IPL 2025 RR vs PBKS : राजस्थानचा शाही विजय!

चंदीगड इथे झालेल्या पंजाब आणि राजस्थान या सामन्यात राजस्थान ने पंजाब वर शाही विजय मिळवत सातव्या स्थानावर झेप घेतली.
नाणेफेकीचा कौल पंजाब ने जिंकून प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले ते राजस्थान ला..
आज राजस्थान ने झोकात सुरुवात केली .सलामीला आलेले यशस्वी आणि संजू यांनी पहिल्या ६ षटकात बिनबाद ५३ धावा लावल्या आणि सलामी ८९ धावांची झाली. हे दोघे जेव्हा खेळत असतात तेव्हा ती एक मेजवानी असते..दोघांचे तंत्र उत्तम असल्याकारणाने त्यांच्या फटक्यांना एक पुस्तकी स्पर्श असतो. एक नजाकत असते. स्टोइनिस ला मारलेला एक स्ट्रेट ड्राईव्ह...आणि फर्ग्युसन ला मारलेला एक ऑफ ड्राईव्ह कलात्मक होता..२६ चेंडूत ३८ धावांची खेळी करून सॅमसन बाद झाला..पण आज आत्मविश्वास पूर्ण खेळी खेळून गेला तो यशस्वी..त्याने आज ताकत न लावता फक्त टायमिंग वर भर दिला..मार्को जन्सन श्रेय का षटकात त्याने दोन षटकार वसूल केले..त्याच्या ६७ धावांच्या खेळी त्याने ५ षटकाराने सजविली ... राजस्थानच्या डावात रियान पराग ने एक महत्त्वपूर्ण खेळी केली..सुरुवातीला तो थोडासा चाचपडला पण नंतर त्याने काही अविश्वसनीय फटके मारले...त्यात मार्को जन्सन मला मारलेला एक फ्लिक चा षटकार होता जो केवळ त्याने टायमिंग वर मारलेला होता..२५ चेंडूत त्याने ४३ धावा करून तो नाबाद राहिला आणि राजस्थान संघाला त्याने २०५ धावांचा टप्पा पार करून दिला..
२०६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पंजाब समोर उभा राहिला तो फॉर्म हरवलेला जोफ्रा आर्चर...जोफ्रा एक गुणवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे अफाट वेग आहे ..आणि त्याच्या ऍक्शन वरून त्याच्या वेगाचा अंदाज फलंदाजाला येत नाही..फलंदाज जितक्या वेगाचा विचार करून खेळतो त्यापेक्षा तो वेग अधिक असतो..
प्रियांश ला पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे त्याने बाद केले त्यावरून जोफ्रा काय आहे हे प्रियांशला समजले असेल त्याची बॅट खाली आणि अगोदर त्याचा त्रिफळा उध्वस्त झाला होता. त्याची जागा कर्णधार श्रेयस ने घेतली..श्रेयस मैदानात खरोखर एखाद्या राजासारखा चालत येतो.. आजही तो तसाच चालत आला..आल्या आल्या त्याने ऑन द राईज जोफ्रा ला दोन चौकार कव्हर वरून मारले तेव्हा तो काय आक्रमकतेने खेळणार आहे याची झलक दाखविली...पण ही झलक अल्पजीवी ठरली कारण पहिल्याच षटकात शेवटच्या चेंडूवर यॉर्कर येईल या अंदाजाने त्याने आपला स्टान्स बदलला ..थोडासा स्क्वेअर ऑन झाला पण जोफ्रा चा बंदुकी सारखा यॉर्कर श्रेयसच्या यष्ट्यांचा वेध घेऊन गेला आणि पहिल्याच षटकात पंजाब ची अवस्था २ बाद ११ अशी झाली..पण याला जबाबदार श्रेयस अय्यर याचा बेजबाबदार. फटका होता....त्यानंतर जोफ्रा ने आग ओकणारी गोलंदाजी केली..त्याने ४ षटकात फक्त २५ धावांत ३ बळी घेतली...त्याला संदीप शर्मा ने उत्तम साथ दिली.त्याने ४ षटकात केवळ २१ धावांत २ बळी मिळविले...
भारतीय क्रिकेट मधे संदीप शर्मा याला त्याच्या गोलंदाजीचे जेवढे श्रेय मिळायला पाहिजे होते तेवढे त्याला मिळाले नाही.. या गोलंदाजाने भारतीय क्रिकेट मधील दादा फलंदाजांना चकविले आहे..
स्टोइनिस आणि प्रभसिमरण बाद झाल्यावर पंजाब बॅकफूटवर गेला..त्यांच्याकडे ९ व्या क्रमांका पर्यंत फलंदाजी जरी असली तरी धावगती १३ वर गेल्यामुळे प्रत्येक षटकात एक मोठा फटका खेळावा लागणार होता... नेहल वढेरा याने ६२ धावांची खेळी केली..तो मुंबई मध्ये असताना सुद्धा त्याने अशा काही वादळी खेळ्या केल्या आहेत...आज सुद्धा त्याने सुंदर खेळी केली..चेंडूला सीमारेषबाहेर पाठविताना त्याला फारसे कष्ट पडत नाहीत..पण आज त्याची झुंज एकाकी ठरली आणि पंजाब संघाचा डाव १५५ धावा करून थांबला..
राजस्थान ने आज शाही विजय मिळविला याचे श्रेय कर्णधार सॅमसन ला द्यायला हवे...त्याने आपल्या वेगवान गोलंदाजाचा वापर योग्य रीतीने करून पंजाब वर पहिल्या चेंडू पासून दबाव ठेवला तो शेवटपर्यंत...
राजस्थानचे शाही राजवीर हे राहुल द्रविड या स्थितप्रज्ञ गुरुजींच्या हातात आहेत...त्यामुळे एका विजयाने ते हुरुळून जाणार नाहीत..आणि अपयशाने ते खचून जाणार नाहीत..

























