BLOG | इट्स नॉट 'सेरी' सुशांत
सिनेमाच्या शेवटचा हा एक डायलॉग. अवघं 34 वर्षांचं आयुष्य होतं तुझं. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलेली सुरुवात. त्यातही अगदी पवित्र रिश्ता या टीव्ही सीरिअलमधून निर्माण केलेली इनोसन्ट बॉयच्या इमेजपासून चित्रपट क्षेत्रात केलेल्या वेगवेळ्या प्रयोगांमधून तू तूझं अस्तित्व दाखवून दिलेलंस.
मैं तुम्हारा, मैं तुम्हारा, मैं तुम्हारा रहा... या ओळींप्रमाणे भविष्यातही तुझा, तुझ्या कलेचा एक वेगळाच फॅन बेस राहील. सिनेमा पाहताना वेळोवेळी जाणवत होतं यापुढे कोणत्याही नव्या प्रयोगातून तू दिसणार नाहीस. तुझी अॅक्टिंग, एक्सप्रेशन्स, डायलॉग डिलिव्हरी, पंचेस एकापेक्षा एक. कित्येक मस्त डायलॉग्ज होते सिनेमात, जे तू बोललास, पण तीच सकारात्मकता प्रेक्षकांना देणारा तू मात्र कदाचित ते समजून घेतले नाहीस.
जनम कब लेना है और कब मरना है ये तो हम डिसाईड नहीं कर सकते, लेकिन कैसे जीना है ये हम डिसाइड करते है सिनेमाच्या शेवटचा हा एक डायलॉग. अवघं 34 वर्षांचं आयुष्य होतं तुझं. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलेली सुरुवात. त्यातही अगदी पवित्र रिश्ता या टीव्ही सीरिअलमधून निर्माण केलेली इनोसन्ट बॉयच्या इमेजपासून चित्रपट क्षेत्रात केलेल्या वेगवेळ्या प्रयोगांमधून तू तूझं अस्तित्व दाखवून दिलेलंस. सीरिअलमधून सुरुवात करुनही चित्रपट क्षेत्रात पाय रोवणं सोपं नसतं, पण तुला ते उत्तम जमलं. सिनेमांमधून तर तू तूझं टॅलेंट दाखवून दिलं होतंस. पण या व्यतिरिक्तही खूप गोष्टी होत्या ज्यात तू अव्वल होतास. एस्ट्रोफिजिक्स, स्ट्रिंग थेअरी, सैटर्न, अवकाश तंत्रज्ञान, वेगवेगळे गेम्स खेळण्यापासून अॅडवेंचर करणं आणि निवांत वाचन करणं. शिवाय अॅक्टिंग तर आहेत. या सगळ्या गोष्टींत तू एकत्र ताळमेळही साधायचास.
मैं बहुत बड़े बड़े सपने देखता हूं, पर उन्हें पुरा करने का मन नहीं करता
50 Things to do ची लिस्ट बनवलेलीस तू... तुझी बकेट लिस्ट. अगदी शेती करण्यापासून नासामध्ये जाण्यापर्यंत. टेनिस-चेस खेळण्यापासून डिस्निलँडला भेट देणं. स्वतः वेदिकशास्र, योगा शिकण्यापासून लहान मुलांना शिकवणं. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पूर्णही केलेल्यास. पण हे सगळंच अर्धवट सोडलंस.
हीरो बनने के लिए पॉप्युलर नहीं बनना पडता, वो रियल लाईफ में भी होते है अॅक्टिंग आणि सिनेमाच्या पलिकडे सुरवातीला तू जास्त माहिती नव्हतास. पण तुझं नॉलेज, तुझी आवड, तुझी चॉईस बघून कोणालाही तुझं कौतुक करणं राहावलं नसतं. तू रिअल लाईफमध्येही हिरोच होतास. मग ते मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्ससारखे विषयांमधली गोडी ज्याकडे माझ्यासारखे सामान्य ढुंकुनही बघणार नाहीत. किंबहुना ते डोक्याच्या वरून जातात. स्पेस सायन्स मधला तुझा इटरेस्ट असेल, त्यासाठी लागणारा महागडा टेलिस्कोप तुझ्याकडे होता. ज्यावरुन तुझा सिन्सिअरनेस लक्षात येत होता. तुझ्यासारखं मल्टिटॅलेंटेड होणं कोणाला आवडलं नसतं??? रोल मॉडेल होतास तू अनेकांचा.
जब कोई मर जाता है, उसके साथ जीने की उम्मीद भी मर जाती है, पर मौत नहीं आती तुझ्या नंतर बऱ्याच नवोदित कलाकारांची अवस्था अशीच झाली असणारे. तुझ्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. इंडस्ट्रीमध्ये नवीन असणाऱ्यांसाठी तू एक आशेचा किरण होतास. उमेद होतास.
मैं एक फाइटर हू और मैं बहुत बढ़िया तरीके से लड़ा फक्त डायलॉग म्हणूनच घेतलंस का रे तू हे वाक्य? खूप लढणं अजून बाकी होतं, धडपडणं अजून बाकी होतं. त्यातून उठून उभं राहणं तुझ्यासाठी नक्कीच अशक्य नव्हतं.
सगळ्यात शेवटी एकच गोष्ट सांगावी वाटतेय... It’s not Seri… It’s not Seri Sushant