एक्स्प्लोर

Vastu Shastra: घरात भरभराट होण्यासाठी 'या' 4 वस्तू कधीच ठेवू नका रिकाम्या; तरच होईल लक्ष्मीची कृपा

Vastu Tips for Home: घरात काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही रिकाम्या ठेवू नयेत. या गोष्टी रिकाम्या ठेवल्याने जीवनाच्या प्रगतीत नेहमीच अडथळा येतो. या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

Vastu Shastra: जर तुमचे चांगले दिवस अचानक हळूहळू वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील काही गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरात काही गोष्टी अशा असतात, ज्या रिकाम्या ठेवल्या तर त्याचे जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतात. वास्तुशास्त्र (Vastu Tips) आणि शास्त्रीय मान्यतेनुसार, घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा लहानसहान गोष्टींमुळे माणसाचं नशीब पालटतं आणि हळूहळू गरिबीकडे वाटचाल होते. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन समस्या येऊ लागतात. त्यामुळे कुटुंबाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी चार गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत.

धान्याचे डबे

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये अन्नधान्य भरलेले डबे कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनणार नाही. भरलेलं धान्याचं भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. तसेच दररोज देवी अन्नपूर्णेची दररोज पूजा करा, यामुळे घरातील भांडार कधीच रिकामं राहत नाही.

बाथरूममध्ये रिकामी बादली

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. जरी तुम्ही बादली वापरत नसाल तरी ती नेहमी पाण्याने भरुन ठेवा. तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अंघोळीसाठी निळी बादली वापरा. बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका.

पूजेच्या खोलीत पाण्याचं भांडं रिकामं ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, पूजा खोलीत ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पानं टाका. देवालाही तहान लागते, अशी श्रद्धा आहे. पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देव तृप्त राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्याच वेळी, रिकाम्या पाण्याच्या पात्राचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका

तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी, हे नेहमी लक्षात ठेवा. तिजोरीत किंवा पर्समध्ये थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकामी तिजोरी किंवा पाकिट माणसाला गरिबीकडे नेतात, त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. ते एकाच वेळी पूर्णपणे रिकामे करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology: शनीची 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असते असीम कृपा; कर्माप्रमाणे मिळतं फळ, नांदते श्रीमंती

महत्त्वाच्या बातम्या

Dhanteras 2026 : 6 की 7 नोव्हेंबर? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त 
6 की 7 नोव्हेंबर? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त 
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार विशेष कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार विशेष कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
Vastu Tips : घरात गरिबी येण्यामागे 'या' 5 वस्तू तर कारणीभूत नाहीत ना? वास्तुशास्त्रानुसार जमिनीवर ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा...
घरात गरिबी येण्यामागे 'या' 5 वस्तू तर कारणीभूत नाहीत ना? वास्तुशास्त्रानुसार जमिनीवर ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा.

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
New Zealand vs India, 2nd T20I: 41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
Embed widget