एक्स्प्लोर

IPL 2025 SRH vs GT : अचूक सिराज, सहज गिल, सुंदर वॉशिंग्टन!

काल हैदराबाद आणि गुजरात यांच्या मध्ये झालेल्या सामन्यात गुजरात संघाने आपल्या तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत आघाडी घेतली..
नाणेफेकीचा कौल गुजरात संघाने जिंकून मंद खेळपट्टीवर प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारले..आणि हैदराबाद संघला फलंदाजी साठी आमंत्रण दिले.. आय पी.एल चा   ऑक्शन  पार पडल्यावर चर्चा झाली ती हैदराबाद च्या स्फोटक फलंदाज...आणि ते २० षटकामध्ये यंदा हैदराबादचा संघ किती धावा करेल याची...पण पहिल्या सामन्याचा अपवाद सोडला तर हे फक्त स्वप्न रंजन होते...पाहिल्या सामन्यात त्यांनी फक्त पॉवर प्ले जिंकला..पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात त्यांच्या फलंदाजी नि हार मानली...गेल्या वर्षी हैदराबाद संघाने विस्फोटक सलामी मुळे इतिहास घडविला कारण हेड आणि अभिषेक फॉर्म मध्ये होते...यंदा या दोघांच्या पण बॅट मधून धावांचा ओघ आटला...
आज सुद्धा पुन्हा गुजरात च्या गोलंदाजांनी सुरुवाती पासून हैदराबाद संघावर दबाव ठेवला तो शेवटपर्यंत..खास कौतुक करावे लागेल ते सिराज याचे दृष्ट लागावी अशी गोलंदाजी तो करीत आहे....दोन्ही सलामवीर त्याची गोलंदाजी खेळू शकले नाहीत..हेड चा फसलेल्या फ्लिक चा झेल शॉर्ट मीड विकेट वर सुदर्शन ने घेतला...आणि एक हवेतल्या ड्राइव्ह वर  अभिषेक शर्मा याला तंबूत पाठविले...सिराज याला उत्तम साथ दिलीं ती प्रसिद्ध आणि साई किशोर..यांनी.क्लासन आणि नितीश यांनी एक भागीदारी करून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण या दोघांना साई किशोर यांनी बाद केले आणि हैदराबाद अडचणीत आला..आपल्या दुसऱ्या स्पेल मधे पुन्हा एकदा सिराज ने अप्रतिम यॉर्कर वर अनिकेत वर्मा याला पायचीत पकडले आणि सिमरजित याचा त्रिफळा उध्वस्त केला..हैदराबादच्या या मंद खेळपट्टीवर गुजरात संघासमोर त्यांनी १५३ धावांचे आव्हान ठेवले..

गुजरात आव्हान स्वीकारून मैदानात जेव्हा आला तेव्हा शमी ने सुदर्शन साठी पूल चा सापळा रचला आणि त्यात तो अलगद सापडला..त्याच्या जागेवर आलेल्या बटलर ला एका स्लो इन स्विंग वर  फसविले( असाच चेंडू त्याने श्रेयस ला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टाकला होता)..मात्र आज डोळ्यांना आनंद देणारी फलंदाजी केली ती सुंदर ने..काही दिवसापूर्वी सध्याचे पंच अनिल चौधरी यांचा एक पॉडकास्ट आला होता त्यात अनिल चौधरी म्हणाले की सुंदर हा खूप अंडर रेटेड फलंदाज आहे...त्याचे तंत्र खूप भक्कम आहे आणि मला त्याची फलंदाजी पाहणे आवडते...
आज अनिल चौधरी का असे बोलत आहे हे समजून आले...या आधी सुद्धा आपण जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकलो तेव्हा सुद्धा आपल्या फलंदाजीने सुंदर ने भारताला विजय मिळवून दिला होता..
आज जेव्हा तो फलंदाजीस आला तेव्हा सुद्धा ५ षटकात गुजरातच्या २८ धावा झाल्या होत्या..पण आल्या आल्या सुंदर ने सीमरजीत सिंग याच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला .६ व्या षटकात त्याने २० धावा चोपून काढल्या..त्यात २ चौकार आणि २ षटकार होते..त्याने मारलेले दोन्ही पूल चे फटके त्याने चौकारात वसूल केले आणि नंतर २ पिक अप चे  षटकार वसूल करून त्याने  या आय  पी एल मधील आपल्या  प्रवेशाचा शंख नाद केला..त्याने आपल्या खेळीत ड्राईव्ह मारले...आखूड टप्प्याच्या चेंडूवर फुल मारले.. कट मारले..आणि आपली खेळी सजविली...त्याच्या दुर्दैवाने करिअर मधील सर्वोत्कृष्ट धावसंख्येला तो गवसणी घालू शकला नाही कारण शामिच्या गोलंदाजीवर एका अप्रतिम झेलवर तो झेलबाद झाला .
बाद होण्यापूर्वी त्याने गिल सोबत ५६ चेंडूत ९० धावांची भागीदारी केली आणि १६८ च्या स्ट्राईक रेटने 49 धावा केल्या...
शुभमन गिल  भारतीय खेळपट्टीवर भविष्यातील एक दादा फलंदाज होईल यात शंका नाही...तो अगदी सहज खेळतो...शॉर्ट आर्म पूल हा त्याचा ट्रेड मार्क फटका आहे..त्याच्या जोडीला ती स्कोअर कट...ऑफ ड्राईव्ह.. फ्लिक ..स्वीप हे फटके मारून आपली खेळी सजवितो...आज सुद्धा त्याने ४३ चेंडूत ६१ धावा केल्या आणि तो नाबाद  राहिला.सुरुवातीला त्याने शमी ला मारलेले .२ फ्लिक आणि नंतर कमिन्स ला मारलेला एक ऑफ ड्राईव्ह लक्षात राहिला.त्याला साथ दिली ती रुदरफोर्ड याने.. आक्रमकतेचा डीएनए असलेला हा फलंदाज आल्या आल्या तुटून पडला आणि केवळ १६ चेंडूत ३५ धावा करून तो नाबाद राहिला...

आजच्या विजयाने गुजरात संघ गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत...आणि या वेळेस नेहरा गुरुजींचे ही विद्यार्थी आय पी एल च्या परीक्षेत प्रत्येक पेपर चांगलं गुणांसहीत सोडवीत आहेत..

शादी मे जरूर आना या सिनेमात सत्येंद्र नावाच्या हिरोला भर लग्नमंडपात नायिका नकार देऊन मंडपातून पळून जाते...त्याचा बदला म्हणून सत्येंद्र आय ए एस उत्तीर्ण होतो.  सिराज याला सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी च्या मंडपात नकार पचवावा लागला होता...पण नंतर आलेल्या आय पी एल या स्पर्धा परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाने पास होत आहे..म्हणून सिराज सध्या त्या सिनेमातील सत्येंद्र आहे..

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget