Surya Grahan 2023: सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या राशींवर पडणार? भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
Surya Grahan 2023: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. याचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या राशीला होणार? जाणून घ्या
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाची घटना ज्योतिष आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी सूर्यग्रहण होणार आहे. शास्त्रज्ञांनी या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असे नाव दिले आहे, ज्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात. या ग्रहणात सूर्य अंगठीसारखा दिसतो. 14 ऑक्टोबर रोजी होणारे ग्रहण हे या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असेल. यापूर्वी 20 एप्रिल 2023 रोजी सूर्यग्रहण झाले होते. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कोणत्या राशीत होणार आहे? त्याचा देश आणि जगावर काय परिणाम होईल? हे जाणून घ्या
सूर्यग्रहण 2023 वेळ
पंचांगानुसार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन महिन्यातील अमावास्येला कन्या आणि चित्रा नक्षत्रात सूर्यग्रहण होईल. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजता ग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल.
सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर सर्वाधिक परिणाम होईल?
शास्त्रज्ञांसाठी, ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना मानली जाते. परंतु धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण दिसत नसले तरी त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर पडतो. त्यामुळे ज्या राशींवर ग्रहणाचा विपरित परिणाम होतो त्यांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
या राशीच्या लोकांसाठी शुभ नसेल सूर्यग्रहण
ज्योतिष शास्त्रानुसार 14 ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ नसेल. कारण ग्रहण तुमच्या राशीतच होणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि जीवनात अनेक चढ-उतार येतील. ग्रहणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. कन्या सोबतच मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी ग्रहण काळात सावध राहण्याची गरज आहे. कारण सूर्यग्रहणाचा तुमच्या राशींवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ग्रहण
14 ऑक्टोबर 2023 रोजी सूर्यग्रहण होईल आणि या दिवशी सर्वपित्री अमावस्या असेल. सर्वपित्री अमावस्येला 16 दिवसांचा श्राद्ध पक्ष संपतो. दरम्यान, हे ग्रहण भारतात दिसणार नाही, यामुळे श्राद्ध विधी आणि अमावस्येशी संबंधित सर्व धार्मिक कार्यांवर बंदी असणार नाही.
भारतावर सूर्यग्रहणाचा प्रभाव
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. कारण हे ग्रहण रात्री होणार आहे आणि त्यामुळे ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळही भारतात वैध राहणार नाही. मात्र, हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, क्युबा, पेरू, कोलंबिया आणि ब्राझीलमध्ये दिसणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Pitru Paksha 2023: घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे? पितृदोषाची लक्षणे काय? मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या