Ashadhi Ekadashi : पारावरच्या गप्पा : 'इठ्ठल हाय आपल्या पाठीशी'
Ashadhi Ekadashi : (आषाढी चा दिवस, काही मंडळी समाज मंदिरात बसलेली, तेवढ्यात कोतवाल दवंडी देतांना)
तुळश्या : आज आषाढीचा मोडा हाय र....! दाम्या : अय, तुळश्या दादा, समद्यासनी ठाव हाय, आज ईठ्ठला चा दिस हाय ते
धन्या : दाम्या, त्याच सांगन, काम हाय...
रंग्या : अर, दाम्या तुका तात्या येणार हाईत का न्हाय...
दाम्या : येणार हाईत, न्याहारी करत असतील.
मंग्या : लेकाहो, पाणी मातर, समद्या राज्यात चालू हाय गड्या
रंग्या : व्हय तर, आता आवणीलाबी सुरवात झालीय म्हणा, फकस्त सुखान पड रे बाबा...
दाम्या : हाव गड्या मागल्या वरिस मोक्कार पाऊस झालता, कोल्हापूर, सांगली कड कसली भयानक परिस्थिती व्हती, औंदा नको बाबा अस..
धन्या : दाम्या, तुह्या जिभला काही हाड, चांगल्या दिसी अस वंगाळ बोलू नग...
(तेवढ्यात तुका पाटील येतो) संत्या : तुका तात्या आला वाटत...
तुका पाटील : काय र पोराहो, जमले व्हय...
दाम्या : व्हय तात्या, तुमचीच वाट पाहत व्हतो? लय टाइम लागला...
तुका पाटील : अर न्याहारी करत व्हतो, हात धुतोच व्हतो की, इज्याच्या फोनवर शाळतल्या मास्तरचा फोन आला
धन्या : काय म्हणला मास्तर...
तुका पाटील : आर, त्यो म्हणला पाटील, शाळेत काय पोर येत न्हाय, संख्याबी कमी झालीय.
तुळश्या : मास्तराला म्हणावं पाणी केवढं झालंय नदीला, कस यायचं पोरांनी...
तुका पाटील : व्हय बराबर म्हणतुया.. दोन तीन जण जात्यात पण जीव जायाची भीती, एवढं नदी पार करण म्हंजी सोप्प काम न्हाय...
रंग्या : व्हय तर, म्या म्हणतो कशाला जीव धोक्यात घालावा, पोर चार महिने रातील घरी, त्यानं काय व्हतंय...
दाम्या : शाळच व्हईल, कायतरी पर एखादं अर्जंट पेशंट आलं म्हंजी काय करायचं...
तुका पाटील : ते बी हाय म्हणा...पर कायतरी उपाय कराया लागलं, शिक्षण तर थांबाया नग, दवाखाना बी झाला पाहिजे...नदी वलांडायची म्हंजी...
दाम्या : खरंय, पाटील काहीतरी कराया हवं, पर्वा दिसी खालच्या आळीच्या तान्याच पोरगं पोरगं वाहून जाता जाता राहील...
तुका पाटील : त्याचमुळ, काहीतरी उपाय शोधायला नग, संत्या, त्या भग्याला अन वैभ्याला, बोलव बर इकडं...
(संत्या फोन करून त्या दोघांना बोलावतो, दोघेही थोड्या वेळात येतात)
वैभ्या : पाटील आम्हाला कशाला बोलवलं? तुका पाटील : सांगतो, वाईस दम तर खाय, कुठं कामाला जातोस का?
वैभ्या : हा जातोय की!
तुका पाटील : तू त घरीच असतोस की!
वैभ्या : म्हणजे काम चालुय पण घरूनच...
तुका पाटील : तुला पोरांना शिकवायला जमलं ना?
वैभ्या : पोरांला, पण शाळा सुरू झाल्यात की आता
तुका पाटील : आर नदीला पूर आलाय, चार महिने असच चालू राहील तवा आपल्या गावातल्या पोरायला तू शिकवं
वैभ्या : चाललं की पण जागा ?
तुका पाटील : हांग अस, अर आपलं ईठ्ठलाच मंदिर हाय की!
भग्या : मग मला कशापाई बोलावलंय..?
तुका पाटील : भग्या, तुयावर लय मोठी जबाबदारी हाय, न्हाय म्हणू नग... पुण्याच काम हाय...
भग्या : सांगा की पाटील, गावासाठी आपण काहीही करू?
तुका पाटील : नदीला पूर आलाय, आपल्या गावातल एखादं न्यायचं झालं तर तरास हाय, तुयाकड गाडी हाय, म्हणून ईचारल...
भग्या : व्हय करतो पाटील, कवाबी रातच्याला हाक मारा, मी हजर राहीन...
तुका पाटील : झालं त मग, दोन्ही काम व्हतील आता, पोर बी शिकतील अन दवाखान्याच काम बी व्हईल...ईठ्ठला तूच आलास र बाबा...
दाम्या : पाटील, झ्याक काम झालं बघा, पांडुरंग पावला म्हणायचा... तुका पाटील : व्हय व्हय, गावात दिंडीचा कार्यक्रम हाय, चला पांडुरंगाचा गजर करू.....
(समदे जण इठ्ठलाच्या मंदिराकडे जातात)