Vastu Tips: माणसाच्या या 4 सवयी प्रगतीत आणतात अडथळा, घरात दारिद्र्य येते, वास्तुशास्त्रात म्हटलंय..
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या काही सवयी त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. या सवयींमुळे घरात नेहमीच आर्थिक समस्या असते. या सवयींपासून ताबडतोब दूर राहिले पाहिजे.
![Vastu Tips: माणसाच्या या 4 सवयी प्रगतीत आणतात अडथळा, घरात दारिद्र्य येते, वास्तुशास्त्रात म्हटलंय.. vastu tips marathi news bad habits which stop progress and success Vastu Tips: माणसाच्या या 4 सवयी प्रगतीत आणतात अडथळा, घरात दारिद्र्य येते, वास्तुशास्त्रात म्हटलंय..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/676a4973b9425b42d752571426aef0581675670768174381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Money: वास्तुशास्त्र (Vastu Shashtra) हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे. वास्तूनुसार रचना केल्यास घर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांपासून दूर राहते. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते, तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. अनेक वेळा सर्व काही योग्य पद्धतीने करूनही माणसाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते. वास्तूनुसार, व्यक्तीच्या काही सवयी त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात, ज्यामुळे घरात नेहमीच आर्थिक संकट असते. जाणून घ्या वास्तूनुसार, व्यक्तीने कोणत्या सवयींपासून लगेच अंतर ठेवावे?
देवी लक्ष्मीची विशेष कृपा
आपल्या हिंदू धर्मग्रंथात आणि वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. हे नियम मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या समाधानासाठी बनवलेले आहेत. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमावतात, पण बचत होत नाही तसेच खर्चापेक्षा उत्पन्न जास्त होते. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही या सवयींचा जीवनात समावेश केला तर काही दिवसांनी याचा परिणाम जाणवू लागेल. वास्तुशास्त्रानुसार या नियमांबद्दल जाणून घ्या
या सवयी प्रगतीच्या आड येतात
वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या काही सवयी त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. या सवयींमुळे घरात नेहमीच आर्थिक समस्या असते. या सवयींपासून ताबडतोब दूर राहिले पाहिजे. कोणत्या आहेत त्या सवयी?
-अनेकजण पलंगावर बसून अन्न खातात. वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो, यासोबतच घरातील सुख-शांती भंग पावते. अंथरुणावर बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांवरही कर्ज वाढते.
-रात्रीचे जेवण झाल्यावर बरेच लोक किचन अस्वच्छ आणि सिंकमध्ये पडलेली भांडी टाकून झोपी जातात. वास्तुशास्त्रानुसार रात्री खरकटी भांडी सोडल्याने देवी अन्नपूर्णा कोपते. व्यक्तीला आर्थिक विवंचनेसोबत मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो.
-वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर कचरापेटी कधीही ठेवू नये. असे मानले जाते की, मुख्य दरवाजातून देवी-देवता घरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. अशा वेळी मुख्य गेटवर डस्टबीन ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो.
-दान-दक्षिणा पुण्य देते, पण वास्तुशास्त्रानुसार कोणीही सूर्यास्तानंतर दूध, दही, कांदा, मीठ यांसारख्या वस्तूंचे दान करू नये. असे मानले जाते की संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Vastu Tips : कमी उत्पन्नात मोठी बचत करायचीय? तर आजपासून 'या' सवयी लावा, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)