Pankaj Bhoyar : राज्यातील 6 राज्यमंत्री वरिष्ठांवर नाराज? भोयर म्हणाले,मुख्यमंत्री तोडगा काढतील
Pankaj Bhoyar : राज्यातील 6 राज्यमंत्री वरिष्ठांवर नाराज? भोयर म्हणाले,मुख्यमंत्री तोडगा काढतील
राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आज परभणी दौऱ्यावर होते शासनाच्या सेवा संकल्प अभियान या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली तसेच परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी शालेय शिक्षण व गृह विभगाची बैठक घेतली मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत या विभागांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगत दोन्ही विभागाचे काम चांगले सुरू असल्याचे त्यांनी सांगितले महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ६ राज्यमंत्री त्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याने नाराज असल्याचे प्रश्नावर त्यांनी आम्ही नाराज नाहीत उलट खुश आहोत बरेच अधिकार आम्हाला आहेत एखाद्याचा काही विषय असेल तर त्यावर मुख्यमंत्री निश्चित तोडगा काढतील मात्र सर्व सहा जन नाराज नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिलीय..























