एक्स्प्लोर

UAE Hindu Temple : अबू धाबीतील पहिलं हिंदू मंदिर, बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय? वाचा वैशिष्ट्ये

BAPS Hindu Mandir : अबू धाबी येथे BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 14 फेब्रुवारीला करण्यात येणार आहेत. बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय आहे, जाणून घ्या.

UAE BAPS Hindu Temple : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) पहिलं हिंदू मंदिर (Hindu Mandir) तयार झालं असून लवकरच याचं उद्घाटन पार पडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी (Abu Dhadi) येथील भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचं (BAPS Temple) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 14 फेब्रुवारी रोजीला हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. अबू धाबीमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वीच अनेक देशांचे दिग्गज मंत्री या कार्यक्रमासाठी अबूधाबीत पोहोचले आहेत.

मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर (First Traditional Hindu Temple in the Middle East)

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) पहिलं हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये तयार झाले आहे. 14 फेब्रुवारीला या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून यासाठी अनेक संत, महंत पाहुणे म्हणून अबुधाबीला पोहोचले आहेत. हे मंदिर 27 एकर जागेत उभारण्यात आलं आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटान सोहळ्यानंतर आता पंतप्रधानांच्या हस्ते आणखी एका भव्य मंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे.

UAE मधील पहिलं हिंदू शैलीतील मंदिर (First Hindu Temple in UAE)

BAPS हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित, ही भव्य रचना भारत आणि UAE यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचा पुरावा आहे, सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. अबुधाबी येथील या मंदिरात उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे.

पाहा मंदिराची पहिली झलक (Sneak Peek of the BAPS Hindu Temple) 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन (BAPS Temple Inauguration by PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये 14 फेब्रुवारीला BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन करतील. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी अनेक देशांचे मुत्सद्दी युएईमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये युनायटेड स्टेट्स, जर्मनी, इस्रायल, इटली, कॅनडा, आयर्लंड, बहरीन, आर्मेनिया, बांगलादेश, घाना, चाड, चिली, युरोपियन युनियन, फिजी, अर्जेंटिना, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, गॅम्बिया येथील राजदूतांचा समावेश आहे.

मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या आतील बांधकामात 40,000 घनफूट संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराचं बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल यांनी सांगितलं की, "आमचा बांधकामादरम्यान प्रवास नावीन्यपूर्ण होता आणि आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. आम्ही उष्णता-प्रतिरोधक नॅनो टाइल्स आणि काचेच्या जड पॅनल्सचा वापर केला आहे."

BAPS हिंदू मंदिराची खासियत, जाणून घ्या

  • BAPS हे UAE मधील पहिलं हिंदू मंदिर आहे.
  • BAPS हिंदू मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी UAE मध्ये नेण्यात आले.
  • अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 2015 मध्ये पंतप्रधान मोदीच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी 13.5 एकर जमीन दान केली होती.
  • UAE सरकारने जानेवारी 2019 मध्ये मंदिरासाठी आणखी 13.5 एकर जमीन दान केली. अशा प्रकारे एकूण 27 एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे.
  • 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती.
  • BAPS मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक युएईच्या अमिरातीचे प्रतीक आहेत.
  • BAPS मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे.
  • मंदिराच्या पायामध्ये 100 सेन्सर बसवण्यात आले आहेत. भूकंपाची शक्यता आणि तापमान बदल तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत.
  • मंदिराच्या बांधकामासाठी 400 दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget