एक्स्प्लोर
ब्लॉग : पुणेकरांचा विश्वास-अग्रज
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातल्या अस्सल पुणेकरांनी पारखून घेतलेलं असं नाव म्हणजे ‘अग्रज फूड्स’. पिढ्यानपिढ्या जरी चालत आलेला नसला आणि अनेक मॉल्सची स्पर्धा असली तरीही किराणामाल आणि तयार खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांच्या यादीत अग्रजचे नाव आज आघाडीवर आहे.

स्वतःच्या चरितार्थासाठी आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी खरेदी-विक्री करतच असतो. मग ती एखादी वस्तू असेल किंवा आजच्या जमान्यातली एखादी सर्व्हिस. पण एक क्षेत्र असे आहे, जिथे प्रत्येकजण फक्त ग्राहकच (उपभोक्ता) असतो अशा मोजक्या व्यवसायांपैकी सर्वात प्रमुख व्यवसाय म्हणजे किराणामालाचा.
किराणामालाचा संबंध प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी असल्याने हा विषय साहजिकच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थांमधल्या भेसळ ह्या विषयावर Abp माझाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले ब्लॉग वाचून, अनेकांनी मला किराणामालाच्या भेसळीबद्दलही लिहायची विनंती केली होती. एक उपभोक्ता आणि एक व्यावसायिक ग्राहक ह्या दोन्ही नात्यांनी त्यावर लिहिण्यासारखी माहिती पुष्कळ आहे.
उदाहरणच द्यायचं झालं तर साध्या तयार मिरची पुडीत सर्रास मिक्स होणाऱ्या काड्या किंवा पिठांमध्ये, हळदीत मिसळली जाणारी माती (शब्दशः), साधारण सारख्याच दिसणाऱ्या स्वस्तातल्या तांदुळावर वासाची केमिकल्स टाकून त्याला महागड्या जातीच्या तांदुळाच्या किमतीत विकणारे अनेक जण, आजकाल माझ्या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने दिसतात. सर्वसामान्य ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना लुबाडण्यात आपली क्रिएटीव्हीटी दाखवणाऱ्या अशा लोकांना मी आजकाल कोपरापासून नमस्कार करतो. मी सांगतोय ह्यात काही फार नवीन आहे अशातला भाग नाही. ह्यासारख्या अनेक गोष्टी आपल्यापैकीही अनेकांना माहिती असतील. कारण, मुळात भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींची उत्पत्ती किराणामालाच्या मार्केटमध्ये पूर्वापार आहे. नाहीतर शिवकालात वाणीकाम करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या सचोटीचे दाखले, आजही दिले गेलेच नसते. तरीही मी म्हणेन, किराणाभुसार मालाचा व्यवसाय सुरु आहे तो मालात भेसळ आणि दर्जाशी तडजोड न करता सचोटीने व्यवसाय करणाऱ्या अनेक छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांमुळेच.
पुण्याच्या, पुणेकरांच्या इतर कुठल्याही (जवळपास प्रत्येक) गोष्टीविषयी सबंध महाराष्ट्राला आक्षेप असले तरी पुणेकरांच्या चोखंदळपणाविषयी मात्र उभ्या महाराष्ट्रालाच काय सबंध देशालाही कधीच शंका नसते. आपल्याला पटलेला एखादा जिन्नस, पदार्थ मिळवण्याकरता सामान्य पुणेकर जेवढी ठिकाणं पालथी घालू शकतो, त्याची तुलना फक्त विशिष्ट साडी, ड्रेससाठी कित्त्येक दुकानं उलटीपालटी करणाऱ्या एखाद्या स्त्रीबरोबरच करता येईल. त्यामुळेच पुणेकरांनी पारखून वाखाणलेल्या प्रत्येक पदार्थाची स्वतःची ओळख आपोआप निर्माण होते.
पण उगाच चकरा न मारता असे अनेक जिन्नस जिथे एकत्र मिळतात ते ठिकाण, पुणेकरांच्या गळ्यातला ताईत बनतंच. देशीविदेशी मॉल्सच्या खऱ्याखोट्या स्कीम्सना न भूलता खात्रीशीर पदार्थांसाठी पुणेकर डोळे झाकून अशा दुकानांचा रस्ता धरतात. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातल्या अस्सल पुणेकरांनी पारखून घेतलेलं असं नाव म्हणजे ‘अग्रज फूड्स’. पिढ्यानपिढ्या जरी चालत आलेला नसला आणि अनेक मॉल्सची स्पर्धा असली तरीही किराणामाल आणि तयार खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांच्या यादीत अग्रजचे नाव आज आघाडीवर आहे.
स्वतःच्या फूड प्रोसेसिंगच्या कारखान्यातून पुण्यातल्या अनेक ख्यातनाम हॉटेल्स, फूड प्रॉडक्टस बनवणाऱ्या अनेक नामवंत कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पिठांचा सप्लाय करणाऱ्या अग्रजची, आजच्या घडीला वेगवेगळी पिठ, कडधान्ये ते ड्रायफ्रुट्सपर्यंत स्वतःची 250 उत्पादने आहेत. फक्त येवढ्यावरच मर्यादित न रहाता, स्वतःच्या उत्पादनांबरोबर मल्टीनॅशनल कंपनीजपासून ते अनेक ‘लोकल मेक’पर्यंत 1000 वेगवेगळ्या ब्रँडचे तब्बल 4000 जिन्नस अग्रजच्या आउटलेट्समधून विकले जातात.
1998 साली सुरु केलेल्या अग्रजची सगळी दुकानं एकत्र मिळून भारतातल्या अनेक नामवंत फूड मॉल्सच्या तोडीचा व्यवसाय करतायत. अग्रज हे आज केवळ दुकान राहिले नसून आज एक सुप्रतिष्ठित “फूड ब्रँड” झालाय.
जवळपास 350 जणांची टीम असलेल्या अग्रजच्या वाटचालीचे श्रेय निसंशय अग्रजचे संस्थापक, संचालक बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब थत्ते ह्यांना जातं. स्वतः अनेक व्यवसाय जवळून पाहिलेला एक व्यावसायिक ह्या नात्याने कुठलीही अतिशयोक्ती न करताही मी म्हणेन, शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या बाळासाहेबांबद्दल आणि त्यांच्या अग्रजच्या प्रवासाबद्दल सविस्तर लिहायचं म्हणजे सध्याच्या पिढीसाठी खरोखर एखादा प्रेरणादायी तरीही रंजक असा ग्रंथ लिहिता येईल.
उच्चशिक्षित, शिक्षकी पेशातले आईवडील आणि त्याहीपेक्षा उच्चशिक्षित भावंडे असलेल्या बाळासाहेबांनी किर्लोस्कर, रस्टनसारख्या कंपन्यात इंजिनियरची नोकरी केल्यानंतर, हार्डवेअर विक्री, बेकमन्स कंपनीची ब्रेड, केक्सची कोल्हापूर भागातली एजन्सी, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, ग्रील, शटर, विंडो फॅब्रीकेशनच्या व्यवसायापासून ते किचन इक्विपमेंट मेंटेनन्स, गिरण्याची मशिनरी बनवण्यापर्यंत अनंत व्यवसाय केले. व्यवसायाच्या निमित्ताने चितळे बंधूंपासून ते ‘मुस्लीम सत्यशोधक’च्या सैय्यदभाईंपर्यंत अनेकांबरोबर त्यांनी काम केलं. शेवटी त्यांची धडपड पाहून, पुण्यातल्या जुन्या गिरणीपैकी प्रमुख असलेल्या ‘किशोर फ्लोअर मिल’च्या करंदीकर मामांच्या प्रेरणेनी आणि मार्गदर्शनाखाली बाळासाहेब थत्तेंनी 1998 मध्ये स्वतःच्या फूड प्रोसेसिंगच्या व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काही वर्षांच्या बिकट आर्थिक वाटचालीनंतर, अथक परिश्रमाने आणि आपल्या स्वभावाच्या जोरावर कमावलेल्या मित्रपरिवाराच्या पाठिंब्यावर बाळासाहेबांनी आणि त्यांच्या अग्रजच्या टीमने केलेली वाटचाल पाहिली की स्तिमित व्हायला होतं. पण बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा एक गुण ह्याहीपेक्षा मोठा आहे.
व्यवसायात नवीन येणाऱ्या व्यक्तीची कुठलीही भ्रामक समजूत करून न देतानाच, खाद्यपदार्थ बनवताना घ्यायची काळजी, त्याबद्दलचे सरकारी नियम, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सरकारी परवाने/सर्टिफिकेशन्स ह्यांच्यापासून ते जाहिरातीचे बोर्ड कसे बनवावेत, त्या प्रॉडक्टचा व्यवसाय सध्या कसा आहे, ह्याबद्दल ते रोज मार्गदर्शन करत असतात, तेही अगदी आनंदाने आणि स्वखर्चाने. त्यांच्या ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन अनेक जणांचे व्यवसाय सुरु झालेत, वाढलेत. अनेक उद्योजक घडवणारा हा माणूस अफाट आहे.
आजच्या अग्रजची ‘प्रॉडक्शन कपॅसिटीही’ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तेवढीच थक्क करणारी आहे. धान्य निवडणे, पाखडणे ह्यासारख्या प्रोसेस करून, साधारण 6500 किलो माल इथे दररोज दळला जातो. सणावारी तर ही आकडेवारी अगदी दुपटीपर्यंतही म्हणजे 12-13 टनापर्यंतही वाढते. अग्रजच्या कारखान्यात, 40 दुकाने आणि ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्या विभागातून जवळपास 350 जणांना रोजगार मिळतो.
आपल्या अनुभवाने भारतभरातून खरेदी केलेल्या निवडक मालावर अग्रजच्या कारखान्यात केलेली संपूर्ण हायजिनिक प्रोसेस, मालाचे योग्य वजन आणि अग्रजच्या आउटलेट्समध्ये होणारा खात्रीशीर व्यवहार; ह्या सूत्रांवर 1998 साली सुरुवात केलेल्या अग्रजचा व्यवसाय नुसताच सुरु नाही तर वाढत आहे. स्वतःची फ्रेंचायझी आउटलेट मिळून पुणे, मुंबई, डोंबिवली, अहमदनगर ह्या शहरात जवळपास 40 आउटलेट्समार्फत चालतो. त्यामुळेच ‘अग्रज’ मधून खरेदी केलेला कुठलाही माल हा उत्तम क्वालिटीचाच असेल ह्याची खात्री इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला असते. त्याच विश्वासाच्या जोरावर येत्या काही काळात 100 फ्रेन्चायझी आउटलेट सुरु करण्याचं त्याचं पुढचं ध्येय आहे.
कोणी मान्य करो किंवा न करो, पण ग्राहकाला वस्तूबद्दल माहिती नसल्याने, आधी स्वतः त्यांची खात्री करून ते पदार्थ आपल्याला पुरवणारे असे किराणा दुकानदार आपल्या रोजच्या आयुष्याचा न लक्षात येणारा आधार असतात. आजच्या मॉलच्या जमान्यात अशा चांगल्या ‘वाण्यांची’ संख्या रोडावत चालली आहे. ही वस्तूस्थिती आहे. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मोठ्या भांडवलाच्या जोरावर उतरलेले देशीविदेशी कंपन्यांचे मॉल्स आपल्याला स्वस्त किंमतीत माल देतील. एकावर एकच काय पण 10-20 फ्री सारख्या स्कीम्सही देतील. पण आपल्या, आपल्या कुटुंबाच्या रोजच्या खाण्यासाठी जो किराणा आणि तयार पदार्थांची खरेदी करतो, त्या मालाची खात्री द्यायला त्यातले कितीजण तयार होतील ह्याची मला खरच शंका आहे. त्यासाठी निर्धास्तपणे खरेदी करायला माझ्यासारख्या अनेकांना ‘अग्रज’सारख्या, आपल्या कोपऱ्यावरच्या दुकानांचाच हक्काचा आधार असतो. त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांचे मॉल्स टिकले नाहीत तरी मला चालेल, पण माझ्या मातीतला दुकानदार कायम टिकायला पाहिजे, ही भावनाही आहेच.
अंबर कर्वे
संबंधित ब्लॉग :

खादाडखाऊ : पुण्यातील दोराबजी & सन्स
खादाडखाऊ : 'धुंधुरमास' स्पेशल खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी खादाडखाऊ : पुण्यातले इराणी मित्रो !!! आज खिचडी पुराण खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी! खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचाView More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट