एक्स्प्लोर

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

अलका याज्ञिक या गायिकेची गाण्यांविषयीची आकडेवारी अशीच डोळे विस्फारून टाकणारी आणि वर उल्लेख केलेल्या गायकांना पण काही बाबतीत माग टाकणारी आहे.

संगीतासारख्या सूर रम्य क्षेत्राला आकडेवारीच्या रुक्ष प्रांतात खरं तर नेऊ नये. पण कधीकधी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि इतर अशा महान गायकांच्या कारकीर्दीचे मोजमाप करण्यासाठी कधीकधी आकडेवारी मांडणं आवश्यक असतं. अलका याज्ञिक या गायिकेची गाण्यांविषयीची आकडेवारी अशीच डोळे विस्फारून टाकणारी आणि वर उल्लेख केलेल्या गायकांना पण काही बाबतीत माग टाकणारी आहे. अलकाच्या नावावर  प्रतिष्ठेचा फिल्मफेयर पुरस्कार सर्वाधिक म्हणजे सात वेळा मिळण्याचा रेकॉर्ड जमा आहे. याच पुरस्कारासाठी तिला तब्बल 36 वेळा नामांकन मिळालं आहे. एका वर्षी तर अशी वेळ होती, की पुरस्कारातले पाचही नामांकन तिला होते . दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला आहे. जवळपास अडीच हजारच्या आसपास गाणी तिने गायली आहेत, ती ही सर्व भाषांमधली. सर्वात जास्त गीणी गाणाऱ्या गायकांच्या यादीत तिचा पाचवा क्रमांक आहे. एवढी प्रचंड कामगिरी करून पण अलकाचं नाव कधीही महान गायकांच्या यादीत येत नाही. इतर गायकांच्या नावाने जशा अमुक तमुक नाईट्स होतात तशा तिच्या नावाने होत नाहीत. लता, आशा, गीता दत्त या गायिकांचा एक जो मोठा चाहता वर्ग आहे तो पण तिच्याकडे नाही. एकूणच नव्वदच्या दशकात उदयाला आलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या संगीताकडे, संगीतकारांकडे आणि गायकांकडे तुच्छतेने बघितलं जातं. त्याचा फटका इतकं डोंगराएवढं काम करून पण अलकाला बसला आहे. अलकाच्या गाण्यांनी एका पिढीला नादावलं होतं. अलकाचा आवाज तलम, रेशमी. तिच्या आवाजातली रोमँटिक गाणी विशेष लोकप्रिय. 'हम दिल दे चुके सनम ' मधलं 'चांद छुपा बादल मे' असो, 'कयामत से कयामत तक'मधलं 'ए मेरे हमसफर ' , 'साजन ' मधलं 'मेरा दिल भी कितना पागल है', 'दिवाना'मधलं ऐसी दिवानगी, 'मोहरा ' मधलं 'टीप टीप बरसा पानी ' आणि अशा कितीतरी गाण्यांनी नव्वदच्या दशकात मोठं झालेल्या लोकांना रिझवलं आहे. अनेकांच्या प्रेमप्रकरणात (एकतर्फी प्रेमप्रकरण पण ) आणि आठवणींच्या जगात अलका याज्ञिकच्या गाण्यांना ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान आहे . अलकाच्या गाण्यांना एक सामाजिक पैलू आहे . नव्वदच्या दशकात आताच्या युगाप्रमाणे स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचा आणि कामासाठी घराबाहेर पडण्याचा ट्रेंड फारसा नव्हता . त्याकाळात निमशहरी आणि शहरी भागात पण पुरुष घराबाहेर कामासाठी पडतील आणि स्त्रिया घराची आघाडी सांभाळतील अशी एक रुळलेली व्यवस्था होती. घरातली ढीगभर कामं संपवल्यावर दुपारी या बायकांना जो दीड घटकेचा विसावा मिळायचा तो अलका याज्ञिक, कुमार सानू, उदीत नारायण यांच्या गाण्यांनी सुसह्य व्हायचा . मनोरंजनाची साधनं अतिशय कमी असण्याचा तो काळ. रेडिओवर दुपारी लागणारी गाणी हाच अनेकांचा विरंगुळा होता. या गृहिणींच्या भगभगीत एकट्या दुपारमध्ये अलकाच्या मेलोडियस गाण्यांनी रंग भरले आहेत. त्या गृहिणी आता पन्नाशीच्या जवळ आल्या असतील पण अलकाचा त्यांच्या मनात नोंदला गेलेला आवाज अजून पण विशीचाच आहे. एक काळ तर असा होता की रिलीज होणाऱ्या दहा गाण्यांपैकी आठ गाणी अलकाची असत. 'अतिपरिचयात अवज्ञा' या सूत्रानुसार तिचा आवाज श्रोते गृहीत धरायला लागले होते. करिष्मा, रविना, काजोल, माधुरी यांचा पडद्यावरचा आवाज म्हणजे अलका याज्ञिक असं समीकरणच रूढ झालं होतं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी अलका याज्ञिकने आपली सांगितिक कारकीर्द सुरु केली. इतक्या लहान वयात कलकत्ता रेडिओसाठी तिने धार्मिक गाणी गायला सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी ती आईसोबत मुंबईला आली. मग सुरु झाल्या काम मागण्यासाठी निर्मात्यांच्या भेटीगाठी. एकदा नशिबानेच अलकाचा आवाज राज कपूरच्या कानावर पडला. राज कपूरला संगीताचा खूप चांगला कान होता. त्याला या मुलीचा आवाज आवडला. त्याने अलका आणि तिच्या आईला संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे पाठवलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना पण तिचा आवाज आवडला. पण त्यांनी अलकाच्या आईला एक मोलाचा सल्ला दिला . ही मुलगी भविष्यात मोठी स्टार होऊ शकते, पण हिच्या आवाजावर अजून मेहनत घ्या. गायनाच्या क्षेत्रात उतरवण्याची घाई करू नका. अलकाच्या आईने हा सल्ला अर्थातच मानला. नंतर काही वर्षांनी अलकाने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला तो 'पायल की झंकार ' नावाच्या फिल्ममधून. पण अलकाच्या कारकिर्दीला हवा असणारा बूस्टर डोस मिळाला तो 'लावारीस' फिल्ममधल्या 'मेरे अंगने मे तुम्हारा क्या नाम है' या गाण्यामधून.  हे गाणं सुपरहिट झालं आणि अलकाला नंतर मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. अलकाने तब्बल अडीच हजार गाणी गायली आहेत. आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यानंतर सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायकांच्या यादीत अलका याज्ञीकचा नंबर लागतो. बाहुल्यांशी खेळण्याच्या दिवसांमध्ये पण अलकाला रेडिओवर लता मंगेशकरची गाणी ऐकण्यात जास्त रस होता. लताची सहीसही नक्कल करून तिची गाणी म्हणायची हा तिचा आवडता छंद. आपल्या आईव्यतिरिक्त अलका याज्ञिक लतालाच आपला गुरु मानते. अलकाने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेंव्हा बॉलिवूडमध्ये मंगेशकर भगिनींचे वर्चस्व होत . नवीन गायकांना स्वतःची जागा बनवणे अवघड होतं. मंगेशकर भगिनी सगळी गाणी गाणं निव्वळ अशक्य होतं म्हणून इतर गायकांना गाणी मिळायची इतकंच. त्या काळात स्वतःची स्पेस बनवणं अवघड होतं. पण अलका याज्ञिकने आपली स्पेस बनवली. या स्पेससाठी तिची स्पर्धा होती, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम या तितक्याच गुणवत्तावान गायिकांशी. पण अलकाने या स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा बरीच आघाडी घेतल्याचं दिसतं. चित्रपट संगीताच्या क्षेत्रातल्या घाणेरड्या राजकारणाचा फटका अलकाला पण बसला. अनेकदा तिने गायलेली गाणी नंतर दुसऱ्या गायिकेकडून डब करून घेतले जात. पण आपल्या परिवाराच्या विशेषतः पतीच्या भरभक्कम पाठिंब्याने अलका या फेजमधून तरली. अलकाने संगीतकारांच्या तीन पिढ्यांसोबत काम केलं आहे. लक्ष्मीकांत -प्यारेलाल , राजेश रोशन , आनंद मिलिंद , नदीम श्रवण, अनु मलिक, शंकर ईशान लॉय, रहमान अशा वेगवेगळ्या पिढ्यांच्या सुरांना साज चढवला आहे. एक वेळ अशी होती, की नव्वदीच्या दशकातले सगळे गायक प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले होते . गेल्या काही वर्षात गायकाचं शेल्फ लाईफ खूप कमी झालं आहे . सुनिधी चौहानसारख्या नवीन दमाच्या गायिकांचं आगमन व्हायला लागलं आणि अलकाचं गाणं कानावर पडणं दुर्मिळ होऊ लागलं होत. अलका श्रोत्यांच्या स्मृतीतून पण हळूहळू नाहीशी होते, की काय असं वाटायला लागलं होतं. पण अलकाने भन्नाट पुनरागमन केलं . दस्तुरखुद्द रहमानच्या 'तमाशा ' चित्रपटातल्या गाण्यातून . 'अगर तुम साथ हो ' हे गाणं म्हणजे अनेकांच्या काळजाचा ठेवा आहे. कुठल्याही हृदयभंग झालेल्या प्रेयसीला हे गाणं जगातलं सर्वोत्कृष्ट गाणं वाटू शकतं. इर्शाद कामिलचे मधात बुडालेले शब्द, रहमानची काळीज चिरत जाणारी धून आणि अलकाचा आवाज हे एक जालीम मिश्रण आहे. इम्तियाज अलीने पडद्यावर ते गाणं फार सुंदरपणे चित्रित केलं आहे. ह्या गाण्याने अलकाची वापसी झाली. अलकाला पुन्हा गाणी मिळायला लागली. संगीतकारांच्या नवीन पिढ्यांना अलका नावाची अप्रतिम गायिका मिळाली. अलकाच्या कारकीर्दीची सेकंड इनिंग पण अशीच बहरत जाओ आणि ओल्ड वाइनप्रमाणे मुरत जाणारा तिचा आवाज आम्हाला अजून अनेक वर्ष ऐकायला मिळत राहो. संबंधित ब्लॉग :

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget