एक्स्प्लोर
जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र
जसपाल भट्टी यांचा चाहतावर्ग देशभर पसरलेला असून पण भट्टीसाहेबांचा वापर बॉलीवूडने हवा तसा केला नाही. त्यांच्या अभिनय क्षमतेला आव्हान देणाऱ्या भूमिका त्यांना मिळाल्याचं नाहीत. त्यांच्या 'सोशल कॉमेडी'ला बॉलिवूडमध्ये फारस स्थान नव्हतं. हा कलाकार ‘कॉमन मॅन’चा कलावंत मित्र शेवटपर्यंत राहिला. आज आपल्याला अजून एका जसपाल भट्टींची नितांत गरज आहे.

As Nina Simone said, ‘how can you be an artist and not reflect the times?’
एक 'प्रोटेस्ट आर्ट ' नावाची संकल्पना आहे. कलेचा वापर एखाद्या चळवळीसाठी किंवा अन्यायकारी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध करणे म्हणजे प्रोटेस्ट आर्ट. मॅक्झिम गॉर्कीच्या 'आई' या महाकादंबरीचा रशियातल्या बोल्शेव्हिक चळवळीला प्रचंड फायदा झाला होता. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अनेक अमेरिकन कलावंतांनी सरकारच्या रोषाची तमा न बाळगता आपल्या कलेच्या माध्यमातून या अन्यायकारी युद्धाचा विरोध केला होता. रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांच्याविरुद्ध 'Pussy Riot' या गटाने केलेले जाहीर कार्यक्रम पण असेच एक उदाहरण. भारताला पण प्रोटेस्ट आर्टची एक खूप मोठी परंपरा आहे. दिल्लीमधले नाट्यकर्मी सफदर हाश्मी हे भारतीय प्रोटेस्ट आर्टमधलं अग्रगण्य नाव. हाश्मी यांची राजकीय गुंडांनी हत्या केली. किंवा काही दिवसांपूर्वीच झालेली 'नॉट ऑन माय नेम' ही चळवळ हे प्रोटेस्ट आर्टचंच दृश्य स्वरूप होत. मंजुलसारखा एखादा कार्टूनिस्ट आपल्या कार्टूनमधून सर्वपक्षीय भ्रष्टाचारावर कोरडे ओढणारा कलावंत तरी दुसरं काय करत असतो? भारतीय प्रोटेस्ट आर्टचा इतिहास जेव्हा-जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा जसपाल भट्टी यांचा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही.
फोटो सौजन्य : विकिपीडिया
जसपाल भट्टी हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होत.भट्टीसाहेबांनी कार्टूनिस्ट, आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये सदर लेखन, सिरियल्स, सिनेमा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मुशाफिरी केली आहे. त्यांनी एक 'मॅड स्कूल' नावाचं कॉमेडी स्कूल सुरु केलं होत. त्यांनी एक 'नॉन्सेन्स क्लब' चालू केला होता. दैनंदिन जीवनात सामान्य माणसाला नाडणाऱ्या प्रश्नांवर विनोदी पद्धतीने भाष्य करणे, ही भट्टीसाहेबांची खासियत. भट्टीसाहेबांच्या विनोदाची खासियत म्हणजे, तो व्यक्तिद्वेषी, आक्रमक कठोर आणि क्रूर नव्हता. तो तुम्हाला पोट धरून हसायला लावत नाही. तर तुमच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर आणतो. भट्टी साहेबांच्या विनोदाच्या रॅपरखाली आपल्या अन्यायकारी भ्रष्ट व्यवस्थेचं चॉकलेट आहे, याचा एक सेकंद पण विसर पडत नाही. लोकांना खदाखदा हसायला लावून मैदान मारणं, हा भट्टी साहेबांचा उद्देश कधीच नव्हता. हसता हसता लोकांना आपल्या सामाजिक वास्तवाबद्दल अंतर्मुख करणं, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. भट्टी साहेबांच्या उद्देशाबद्दल कोणालाही शंका नसावी. आपल्या अकार्यक्षमतेबद्दल आणि लाल फितीच्या कारभाराबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या मंडी हाऊसमधले अधिकारी पण भट्टींच्या शोला लगेच ग्रीन सिग्नल देऊन मोकळे होत. न जाणे उद्या एखाद्या कार्यक्रमात भट्टी साहेब आपल्यावरच निशाणा साधतील अशी साधार भीती त्यांना वाटत असावी.
90च्या दशकात जसपाल भट्टी यांचे 'उलटा पुलटा' आणि 'फ्लॉप शो' हे दूरदर्शनवरचे कार्यक्रम तुफान गाजले. हे कार्यक्रम सर्वसामान्य माणसाच्या व्यथा मांडण्याचे काम करायचे. पैशांची चणचण असल्याने हे कार्यक्रम अतिशय कमी बजेटमध्ये बनवले जायचे. पण कार्यक्रमाच्या दर्जावर त्यामुळे परिणाम होऊ नये याची दक्षता भट्टी साहेब घ्यायचेच. ‘फ्लॉप शो’च्या एका एपिसोडमध्ये भट्टी साहेब प्रोफेसर बनले होते. आपल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक मार्गदर्शक कसे लुटत असतात, हे विनोदी ढंगाने दाखवलं होते. सर्वसामान्य माणसाला टेलिफोन घेताना कसल्या दिव्यातून जावं लागतं, हे एका एपिसोडमध्ये दाखवलं होतं. सुरुवातीच्या काळात भट्टी साहेब पंजाब इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये नोकरीला होते. नोकरी करता करताच त्यांनी 'ट्रिब्यून' या वर्तमानपत्रासाठी व्यंगनचित्र काढली. 'उलटा पुलटा' या शोला यश मिळताच, सरकारी बेड्यांमध्ये राहून आपल्याला व्यवस्थेवर आसूड ओढायला मिळणार नाही, हे लक्षात आलेल्या भट्टींनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला.
जसपाल भट्टी यांनी यशाचं श्रेय एकट्याने घ्यायला नेहमीच नकार दिला. सविता भट्टी (त्यांची अर्धांगिनी), विवेक शौक, बी. एन. शर्मा यांच्यासारख्या सहकलाकारांचे श्रेय त्यांनी कधीच हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. फ्लॉप शोचा पहिला भाग ब्रॉडकास्ट झाला, तेव्हा तो पाहण्यासाठी भट्टी साहेबांच्या घरी खूप लोक जमले होते. घर लोकांनी गच्च भरलं होतं. भट्टी साहेब मात्र घरी नव्हते. आपली गाडी घेऊन चंदीगडच्या रस्त्यावर फिरत होते. आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना घरी जा आणि 'फ्लॉप शो' पाहा असं आव्हान करत होते.
जसपाल भट्टी हे आपल्या कार्यक्रमांमधून लोकांना जितकं हसवायचे, तितकंच बाहेरच्या जगात पण ते आपल्या अतरंगी चाळ्यांसाठी प्रसिद्ध होते. राजकारणी हे त्याचे आवडते बकरे. त्यावेळेस राजकारण्यांवर टीका करणं म्हणजे 'देशद्रोह' असं समीकरण नव्हतं. हर्षद मेहताने तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना आपण सुटकेस मधून एक कोटी रुपये दिले, असा दावा करुन धमाल उडवून दिली होती. पंतप्रधानांच्या सहकाऱ्यांनी सुटकेसमध्ये एक कोटी रुपये मावण शक्यच नाही, असा दावा केला. तर हर्षदने पत्रकार परिषद घेऊन ती सुटकेसच पत्रकारांसमोर पेश केली. या सगळ्यांमधला विनोद जसपाल भट्टीला जाणवला नसता तरच नवल. एक दिवस भट्टीसाहेब संसदेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. हातात मोठी सुटकेस होती. येणाऱ्या-जाणाऱ्या खासदारांना ते थांबवायचे आणि विनंती करायचे," कृपया दोनशे कोटींचं टार्गेट ठेवा. या खालचा भ्रष्टाचार केला; तर देशाच्या अब्रूची लक्तर निघतील. कृपया मोठं ध्येय ठेवा. " सुटकेस बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांनी पत्र लिहून किमान दोनशे कोटी रुपये बसतील, अशा सुटकेस बनवण्याचं आव्हान केलं होत.
आजच्या हजारो कोटींच्या नीरव-मल्ल्याच्या जमान्यात भट्टी साहेब असते, तर त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली असती? 'पद्मावत' चित्रपटांविरुद्ध माथेफिरू लोक हिंसक निदर्शन करत असताना, आणि सरकार त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना भट्टी साहेबांनी त्यावर त्यांच्या युनिक स्टाईलमध्ये काय प्रतिक्रिया दिली असती? भट्टी साहेबांच्या उलटा-पुलटा आणि फ्लॉप शोसारख्या शोची आज नितांत गरज आहे. कांद्याचे भाव जेव्हा गगनाला भिडले होते, तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, मी कांदा विकत आणला आहे, तरी मला पोलीस प्रोटेक्शन द्यावे अशी विनंती केली होती. एकदा त्यांनी त्यांच्या घरच्या डेड फोनचे साग्रसंगीत 'अंतिम संस्कार' केले होते. 'राईट टू स्कॅम' चा मसुदा त्यांनी तयार केला होता. आज भट्टीसाहेबांच्या 'सोशल कॉमेडी'साठी अतिशय सुपीक जमीन आहे आणि नेमके भट्टी साहेब आज आपल्यात नाहीत, हे आपलं दुर्दैव आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचे सुदैव.
जसपाल भट्टी यांचा चाहतावर्ग देशभर पसरलेला असून पण भट्टीसाहेबांचा वापर बॉलीवूडने हवा तसा केला नाही. त्यांच्या अभिनय क्षमतेला आव्हान देणाऱ्या भूमिका त्यांना मिळाल्याचं नाहीत. दुय्यम फुटकळ भूमिकांवर बॉलीवूडने त्यांची बोळवण केली. भट्टी साहेबांच्या 'सोशल कॉमेडी'ला बॉलिवूडमध्ये फारस स्थान नव्हतं.'आ अब लौट चले', 'जानम समझा करो', 'फना', 'मौसम'सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. पण भट्टी साहेब बॉलिवूडपेक्षा जास्त रमले ते त्यांच्या हक्काच्या पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यांचा 'माहोल ठीक है' हा सिनेमा, ज्यात त्यांनी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती, हा सिनेमा पंजाबी सिनेमातल्या सगळ्यात मोठ्या हिटपैकी एक आहे.
भट्टी साहेबांचा अपघाती मृत्यू हा खूप अनपेक्षित आणि त्यामुळेच खूप शोकांत आहे. भट्टी त्यावेळेस 'पॉवर कट' नावाच्या सिनेमाच्या तयारीत होते. आपल्या खास शैलीमध्ये भटिंडा इथल्या थर्मल पॉवर प्लॅन्टची पूजा करून त्याचे आशीर्वाद मिळवून ते कारने चंदीगढला परतत होते. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. एका वळणावर गाडीवरच त्याचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका झाडाला धडकली. गाडीत असणाऱ्या इतर लोकांना फारस लागलं नाही. पण भट्टींच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. ज्या कारमधून भट्टी साहेबांनी शेवटचा प्रवास केला, त्या कारमध्ये हाताने बनवलेले तीन कागदी पंखे सापडले. लोडशेडिंगने होणारे सर्वसामान्य माणसाचे हाल दाखवण्यासाठी या पंख्यांचा प्रतिक म्हणून वापर भट्टीसाहेब करणार होते. हा कलाकार ‘कॉमन मॅन’चा कलावंत मित्र शेवटपर्यंत राहिला. आज आपल्याला अजून एका जसपाल भट्टींची नितांत गरज आहे.
संबंधित ब्लॉग
अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स
राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व
सौंदर्यवती : सोनाली बेंद्रे
ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक
ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है
तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला
चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट
सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन
नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल
गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू
जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा
जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या
एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!
ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा
एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?
जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान
अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका
गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट
श्रीदेवी नावाचं फेनॉमेन
कुमार सानू -एका दशकाचा आवाज (1)

View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट