एक्स्प्लोर

BLOG | कपिल देव दा जवाब नही..

BLOG : महान माणसं त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानाने तुम्हाला शिकवतातच. शिवाय त्यांच्या माणूसपणानेही ती तुमच्या डोळ्यात अंजन घालतात. 'ग्रेट कपिल देव' यांचा 'माझा कट्टा' पाहताना हाच अनुभव आला. '83' चित्रपटाच्या निमित्ताने कपिल देव कट्ट्यावर आले होते. त्या विश्वविजयाच्या कहाण्या आमच्या पिढीने ऐकल्यात. यू-ट्यूबवर पाहिल्यात. पण, त्या कहाणीचा नायकच कहाणी घडतानाचा प्रवास थेट मांडत होता. यातल्या काही वाक्यांनी कपिल यांच्याबद्दलचा आदर कमालीचा वाढला. खरं तर ज्या पद्धतीने, ज्या साधेपणाने ते कट्ट्यावर गप्पा मारत होते, तेही भावलं. विश्वविजेत्या कॅप्टनची झूल घालून ते बोलायला बसले नव्हते. तर, आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारत होते. तरीही आपला आणि इतरांचा आब राखत. त्यांचं सर्वात आवडलेलं वाक्य म्हणजे सिनेमा बनताना मी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली, सिनेमा 83 टीमवर आहे, कपिलवर नाही. माझ्या रोलला थोडं जास्तच वेटेज दिलंय. असंही एक वाक्य ते बोलून गेले.. विचार करा, क्रिकेटचा महानायक सांगतोय, मी हीरो नाही! माझी टीम, त्यांचा परफॉर्मन्स खरे नायक आहेत. ते समोर येऊ द्या. त्याच वेळी ते असंही म्हणाले, टीम इज बिगर, कंट्री इज इव्हन बिगर. नो प्लेयर इज बिगर दॅन कंट्री.

मनात आणलं असतं तर ते सिनेमाचा फोकस आपल्याकडे वळवू शकले असते, तोही हिटच झाला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. टीमची महती त्यांनी हायलाईट करायला सांगितली. वैयक्तिक कामगिरी नव्हे. आजच्या जमान्यात आपण न केलेल्या कामाचंही श्रेय लाटण्यासाठी काही वेळा लोकांमध्ये अहमहमिका लागलेली असते. काही जण यात यशस्वीही होतात. अशा सगळ्यांसाठी हा डोळे उघडणारा अनुभव ठरावा. याच कट्ट्यावर झिम्बाब्वेविरुद्धच्या ऐतिहासिक खेळीबद्दल त्यांना विचारलं असता, ते म्हणाले "स्टोरी बनवायची असेल तर काय मी ती बनवून बढा चढा के सांगू शकतो." असं म्हणत त्यांनी त्या इनिंगबद्दल आपल्याला आठवतंय ते मोकळेपणाने पण, अतिरंजितपणाचा लवलेशही न आणता सांगितलं.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मै कॅप्टन मैदान मे हूँ, बाहर नही.. ही बाब मी नेमकी लक्षात ठेवलेली. त्यामुळे संघात वयाने, अनुभवाने सीनीयर मंडळींचेही कान टोचायला आपण कमी करत नसू. संध्याकाळी मग मोकळेपणाने सॉरीही बोलायचो. शाम को सब मेरा मजाक उडाते थे..किती सहज ते बोलून गेले. आपल्यावर होणारे जोक्स, आपली होणारी थट्टामस्करी इतक्या विशाल मनाने एक्सेप्ट करणारं कपिल देव यांच्यासारखं व्यक्तिमत्व विरळच म्हणावं लागेल.

आपल्यावेळी क्रिकेटसाठी इतका सपोर्ट स्टाफ, अशा प्रगत जीम वगैरे सारख्या सोयीसुविधा नव्हत्या, असं सांगतानाच त्यांनी आपल्या फिटनेसवर उपलब्ध साधनांच्या आधारे आपण कशी मेहनत घेतली हेही सांगितलं.

याशिवाय ज्या एकमेव मॅचमध्ये त्यांना ड्रॉप करण्यात आलं, त्याबद्दलही खुल्या दिलाने मत मांडलं. ते म्हणाले, कोई बुरा शॉट खेलेगा तो क्या होगा.. असं म्हणत आपल्यावर झालेल्या कारवाईचं त्यांनी एक प्रकारे समर्थनच केलं. आपल्यावर झालेली कारवाई इतकी ग्रेसफुली रीसीव्ह करणं ही महानतेची साक्ष देणारी त्यांची आणखी एक क्वालिटी होती. 

माणसं आभाळाच्या उंचीएवढी मोठी होऊनही पाय जमिनीवर असणं म्हणजे काय, हे कपिल यांच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवत होतं. आपापल्या क्षेत्रात, मैदानात कपिल देव होण्याचा आपण साऱ्यांनीच प्रयत्न करायला हवा, ते किती जणांना साध्य होईल, माहीत नाही. पण, मैदानाबाहेरचे महान माणूस असलेले कपिल देव आपण नक्की होऊ शकतो. किमान तो प्रयत्न अधिक नेटाने करु शकतो. क्रिकेटची विजयगाथा उलगडतानाच माणूसपणाची त्यांनी उंचावलेली ट्रॉफी हे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपलं लक्ष्य ठेवूया, काय वाटतं तुम्हाला? 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget