एक्स्प्लोर

May Month Planet Transit 2024 : मे महिन्यात गुरुसह चार मोठ्या ग्रहांच्या हालचाली; 'या' राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार,आयुष्यात घडतील महत्त्वाचे बदल

May Month Planet Transit 2024 : आजपासून सुरु होणाऱ्या मे महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणार आहेत.

May Month Planet Transit 2024 : वैदिक शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून (Horoscope) दुसऱ्या राशीत  परिवर्तन करतात. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाला ग्रहांचं संक्रमण म्हणतात. प्रत्येक महिन्याला काही ग्रह राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम संपूर्ण महिनाभर प्रत्येक राशीच्या लोकांवर पडतो. अशातच मे महिना (May Month) फार खास असणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मे महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणार आहेत. मे महिन्यात गुरु बृहस्पती, शुक्र, बुध आणि सूर्य यांसारख्या मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा व्यक्तीच्या करिअर, शिक्षण, आर्थिक जीवन आणि आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. 

मे महिन्यात ग्रहांचं होणार संक्रमण 

मे महिन्यात सर्वात आधी गुरु ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनाला सर्वात जास्त महत्त्व आहे. बृहस्पतीचं हे संक्रमण तब्बल 18 वर्षांनंतर वृषभ राशीत होणार आहे. दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी हे संक्रमण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, सुख, धर्माचा कारक ग्रह मानले जाते. गुरु ग्रहाची गणना शुभ ग्रहांत होते. 

गुरु ग्रहानंतर 10 मे रोजी बुध ग्रहाचं संक्रमण होणार आहे. बुध ग्रहाला बुद्धी, गणित आणि वाणीचा कारक मानले जाते. त्यानंतर 14 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. 19 मे रोजी सुख, समृद्धी, धन आणि भौतिक सुख-सुविधेचा कारक ग्रह शुक्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर मे महिन्यात मालव्य राजयोगासह अनेक राजयोग देखील बनणार आहेत. या व्यतिरिक्त वृषभ राशीत त्रिग्रही योगाचं देखील निर्माण होणार आहे. मे महिन्यात या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने काही राशीच्या लोकांसाठी हा महिना फार शुभ ठरणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींसाठी मे महिना शुभ ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास 

मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना फारच शुभ ठरणार आहे. या महिन्यात आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळणार आहे. तुमची सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. या दरम्यान तुमचा तुमच्या कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढणार आहे. तसेच तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचं मन प्रसन्न असेल. 

कर्क रास 

कर्क राशीसाठी मे महिना मागच्या महिन्यासारखाच अनुकूल ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. तुमची काही रखडलेली कामेही पूर्ण होतील. तसेच, धनलाभ होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमच्या कर्माचं चांगलं फळ मिळणार आहे. तुमच्या आरोग्या संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवतील पण त्या जास्त काळ टिकणार नाहीत. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह रास 

सिंह राशीसाठी मे महिना फलदायी ठरणार आहे. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. व्यापारात लाभाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी चालून येतील. तुमचं मन प्रसन्न असेल. तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही तो सुरु करू शकता. 

तूळ रास 

तूळ राशीच्या लोकांना मे महिन्यात अनेक लाभ मिळतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीत तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल. तुमच्या पगारात वाढ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget