....

रायगडमध्ये तब्बल तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बारा महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. उन्हाळ्यातही तुडुंब भरलेल्या. पंचतारांकित रिसॉर्ट. हॉटेलची रेलचेल. वॉटरपार्कही. कोकणातील रायगड जिल्ह्याचं हे तसे लोकप्रिय चित्र. पाण्याची कसलीच ददात नाही असं वाटणाऱ्या याच रायगडात...दुसरं चित्र...काहीसं अनेकांना माहित नसलेलंच...मात्र धक्कादायक...घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून दऱ्या-खोऱ्यांमध्ये पायपीट कऱणारे डोंगरावरील गावकरी...सदोष बांधकामामुळे आहे ते जलस्त्रोतही बुजवून बांधल्यानं कोरडी पडलेली धरणं...शेतीबरोबरच सारंच गमावलेले सामान्य...तुडुंब भरलेलं धरण असतानाही पाण्यापासून वंचित ठेवलेला खारपट्टा... हे असं का...याचाच शोध घेण्यासाठी एबीपी माझाची दुष्काळ यात्रा.

एकीकडे साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराजांनी जलनियोजनाचं महत्व बजावून सांगितलेलं असतानाही...दुसरीकडे याच किल्ले रायगडापासून काही अंतरावर आहे...जलाची वाडी नावाचं गाव. या डोंगरांच्या रांगात दरीशेजारी वसलेल्या या गावातील पाणीटंचाईचा वेध घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहचली...

गावातील बरीच घरे चांगली बांधलेली...आम्ही पोहचलो तेव्हा गावात लग्नाची लगबग सुरु होती. पण तरीही अनेक गावकरी निघाले होते ते पाणी भरण्यासाठी. आम्हीही निघालो....आणि सुरु झाला एक भयावह प्रवास...उतरती वाट...पायाखाली दगड धोंडे...एका बाजूला काटेरी झाडे. दुसऱ्या बाजुला खोल दरी... अशा वातावरणातचालताना पायाखाली वाळलेल्या पानांचा तुटण्याचा होणारा आवाज आवाज मनाला उगाचच काहीसा भीतीदायक वाटणारा. दोन किलोमीटर पायपीट. उतरती पायवाट तुडवत दरीच्या तळाला पोहचलो तर तिथं जे दिसलं ते पाहून बारामाही नद्या वाहणारा रायगड जिल्हा तो हाच, यावरचा विश्वासच उडाला.

दुष्काळयात्रा : नावापुरतंच पाणी असलेली जलाची वाडी

गावातून खाली दरीत उतरताना गावकरी म्हणाले होते, खूप चालावं लागेल. पाय घसरतो. पण काय करणार नदी तिथेच आहे. सर्व त्रास सहन करत जेव्हा गावकऱ्यांसोबत खाली उतरलो तेव्हा समोर होती ती नदी नव्हतीच. ओहोळही नव्हता. तलावही नव्हता. होतं एक डबकं. थोडं बरं तर बरचसं गढुळ पाणी असलेलं. केवळ पावसाळ्यात तेथून नदीसारखा प्रवाह वाहतो म्हणून गावकरी नदी म्हणतात.

तेथेच एक विहीर होती. ते पाणी का नाही घेत विचारलं तर गावकरी म्हणाले आत पाहा. फार काही चांगलं नव्हतंच ते. गावकऱ्यांचा आणखी एक राग आहे. त्या विहीरीचे बांधकाम या डबक्याला जास्त पाणी देणाऱ्या झऱ्यावर झाले आहे. तसेच विहीर बांधताना गावकरी खूप राबले होते. ज्या भांड्यामधून पाणी नेतात त्याच भांड्यांमधून घरी पाणी ओतून खाली येताना रेती, विटा आणायचे. सिमेंटच्या गोण्या पाठ मोडीपर्यंत वाहिल्या. राबराब राबले. विहीर झाली. आणि मग अधिकाऱ्यांनी नळा द्वारे पाणी गावात काही पोहचवलेच नाही. आपल्याला फसवल्याच्या भावनेनं गावकऱ्यांचा राग.

आता पुरेसं पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांना डबक्याच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. काही जणांनी ते पाणी हंड्यांमध्ये, छोट्या कळशांमध्ये भरलं. मी त्यांना विचारलं हे असं पाणी तुम्ही पिता कसं? त्याने बोट दाखवलं...काही गावकरी ते पित होते. तसंच न गाळलेलं. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले काही होत नाही. त्यांनी डबक्याकडे बोट दाखवलं तर एक गावकरी थेट डबक्यातून ते पाणी पित होता. कसलं आरोग्य आणि कसलं काय. जगायचं कसं हा प्रश्न समोर असताना काय सांगणार त्यांना!

कुणीच काही करत नाहीत. फक्त मतांसाठी येतात. पण पाणी काही देत नाहीत. पण सरकारी यंत्रणेनं काहीच केलं असंही नाही. सरकारी यंत्रणेनं टाक्या बांधल्याही. पण त्यातील पाणी गावासाठी सोडले नाही. गावकऱ्यांना कळतच नाही सरकार असं वागतंय तरी का?

प्रचंड पाऊस पडणारा रायगड जिल्हा....त्याच रायगडातलं नावापुरतंच पाणी उरलेलं जलाची वाडी गाव. लाज आणणारं. रायगडमध्ये महामूर पाणी. पण तेथेच हे पाण्यासाठी तडफडणारं. विकासाच्या लखलखाटातील अंधाराची बेटंच ही. कधी या अंधाराच्या बेटांचं भाग्य उजळणार...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget