एक्स्प्लोर

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थीच्या दिवशी बनले दुर्मिळ योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी पाळली जाते. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

Vinayak Chaturthi 2024 : आज, म्हणजेच 11 मे रोजी वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) व्रत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे, तसेच या दिवशी उपवास ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होतं, गणपतीच्या कृपेने सर्व दु:ख दूर होतात.

विनायक चतुर्थीला गणेशाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळतं. विनायक चतुर्थी व्रत हे महिन्यातून एकदाच येतं. यावेळी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला काही विशेष योग तयार होत आहेत, यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. या शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा केल्याने चौपट फळ मिळू शकतं.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2024 Shubh Muhurta)

विनायक चतुर्थी 11 मे रोजी, म्हणजेच आज पहाटे 2:50 वाजता सुरू झाली आहे आणि 12 मे रोजी म्हणजेच, उद्या रात्री 2:50 वाजता चतुर्थी समाप्त होईल. विनायक चतुर्थीच्या पूजेची योग्य वेळ आज सकाळी 10.57 ते दुपारी 1.39 पर्यंत असेल.

विनायक चतुर्थी 2024 शुभ योग (Vinayak Chaturthi 2024 Shubh Yog)

विनायक चतुर्थीच्या दिवशी रवियोग, सुकर्म योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा संयोग होणार आहे. आज पहाटे 5.33 ते 7.13 पर्यंत रवि योग असेल. त्याचबरोबर सुकर्म योग सकाळी 10.35 पर्यंत राहील आणि मृगाशिरा नक्षत्र सकाळी 10.15 पर्यंत राहील. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र आहे.

गणपतीची पूजा करण्याची पद्धत (Ganesh Puja Vidhi)

सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर प्रसाद म्हणून गणेश मंदिरात एक नारळ आणि मोदक घेऊन जा. बाप्पाला गुलाबाची फुलं आणि दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 27 वेळा जप करा आणि अगरबत्ती अर्पण करा. दुपारच्या पूजेच्या वेळी आपल्या घरात आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे, माती किंवा सोन्या-चांदीची गणेशमूर्ती स्थापित करा. यानंतर गणपतीची पूजा आणि आरती करून मुलांना मोदकांचं वाटप करावं.

विनायक चतुर्थी उपाय (Vinayak Chaturthi Remedies)

1. या दिवशीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला दुर्वाची माळ अर्पण करा. त्यानंतर तूप आणि गूळ अर्पण करा. संपत्ती मिळावी किंवा अडकलेले पैसे परत मिळावेत, यासाठी प्रार्थना करा आणि पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला किंवा गरजूंना वाटून टाका.

2. जीवनातील कोणत्याही प्रकारचं दुःख आणि संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या समोर चतुर्मुखी दिवा लावा. याशिवाय या दिवसाच्या पूजेमध्ये तुमच्या वयानुसार तितके लाडू वापरा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि इतरांना वाटा. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचे 3 वेळा पठण करा.

हेही वाचा:

Astrology : आज लक्ष्मी नारायण योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींना होणार धन-ऐश्वर्य प्राप्ती, पैसा हातात खेळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election : कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
Delhi Election : माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
माजी सीएम अरविंद केजरीवालांह आपच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Result 2025 : 'आप'चा गड ढासळला! केजरीवालाचं नेमकं काय चुकलं? Rajiv Khandekar यांचं विशलेष्णDelhi Result 2025 : 'आप'चा गड ढासळला! केजरीवालाचं नेमकं काय चुकलं? Rajiv Khandekar यांचं विशलेष्णDelhi Election Result 2025 : दिल्लीतील भाजपच्या विजयाची प्रमुख कारणेAnna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Election : कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
Delhi Election : माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
माजी सीएम अरविंद केजरीवालांह आपच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
Nashik Crime : मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
Iltija Mufti : इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Embed widget