UAE Hindu Temple : दुबईत साकारलं हिंदू मंदिर; भक्तांची पहिल्याच रविवारी रेकॉर्डब्रेक गर्दी
UAE BAPS Hindu Temple : UAE मध्ये बांधलेले हिंदू मंदिर जगभरातील भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच रविवारी भाविकांनी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली.
UAE BAPS Hindu Temple : दुबईमध्ये (United Arab Emirates हिंदू मंदिर (Hindu Mandir) साकारले गेलं असून दहा वर्षापासून दुबईतील भारतीयांच्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरलंय. UAE मध्ये बांधलेले हिंदू मंदिर जगभरातील भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच रविवारी भाविकांनी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विशेष म्हणजे भक्तांचा महामेळाच भरला. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. दुबईच्या या मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच भाविकांची मोठी गर्दी होत असून रविवारी सुमारे 65,000 हून अधिक भाविक आणि पर्यटांनी हजेरी लावली BAPS (BAPS Temple) कडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
BAPS ने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार , मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी भाविकांनी गर्दी केली . तब्बल 65000 भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी मंदिराचे द्वार उघडताच 40,000 हून अधिक भाविक दर्शनासाठी आले. तर संध्याकाळी 25000 भाविक हे दर्शनासाठी पोहचले. प्रचंड गर्दी असतानाही कोणतीही धक्काबुक्की न करता संयमाने रांगेत उभे राहिले.
'आम्ही धन्य झालो'
अबू धाबी येथील सुमंत राय यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, "हजारो लोकांमध्ये अशी अप्रतिम शिस्त मी कधीच पाहिली नाही. मला भीती वाटत होती की, मला खूप वेळ वाट पहावी लागेल आणि शांततेत दर्शन घेता येणार नाही; पण आम्ही शांतपणे दर्शन घेतले अन् अत्यंत समाधानी झालो." लंडनमधील एक भक्त प्रवीण शाह यांनी मंदिराच्या भेटीचा अनुभव सांगताना सांगितले की, “मी दिव्यांग आहे, हजारो भाविक असतानाही मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी माझी विशेष काळजी घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
'अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली'
केरळमधील बालचंद्र म्हणाले की, प्रचंड गर्दी पाहून मला वाटले की भाविकांच्या या समुद्रात मी हरवून जाईल. परंतु मंदिराचे व्यवस्थापन पाहून मला आश्चर्य वाटले.धक्काबुक्की न होता सर्व भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. मी लवकरच पुन्हा दर्शनासाठी येणार आहे आम्ही या क्षणाची गेली कित्येक वर्ष वाट पाहत आहे. आम्ही धन्य झालो असून आता यूएईमध्ये देखील हिंदू भाविकांना मंदिरात येऊन प्रार्थना करण्याची जागा आहे. ते दुबईमध्ये 40 वर्षांपासून राहत आहेत.
मंदिराचे स्थापत्य म्हणजे शिल्पकलेचे अप्रतिम सौंदर्य
तर पोर्टलँड येथून आलेला पियुष म्हणाला की, हे मंदिर एकतेचे प्रतिक आहे. मेक्सिको येथील लुईस म्हणाले की, मंदिराचे स्थापत्य म्हणजे शिल्पकलेचे अप्रतिम सौंदर्य आहे. मंदिरात येणे म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी आहे.
हे ही वाचा :
UAE Hindu Temple : अबू धाबीतील पहिलं हिंदू मंदिर, बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय? वाचा वैशिष्ट्ये
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)