Solar Eclipse: तब्बल 54 वर्षानंतर सोमवती अमावस्येला वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ, तिथी, सुतक काळ
Solar Eclipse 2024: गुढीपाडव्याच्या आधल्या दिवशी सूर्यग्रहण लागत आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. शेवटचं पूर्ण सूर्यग्रहण 1970 साली पडलं होतं.
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला (Eclipse) विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. शेवटचे पूर्ण सूर्यग्रहण 1970 साली पडले होते. त्यानंतर आता 54 वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे. विज्ञनानुसार अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागणे होय.
8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे वर्षातील पहिले संपूर्ण सूर्यग्रहण असेल. यावेळचे सूर्यग्रहण गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल, असे सांगितले जाते आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या मते, 8 एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण 70 मिनिटे असणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटानी सुरू होणार असून 9 एप्रिलला रात्री 2 पर्यंत असणार आहे.ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही.
ग्रहण पाळायचे की नाही?
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिले तर ही एक अशुभ घटना मानली जाते. ग्रहण शुभ मानले जात नाही. त्यामुळे ग्रहणाच्या कालावधीत सुतक पाळले जाते. गर्भवती महिलांना विशेष खबरदारी घेण्याचा आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ज्योतिषार्य डॉ. अनिश व्यास यांच्या मते हे सूर्यग्रहण चंद्रग्रहणाप्रमाणे भारतात दिसणार नाही. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैध राहणार नाही. पौराणिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो.हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक नियम भारतात वैध नाहीत. त्यामुळे ग्रहण पाळण्याची गरज नाही.
सूर्यग्रहण कुठे दिसेल?
सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे. कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बर्म्युडा, कोलंबिया, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, रशिया स्पेन या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाचा सुतक काळ आणि सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र सावधगिरी बाळगण्यासाठी सुतक काळात किंवा ग्रहण काळात काही मंत्रांचा जप करू शकता. या मंत्रांचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि ग्रहण दोषांपासून मुक्ती मिळते.
- ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ
- ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
- ॐ सूर्याय नम:
- ॐ घृणि सूर्याय नम:
- ॐ हिरण्यगर्भाय नम:
हे ही वाचा :
April Horoscope 2024 : एप्रिल महिन्यात होणार सुखाची बरसात; पाडवा आणणार तूळ ते मीन राशींच्या जीवनात भरभराट, वाचा मासिक राशीभविष्य