(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : कमी उत्पन्नात मोठी बचत करायचीय? तर आजपासून 'या' सवयी लावा, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : वास्तुशास्त्रात म्हटले जाते की, या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते.
Vastu Tips For Money : आपल्या हिंदू धर्मग्रंथात आणि वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच जे काही कमावले त्यात समाधान मिळते आणि संपत्तीची वाढ होते. हे नियम मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या समाधानासाठी बनवलेले आहेत. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमावतात, पण बचत होत नाही तसेच खर्चापेक्षा उत्पन्न जास्त होते. जर तुम्ही या सवयींचा जीवनात समावेश केला तर काही दिवसांनी तुम्हाला असे वाटू लागेल की पैसा वरदान आहे. वास्तुशास्त्रानुसार या नियमांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही 2023 मध्ये सुरू केले पाहिजेत…
'या' वस्तूंनी घर स्वच्छ करा
वास्तुशास्त्रानुसार दररोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसले तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. यासोबतच कुटुंबातील अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सतत त्रास देणारे अनावश्यक खर्च कमी होतील, ज्यामुळे तुम्ही 2023 मध्ये चांगली बचत करू शकाल. पण लक्षात ठेवा की रविवार, मंगळवार आणि गुरुवारी घरातील मिठाच्या पाण्याने पुसू नका. तुम्ही हे इतर दिवशीही करू शकता.
'हे' काम झोपण्यापूर्वी करा
वास्तुशास्त्रानुसार, नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय धुवा आणि ते कोरडे केल्यानंतरच झोपी जा, ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. दररोज असे केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता दूर होतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या आत सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो, ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होते. हे तुमच्या झोपेसाठी खूप चांगले मानले जाते. ही सवय तुमच्या वाईट वेळेला चांगल्या वेळेत बदलते.
या गोष्टी घराबाहेर साचू देऊ नका
वास्तुशास्त्रानुसार, नेहमी लक्षात ठेवा की, आर्थिक प्रगती आणि नशीब मजबूत करण्यासाठी घरासमोर कधीही कचरा साचू देऊ नका. रोज पूजेपूर्वी घरासमोर गंगाजल शिंपडावे. असे केल्याने माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो आणि घरातील सदस्यांची प्रत्येक समस्या दूर होते. यासोबतच संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दोन दिवे लावा, ही सवय जरूर लावा. असे केल्याने, 2023 हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग उघडेल.
या वस्तूंनी होम आरती करा
वास्तुशास्त्रानुसार, 2023 मध्ये तुम्ही ही सवय लावावी की, सकाळ संध्याकाळ पूजा करताना, आरती करताना कापूर जाळावा. असे मानले जाते की कापूरचा वास वातावरणात वेगाने पसरतो आणि सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आकर्षित करतो. कापूरचा धूर वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो, ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा होतो. असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्येही प्रगतीची शक्यता निर्माण होते.
याचे रोज पठण करावे
वास्तुशास्त्रानुसार, लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे रोज पठण करावे. पैसा मिळविण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फलदायी मानले जाते. हे एक चमत्कारिक स्तोत्र आहे, ज्याचे पठण केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. या स्तोत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात विशेष जपमाळ किंवा उपासना पठणाची मागणी केली जात नाही. पूजेनंतर तुम्ही त्यांचे पठण करू शकता. 2023 मध्ये, तुम्ही दररोज लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण केले पाहिजे, ज्यामुळे तुमची प्रगती होईल आणि पैशाची बचत देखील होईल.
2023 मध्ये ही सवय टाळा
वास्तुशास्त्रानुसार, अनेकांना अन्न खाताना अभ्यास किंवा काम करण्याची सवय असते, ती खूप अशुभ मानली जाते. 2023 मध्ये ही सवय टाळा, ती तुमच्या पैशांसोबतच अनेक गोष्टींसाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते, तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केले तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवरही परिणाम होतो, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे ही सवय टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Vastu Tips : घरातील देवघरात ओम, स्वस्तिक, श्री, कलशाचे चिन्ह बनवण्याचे अनेक फायदे! वास्तुशास्त्रात म्हटलंय...