Pitru Paksha 2023: घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे? पितृदोषाची लक्षणे काय? मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या
Pitru Paksha 2023: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही पितृपक्ष हा काळ अत्यंत उपयुक्त मानला जातो. पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि कारणे काय? त्याचे उपाय काय? जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : शास्त्रानुसार, पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते, पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात. जाणून घ्या घरातील पितृ दोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय.
पितृ दोष म्हणजे काय
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो. यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात.
पितृ दोष कसा ओळखावा?
कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे, कौटुंबिक कलह, मुलांशी संबंधित समस्या, लग्नात अडथळे, सतत आजारी इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत.
पितृ दोषाची लक्षणे
पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही. असे आढळून आले तरी अनेक वेळा मूल अपंग, मतिमंद असते
काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते.
नोकरी-व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होतच आहे.
कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो. कुटुंबात शांतीचा अभाव.
कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात. उपचार करूनही बरे होत नाही.
कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तींचा विवाह शक्य नाही. किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळे होणे.
पितृदोषाच्या बाबतीत, एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो.
पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात.
कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात. घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो.
पितृदोष कशामुळे होतो?
पितरांचे योग्य अंत्यविधी तसेच श्राद्ध न करणे.
पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे.
धर्माविरुद्ध वागणे.
पिंपळ, कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे.
साप मारणे किंवा कोणाकडून तरी करून घेणे.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे. जमेल तेवढे दान करा.
पितृ दोष शांत करण्यासाठी पितृ पक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा. यावर पितर प्रसन्न होतात.
वर्षातील प्रत्येक एकादशी, चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपंडी श्राद्ध करावे.
पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ, मीठ, गहू, तांदूळ, गाय, सोने, वस्त्र, चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या, श्रीमद भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठण केल्याने पितृदोष दूर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Pitru Paksha 2023: घरामध्ये मृत पूर्वजांचे फोटो लावले असतील, तर महत्त्वाचे नियम जाणून घ्या, शास्त्रात म्हटंलय..