Surya Gochar 2024 Effects : 13 दिवसांनंतर सूर्याचं होणार संक्रमण! 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ; पदोपदी मिळतील शुभ संकेत
Surya Gochar 2024 Effects : सूर्याच्या या संक्रमणामुळे काही राशींवर विशेष लाभ होणार आहे. 14 जून पर्यंत सूर्य वृषभ राशीतच स्थित असणार आहे.
Surya Gochar 2024 Effects : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचं एका ठराविक कालावधीनंतर संक्रमण होतं. या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ग्रहांच्या मालिकेतील सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला राशी (Horoscope) परिवर्तन करतो. सूर्य ग्रह सध्या मेष राशीत स्थित आहे. 14 मे रोजी सूर्याचा शुक्र राशीत म्हणजेच वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश होणार आहे.
सूर्याच्या या संक्रमणामुळे काही राशींवर विशेष लाभ होणार आहे. 14 जून पर्यंत सूर्य वृषभ राशीतच स्थित असणार आहे. या दरम्यान तीन राशीच्या लोकांवर करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसून येतील. वृषभ राशीत सूर्याच्या स्थितीची दृढता दिसून येणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचा वृषभ राशीत होणारा प्रवेश मेष राशीसाठी देखील लाभदायक ठरणार आहे. हे संक्रमण तुमच्या राशीतील धन आणि वाणीच्या भावात होणार आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. इतकंच नाही, तर या दरम्यान तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात देखील मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुमच्या आत्मविश्वासातही वाढ होईल. तुमच्या वाणीवर याचा प्रभाव होणार आहे. व्यापाऱ्यांचे अडकलेले पैसेही मिळतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना या दरम्यान चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच, हे संक्रमण तुमच्या जन्म कुंडलीच्या दशम भावात होणार आहे. सध्या सूर्य ग्रह स्वामी आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता.नोकरदार लोकांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
सूर्य ग्रहाचं या राशीत होणारं संक्रमण हे विशेष लाभदायी ठरणार आहे. सूर्य सध्या तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावात आहे. त्यामुळे तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. इतकंच नाही तर, या दरम्यान जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे संबंध जास्त दृढ होतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: