एक्स्प्लोर

नव्वदच्या दशकातल्या चित्रपट संगीताला कमी का लेखलं जातं?

जागतिकीकरणानंतर देशात जे वादळी बदल सुरू झाले, त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. बजाजच्या स्कुटरसाठी वेटिंग लिस्ट लावणं बंद झालं. टेलिफोनसाठी वाट बघणं बंद झालं. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये जन्म घेतलेल्या पिढ्यांनी जितके बदल पाहिले असतील, तितके क्वचितच कुठल्या पिढीने पाहिले असतील.

जागतिकीकरणानंतर देशात जे वादळी बदल सुरू झाले, त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. बजाजच्या स्कुटरसाठी वेटिंग लिस्ट लावणं बंद झालं. टेलिफोनसाठी वाट बघणं बंद झालं. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये जन्म घेतलेल्या पिढ्यांनी जितके बदल पाहिले असतील, तितके क्वचितच कुठल्या पिढीने पाहिले असतील. त्या अर्थाने आमची पिढी ही संक्रमणावस्थेतील आहे. जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी. प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना तिशीतच नॉस्टॅल्जिया आलेली पिढी. कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहीत नाही, पण सामाजिक माध्यमांवर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांचं लिखाण पाहिलं तर जाणवेल की ती प्रचंड नॉस्टॅल्जिक असतात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलनीचे ग्रुप बनवून तिथे ते जुने दिवस किती भारी होते आणि आता कसं सगळं बोअर होत चाललंय असल्या चर्चा करत असतात. सध्या तिशी आणि चाळीशीत असणारे ही लोक अनेक आस्थापनांमध्ये (त्यात माध्यमं पण आली ) महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्या काळात जन्मलेले लोक सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पण आपली माध्यमं विशेषतः मराठी माध्यमं या लोकांच्या नॉस्टॅल्जियाची दखल घेतात का? या माध्यमांच्या उदासीनतेचा फटका नव्वदच्या दशकातल्या संगीतकारांना बसला आहे. दुःख या गोष्टींचं आहे की यांच्या संगीताबद्दल कुठं लिहून येत नाही की कुणी संगीत समीक्षक त्यांच्या 'मासेस ' साठीच्या संगीताच विश्लेषण पण करत नाही . नदीम श्रवण , जतिन -ललित ह्या नव्वदच्या दशकातल्या संगीत दिग्दर्शकांचं पण तेच . माझ्या पिढीचे आवडते संगीत दिग्दर्शक. ज्यांच्या गाण्यावर आमचा नॉस्टॅलजिया पोसला जातो ते संगीत दिग्दर्शक . म्हणजे 'सुवर्णकाळातले ' संगीत दिग्दर्शक , नंतर आर डी आणि नंतर रहमानच? बाकी लोकांचं काय ? वर्षानुवर्षे सुरेल गाणी देणाऱ्या नव्वदमधल्या संगीत दिग्दर्शकांबद्दल काय? जिथे काळच थिजला आहे अशा ग्रामीण आणि परभणीसारख्या निमशहरी भागात, जिथे बहुसंख्य जनता राहते, तिथे अजून पण ह्या लोकांचीच गाणी वाजतात. मध्ये व्हाटस ऍप वर एक फॉरवर्ड आला होता. 'आजपण 'तू प्यार है किसी और का ' हे गाणं वाजलं की दहामधल्या आठ पोरांच्या डोळ्यात पाणी येत म्हणून . खरं तर हा विनोद नाही तर एक बुद्धिमान निरीक्षण आहे . आमच्या बारमध्ये, हॉटेलमध्ये, काळी पिवळी मध्ये नदीम श्रवण, आनंद मिलिंद यांचीच गाणी वाजतात. आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगी अजून उदित, सानू, अभिजित यांचीच गाणी आठवतात. मला सोशल मीडियात आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये पण वर्षानुवर्षे मदनमोहन, आर डी, रहमान, नय्यर यांच्यावरच वाचायला मिळतं. देशातल्या एका मोठ्या लोकसंख्येचं संगीत देणाऱ्या संगीत दिग्दर्शकांना 'छपरी' ठप्पा लावून बाजूला अडगळीत टाकणं हे एकूण चित्रपटसंगीताच्या इतिहासाच्या documentation साठी हानिकारक ठरणारं आहे. हे अरण्यरुदन नाही. आमच्या नॉस्टिल्जियाला स्थान द्या हो असा टाहो पण नाही. मी स्वतः माध्यमांमध्ये लिखाण करतो आणि शक्य तेंव्हा नव्वदच्या एरा बद्दल लिखाण करतो. पण सोशल माध्यमांमध्ये लिहिणाऱ्या आणि ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या लोकांनी आपल्या पातळीवर या एराच्या संगीताचं documentation करत राहणं आवश्यक आहे . आणि शेवटी 'पसंद अपनी अपनी ' हे तर आहेच . याबाबतीत विजू शाह या अवलिया संगीतकाराचे उदाहरण बघण्यासारखे आहे .नव्वदच्या दशकातल चित्रपट संगीत म्हंटल की अनु मलिक, नदीम श्रवण, जतिन ललित यांची नाव डोळ्यासमोर येतात. अनेक दुर्दैवी संगीत दिग्दर्शक या भाग्यापासून वंचित राहतात. त्यातलं आघाडीचं नाव म्हणजे विजू शाह. सध्याच्या पिढीतल्या तरुणांना तर त्याचं नाव माहित असण्याची शक्यता पण नाही. पण नव्वदच्या दशकातल्या संगीतावर जीव असलेल्या पिढीसाठी विजू शाह महत्वाचा आहे. विजू शाहची जी लोकप्रिय मानली जाणारी जी जी गाणी आहेत, ती जवळपास सगळीच जवळपास ढापलेली आहेत. मोहरा, विश्वात्मा, त्रिदेव सिनेमातली त्याची गाजलेली सगळी गाणी म्हणजे दिवसाढवळ्या दुसऱ्यांच्या चालीवर टाकलेला दरोडा आहे. पण आपल्याकडे ही संगीतचौर्यची दैदिप्यमान परंपरा फार जुनी आहे. विजू शाहची काही 'ओरिजनल ' गाणी (म्हणजे ती ढापलेली आहेत असं अजून तरी माहित नाही अशी गाणी ) पण भारी गाणी आहेत. हंसल मेहताचा केके मेनन मुख्य भूमिकेत असणारा 'छल ' नावाचा एक विस्मृतीमध्ये गेलेला सिनेमा आहे. त्यामध्ये शानने गायलेलं 'चुपचाप' नावाचं गाणं आवर्जून युट्युबवर ऐका. खूप सुंदर कम्पोजिशन आहे. 'तेरे मेरे सपने' मधलं हरिहरन आणि साधना सरगमचं 'कुछ मेरे दिल ने कहा ' गाणं तर लोकप्रिय झालं होतंच . नसिरुद्दीन शाहने दिग्दर्शित केलेला पहिला आणि शेवटचा सिनेमा म्हणजे 'यु होता तो क्या होता'. या सिनेमाचं कुणाल गांजेवाला आणि सुनिधीने गायलेलं टायटल सॉंग अप्रतिम म्हणावं असं आहे. रितेश देशमुखचं पदार्पण झालं त्या 'तुझे मेरी कसम 'सिनेमातलं संगीत पण छान होत. 'आर या पार' सिनेमातलं अभिजीतच 'मन चाहे सनम ' गाणं पण आवर्जून मिळवून ऐकण्यासारखं. पण संगीत दिग्दर्शनापेक्षा विजू शाहचं महत्व आहे ते म्युझिक अरेंजिंगच्या क्षेत्रात त्याने आणलेल्या क्रांतीमुळे. विजू शाहच्या सिनेमातलं संगीत नियोजन हे निव्वळ अफाट होतं. त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो 'वन मॅन आर्मी' होता. कंपोजिंग, अरेंजिंग ही सगळी काम तो एकहाती करायचा. नशीब साधना सरगमचा आवाज त्याला काढता येत नव्हता म्हणून नाहीतर गाणी पण त्यानंच म्हंटली असती. सिंथेसायझर नावाची क्रांती विजू शाहने आपल्या सिनेमात आणली. सिंथेसायझरवरच तो वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून वाद्यसंयोजन करायचा. आणि ते अफाट असायचं. 'गुप्त ' सिनेमातलं 'गुप्त , गुप्त , वो क्या है ' हे टायटल सॉंग ज्यांनी ऐकलं आहे, त्यांना मी काय म्हणत आहे ते कळेल . हे गाणं म्हणजे 'बुरी लत ' आहे . 'बुलंदी ' नावाच्या टुकार सिनेमात विजू शाहने केलेले प्रयोग आवर्जून ऐकण्यासारखे आहेत . सुनील शेट्टीचा एक 'विनाशक द डिस्ट्रॉयर ' नावाचा सिनेमा आहे त्यात संगीत संयोजनमध्ये त्याने केलेले वेगळे प्रयत्न आहेत. पण काळाच्या पुढे असणाऱ्या लोकांना त्याची फळ भोगावीच लागतात. कारण त्यांच्या समकालीन लोकांना एक तर त्याचं महत्व कळत नाही किंवा त्यांच्या काळाच्या पुढं असण्याची भीती तरी वाटते. विजू शाहने जी सिंथेसायझर क्रांती आणली त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या कार्यरत इतर संगीत दिग्दर्शकांना, सहाय्यक संगीत दिग्दर्शकांना, वादकांना असुरक्षितता जाणवू लागली. कारण सिंथेसायझरचं सगळी काम करणार असेल तर मग यांच्या रोजगाराचं काय होणार? या लोकांची भीती एकदमच अनाठायी नव्हती. विजू शाहसारख्या लोकांना आवरण आवश्यक होतंच. मग संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांच्या संघटनेने एक ठराव केला. कुठल्याही चित्रपटाच्या संगीतावर काम करताना तुम्हाला दोन लोकांना बोर्डवर घेण्याचं बंधन त्यामुळे निर्मात्यावर आलं. विजू शाहवर पण ते आलंच. पण इतक्यानेच संगीत क्षेत्रातल्या लोकांचं समाधान होण्यासारखं नव्हतं . विजू शाहवर एक अघोषित बहिष्कार टाकण्यात आला. शाहला मिळणार काम कमी कमी होत गेलं. आता तर तो जवळपास बाहेरच फेकला गेला आहे. हल्ली तर तो भारतामध्ये कमी कॅनडामध्येचं जास्त असतो. यांत्रिकीकरण आणि माणूस या लढ्यात दोन्ही बाजूंनी हरणारा शेवटी माणूसच असतो. विजू शाह हे त्याचं उदाहरण आहे. एकूणच लुम्पेन वर्गाच्या सिनेमाला दुर्लक्षानं मारलं गेलं. या प्रक्रियेत नव्वदच्या दशकातला सिनेमा-संगीत भरडलं गेलं. अर्थातच नव्वदच्या सिनेमाच्या स्वतःच्या काही मर्यादा होत्या. त्यात प्रायोगिकशीलतेला शून्य जागा होती . त्या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारच्या सामाजिक जाणीवा नव्हत्या. पण प्रत्येक कालखंडाच्या स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात. तशाच नव्वदच्या दशकातल्या कलाकृतींनाही होत्या. नव्वदच्या दशकात तयार झालेले सिनेमे-संगीत यांचं जागतिकीकरणपूर्व आणि जागतिकीकरणोत्तर असे दोन उपप्रकार पडतात. ऐंशी -नव्वदीमध्ये जन्मलेली पिढी ज्याप्रमाणे संक्रणातली पिढी आहे, तीच बाब त्या काळातल्या टीव्ही, सिनेमा, संगीत यांना लागू पडते. त्या काळात बनलेला सिनेमाचा एक विशिष्ट सामाजिक आणि राजकीय संदर्भ आहे. उदाहरणार्थ खान त्रयीचा उदय याच काळात झाला. ‘यस बॉस’ चित्रपटातलं शाहरुख खानचं ‘बस इतनासा ख्वाब है’ हे गाणं तत्कालीन मध्यमवर्गाच्या उमलत्या इच्छा-आकांक्षाचं यथार्थ वर्णन करतं. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ मधला शाहरुख खान श्रीमंत आणि यशस्वी तर व्हायचंय पण मूल्यांची कास पण सोडायची नाहीये, या टिपिकल मध्यमवर्गीय गुंतावळ्यात अडकलेला दिसतो. अमिताभ बच्चनची नायक म्हणून सद्दी संपण्याचा काळ हाच. भारतीय समाजानं ‘अँग्री यंग मॅन’चा चोळणा टाकून आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्याचा हाच तो काळ. अशा अनेक गोष्टी सांगता येतील नव्वदच्या दशकातल्या सिनेमाबद्दल. हे अरण्यरुदन नाही, हे शेवटी स्पष्ट करायला हवं. आमच्या नॉस्टेल्जियाला माध्यमांमध्ये स्थान द्या हो असा टाहो पण नाही. मी स्वतः माध्यमांमध्ये लिखाण करतो आणि शक्य तेव्हा नव्वदच्या काळाबद्दल लिहितो. पण सोशल माध्यमांमध्ये लिहिणाऱ्या आणि ऐंशी-नव्वदच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या लोकांनी आपल्या पातळीवर या काळातल्या संगीताचं व चित्रपटांचं आपापल्या परीने डॉक्युमेंटेशन करत राहणं आवश्यक आहे. कारण मुख्य माध्यमांमध्ये याला स्थान मिळेल याची शक्यता कमीच आहे. अमोल उदगीरकर
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget